विश्वामित्र सिण्ड्रोम

 

पंकज भोसले


विसाव्या शतकाच्या अखेरीला जागतिकीकरण नामक काहीतरी झालं आणि त्याचे पडसाद समाजाच्या सर्व थरात उमटले. जग लहान झालं. इंटरनेटच्या माध्यमातून हव्या नको त्या बऱ्याचशा गोष्टी थेट आपल्या दारात येऊन पोचल्या आणि त्यांनी आपल्या जगण्याचं तंत्रच बदलून टाकलं. ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या जोडकथा या अशा मोठ्या बदलाच्या साक्षीदार आहेत. वरवर पाहता त्या मुंबईनजीकच्या एका वस्तीत इंटरनेटवरून अवतरलेल्या पोर्नोग्राफीचा आणि त्यामुळे वरकरणी पापभीरू वाटणाऱ्या  समाजातल्या विविध वृत्तीदर्शनाचा धांडोळा घेतात, पण प्रत्यक्षात तो त्यांचा केवळ एक पैलू आहे. तंत्रज्ञानापासून संगीतापर्यंत आणि राहणीमानापासून नातेसंबंधांपर्यंत आपला भवताल कसा बदलत गेला, याचं हे एकाच वेळी धक्कादायक तरीही गमतीदार असं दर्शन आहे.
पंकज भोसले हा पत्रकार असण्याबरोबर सिनेमा आणि साहित्याचा चाणाक्ष अभ्यासक आहे, एका अस्वस्थ काळाचा निरीक्षक आहे. आणि त्याचं हे टोकदार निरीक्षण ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या कथांना त्यांच्या साऱ्या विक्षिप्तपणासह जिवंत करतं.
गणेश मतकरी

 

350.00 Add to cart
Featured

काळेकरडे स्ट्रोक्स


प्रणव सखदेव


उदास पोकळी… की पोकळीतच उदासी राहते भरून?
समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी?
का वागतोय तो असा? ‘इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस’सारखा कधी झपाटला जातोय…
कधी ‘पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा’ गुढाकडे ओढला जातोय…
कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन
कवितांमधून व्यक्त होत जातोय…

आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे
कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग
दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते.
या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात.
मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ!
खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा
पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही!

कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनवासवरचे…
समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड
काळेकरडे स्ट्रोक्स !



250.00 Add to cart

स्पाय स्टोरीज संच


सत्य घटनांवर आधारित थरारक तितक्याच खिळवून ठेवणाऱ्या कथा


अमर भूषण
अनुवाद : प्रणव सखदेव


भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीसाठी विशेषतः ‘रॉ’ साठी काम केलेल्या अमर भूषण यांनी स्वानुभवातून आणि सत्य घटनांवर आधारित लिहिलेल्या ५ स्पाय स्टोरीज ३ पुस्तकांत
१) मिशन नेपाळ
२) टेरर इन इस्लामाबाद

३) द झीरो- कॉस्ट मिशन


लेखक अमर भूषण यांनी राज्य आणि केंद्रीय इंटेलिजन्स एजन्सींसाठी व खासकरून ‘रॉ’साठी काम केलं आहे. भारताच्या तांत्रिक इंटेलिजन्स सव्हिसचे प्रमुख म्हणून २००५मध्ये ते निवृत्त झाले.


टपाल खर्चासहित पूर्ण संच रु. ७००




700.00 Add to cart

गोठण्यातल्या गोष्टी

हृषिकेश गुप्ते


गोष्टी सांगण्यापूर्वी…

‘….प्रत्येक गावात काही आख्यायिका आणि दंतकथा असतात . एक लेखक म्हणून या आख्यायिका मला भुरळ पाडतात . कोणताही लेखक त्याच्या कानावर पडलेल्या आख्यायिका निव्वळ कपोलकल्पित प्रदेशात राहू देत नाही . कधी चिमूटभर आशयाच्या सूतावरून कल्पनेचा स्वर्ग गाठत , तर कधी आशयाच्या स्वर्गात कल्पनेचं सूत कातत या आख्यायिकांना लेखक कागदावर उतरवत राहतो . कधी कल्पनेतल्या माणसांना तो खरेखुरे सदरे चढवतो . तर कधी खऱ्या मानवी स्वभावांना लेखक कल्पित नियती देतो . नाव , गाव , देश , वेष बदलत ही माणसं , या आख्यायिका मग सर्वदूर पसरत जातात आणि चिरायू होतात . ” गोठण्यातल्या गोष्टी’तली ही माणसं खरी असली नसली तरीही जन्मापासून ही माणसं माझ्यासोबत आहेत . या माणसांना आदि – अंत नाही.

म्हणूनच ही माणसं स्वयंभू आणि चिरायू आहेत …..’



 

360.00 Add to cart
Featured

चतुर


प्रणव सखदेव


साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त लेखकाची तिसरी कादंबरी…

चतुर

खरंतर गोष्ट आहे तशी साधी…

एका नवख्या लेखकाची इच्छा असते की,
मरण्याआधी त्याने लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक व्हावं.
पण तसं काही घडत नाही, तो मरतो..
मग त्याची बायको ठरवते, आपण करू त्याची इच्छा पूर्ण !
आणि तिला सापडतात त्याने लिहिलेल्या आणखी काही गोष्टी….
आता काय? तिला पडतो प्रश्न.
मूळ पुस्तकात या नव्या गोष्टी घालता घालता
ती स्वत:देखील लिहू लागते…..!
तर ही गोष्ट आहे तशी साधी –
मरणाची… आठवणींची… प्रेमाची… बालपणाची….
वयात येण्याची… मोठं होण्याची… तिची… त्याची….
आणि
काडेपेटीत अडकलेल्या एका चतुराची…!

240.00 Add to cart

दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट

 

प्रणव सखदेव


“प्रणव सखदेव हे समकालीन मराठी कथेला आपल्या वेगळ्या आशयाविष्काराने नवे परिमाण प्राप्त करून देणारे महत्त्वाचे कथाकार आहेत. या संग्रहातल्या  त्यांच्या कथा गोष्टी सांगण्यातली सहजता घेऊन येतात.
त्या मराठीतील रूढ मध्यमवर्गीय कथेला छेद देत, या जगण्यातील दाहकता आणि अंतरंगातील तळकोपरे धुंडाळत जीवनाशयाला वैशिष्ट्यपूर्ण आयाम मिळवून देतात, बाजारू काळातील अस्थिरतेच्या जीवघेण्या वास्तवाला चित्रित करतात. दांभिकता, हिंस्रता आणि हतबलता यांसह समाजकेंद्रित आणि श्रमिकांशी जोडलेपणातून येणारा अपराधभावदेखील या कथांमधून दिसून येतो. मराठी कथासाहित्यात मध्यमवर्गीयांची कथा हा अलीकडे हेटाळणीचा विषय झाला होता. परंतु या कथा मध्यमवर्गीय जगण्यातील नेमके कंगोरे वास्तव-कल्पितातून उजागर करतात. समकाळाने प्रभावित केलेल्या मानवी जीवनाच्या अनेक मिती या कथनऐवजातून साकार होतात.
व्यवस्थेचे अजस्त्र रूप आणि मानवी जीवनानुभवाची क्षुद्रता आकळल्याने सखदेव वास्तवाला अनेक कोनांतून प्रक्षेपित करण्यासाठी या कथांचा वापर करतात. त्यामुळे या कथा एकरेषीयता ओलांडून अनेक दिशांचे पसरलेपण घेऊन येतात. मानवी जीवनाच्या जाणीव-नेणिवांचा शोध घेत या पसरलेपणात समाजभान व्यक्त करणं हे सखदेव यांच्या कथेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट या संग्रहातून पुढे येते.”
– दत्ता घोलप

 


240.00 Add to cart

अगस्ती इन अॅक्शन संच

३ थ्रीलर्स…


श्रीकांत बोजेवार


रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन अॅक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, ‘हॅट्स ऑफ यार अगस्ती!’


360.00 Add to cart

निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरू


शोभा भालेकर


एकूण आठ कथांचा हा वाचनीय असा कथासंग्रह. या कथा अतिशय तरल आणि जीवन जगायला शिकवणाऱ्या आहेत. आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, पात्र या कथांमध्ये भेटत राहतात. गुंगवून टाकणाऱ्या शैलीतून लेखिका शोभा भालेकर घराघरातल्या अनेक बोलक्या कहाण्या सांगतात. काही पात्रांमध्ये आपण आपल्यालाच शोधत राहतो तर काही प्रसंग जे आपल्याही आयुष्यात घडून गेलेले असतात त्यांचाही आपल्याला पुनःप्रत्यय येत राहतो, तसे प्रसंग नव्याने समोर आल्यामुळे आपण काहीसे चकितही होतो. आपण थोड्या सकारात्मकतेने, संवेदनशीलतेने जर आयुष्य बघू लागलो तर किती सुंदर, लोभसपणे जगता येऊ शकेल याची प्रचीती नकळतपणे कथांमधून येत जाते. प्रत्येक वाचकाला गुंतवून ठेवणारा विविधरंगी कथांचा संग्रह….

निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरू !

250.00 Add to cart

अंगारिका

नारायण धारप


गहाण पडलेली इस्टेट सोडवून घेऊन यशवंतराव आणि त्यांचं कुटुंब दुमजली वाड्यात राहायला येतं … … आणि मग सुरू होतो … भयप्रद आणि गूढ गोष्टींचा अनाकलनीय खेळ ! गांगरून टाकणारा भासांचा लपंडाव !! यशवंतरावांचा परिवार , दोन भाडेकरू , गूढ व्यक्तिमत्त्वाचे डॉ . नागराणी , रहस्यमय पद्धतीने मृत्यू पावलेल्या त्यांच्या पत्नी उमाबाई , सतत भीतीच्या छायेत वावरणारा त्यांचा भाचा मुकुंद पित्रे , यांच्याभोवती फिरणारं कथानक एका मोठ्या रहस्यभेदापर्यंत येऊन पोचतं … कोणाचा भास होत राहतो ? कोण वावरतंय त्या वाड्यात ? एक थरारक भयकथा अंगारिका ! विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !

150.00 Add to cart

मनसमझावन

 


[taxonomy_list name=”product_author” include=”4530″]


या अनेकपदरी कथेचं कथानक चिन्मय, त्याचे आई-वडील, मैत्रीण, सामाजिक कार्यकर्ते अशा व्यक्तीपासून लालबाबाचा दर्गा, त्याचा शेजारचा म्हसोबा, दखनी भाषा यांनी वेगवेगळ्या कोनांतून केलेल्या कथनांद्वारे उलगडत जातं. ट्विटरवरचं चिन्मयचं अकाऊंट, व्हॉट्सअॅप, ‘लोकमत’ इतकेच नव्हे, तर कारसेवेसाठी बाभूळगावातून गेलेली एक वीट हेदेखील आपापल्या कथनांमधून स्वतःचं अंतर्विश्व उघड करतात.

एक रहस्यकथा सांगता सांगता भोवतालच्या गुंतागुंतीच्या सामाजिक परिस्थितीची उकल करण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. ती वाचताना उत्तरोत्तर वाढत चाललेल्या धार्मिक कट्टरपणाच्या उन्मादी वातावरणात आपण कोणत्या मूल्यांचा वारसा हरवून बसतो आहोत, याचं भान वाचकाला येतं.. ‘हिंदू’, ‘मुस्लिम’ या कप्पेबंद अस्मितांच्या पलीकडे जाणाऱ्या सामायिक, सांस्कृतिक धाग्यांनी बनलेल्या ‘भारतीयत्वा’ चा शोध ही कादंबरी घेते. हिंदू-मुस्लिम सहजीवनाची कल्पना मूळच्या सोशिक, उदार, सहिष्णु अशा पारंपरिक लोकधर्माला अनुसरल्याने प्रत्यक्षात येईल की त्यासाठी आधुनिक मूल्यांचा अंगीकार करणं गरजेचं आहे, असा कळीचा प्रश्न लेखकाने या कादंबरीत उपस्थित केला आहे.

डॉ. नीतीन रिंढे


 


375.00 Add to cart

बहुमनी

 

नारायण धारप


अवकाशातील युद्धात भाग घेण्याची ही विक्रमची पहिलीच वेळ होती. मनात उत्सुकता होती , कुतूहल होते , जराशी भीतीही होती घणाघाती शस्त्रांचा एकच आघात जहाजाच्या अक्षरशः चिंधड्या · कोणीही वाचायचं नाही – जिंकलात तरच जगणार-हरलात की तुमचे अणूरेणू दशदिशांना भिरकावले जाणार… पाहतापाहता टेहेळ्या जहाजांनी अलेगॉनभोवती आपली जाळी तयार केली होती . टेहेळ्या जहाजांच्या जाळीतून हलक्या क्रूझर्स खाली येऊन आपापल्या जागा घेऊ लागल्या . एकाएकी खालून शक्तीचे झगमगते , देदीप्यमान झोत त्यांच्यावर आदळले…. विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची खिळवून ठेवणारी कादंबरी…. बहुमनी !


 

125.00 Add to cart

अनंत सामंत लिखित ३ पुस्तकांचा संच


अनंत सामंत


डोळ्यासमोर प्रसंग जीवंतपणे उभे करण्याची विलक्षण ताकद,
वाचकाला खेळवत ठेवणारी लेखनशैली…
अनंत सामंत लिखित पुस्तकं
दृष्टी
एक सागरी किल्ला…
एक सागर … एक वादळ आणि चार अंध…
एक विस्मयचकीत करणारी कादंबरी
एक ड्रीम.., मायला!
झोप्पड, दाऊद, हफ्ता आणि मिंट
ही कॉलेजगोईंग चौकडी आणि
त्यांनी घातलेला फुल्ल राडा…
एक बिनधास्त कादंबरी…
 माईन फ्रॉईन्ड 
कथांची मध्यवर्ती कल्पना वेगळी, लेखनातून जाणवणारी उत्कटता
आणि बिनधास्त लेखनशैली…

सात वैशिष्ट्यपूर्ण कथांचा संग्रह…


Original price was: ₹660.00.Current price is: ₹575.00. Add to cart

इलेव्हन्थ अवर


एस. हुसैन झैदी
अनुवाद: रमा हर्डीकर-सखदेव


मुंबईत २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमांचे घाव अजून भरलेले नाहीत.
दिल्लीत पोलीस सुपरींटेंडंट विक्रम सिंग भारतभेटीला आलेल्या पाकिस्तानी उच्चायुक्ताला रागाच्या भरात कानाखाली वाजवतो…त्याच्या या धारीष्ट्र्यामुळे त्याला निलंबित केलं जातं…त्याचवेळी भोपाळच्या तुरुंगातून पाच दहशतवादी फरार होतात…मुंबईत त्यांच्या शोधमोहिमेवर विक्रांत सिंगलाच अनौपचारिकपणे नेमलं जातं. शोधकार्याला प्रचंड वेगाने सुरुवात होते. आणि हे सारं घडत असताना दूर कुठे तरी भर समुद्रात लक्षद्वीपला जाणाऱ्या क्रूजचं सोमाली चाच्यांकडून अपहरण होतं…काही ‘खास’ मागण्यांसाठी!
या सगळ्या गोष्टींतून सुरु होते, ती वेगवान घटनांची मालिका… या मालिकेत दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि भोपाळपासून लक्षद्वीपपर्यंत अनेक घटनांचे दुवे जोडले गेलेले असतात. उच्चपदस्थ नेते, पोलीस व लष्करी अधिकारी आणि काही ‘विशेष’ माणसं या शोधचक्रात गुंततात. त्यांच्या जोडीने नकळतपणे वाचकही या थरारमोहिमेत गुंतत जातो.
अपहरणकर्त्यांच्या मागण्या असतात तरी काय? त्यांचं कारस्थान काय असतं? उद्धटपणाच्या वागणुकीनंतरही या मोहिमेत विक्रमला सहभागी का करून घेतलं जातं? शोधमोहीम थांबते तरी कुठे?
हुसैन झैदी यांच्या खास शैलीत रंगत जाणारा थरारक आणि गूढ शोधमोहिमेचा विलक्षण प्रवास इलेव्हन्थ अवर…



250.00 Add to cart

गोग्रॅमचा चितार

 

[taxonomy_list name=”product_author” include=”3811″]


विजयचे लक्ष वर गेले. त्याला अगदी डोक्यावर एक लाल व एक पिवळा असे चमचमणारे दोन बिंदू दिसले. ताऱ्यांना रंग नसतात व ग्रह चमचम करत नाहीत . हे चमचम करणारे दोन प्रकाशबिंदू हलत होते… खाली त्याच्याकडे येत होते.  कोणीतरी खूप मोठ्या आवाजात रेडिओ लावला असावा , असा आवाज येत होता . त्याच्या अवतीभवती घुमणारा तो विलक्षण आवाज तसाच चालू राहिला.. आणि विजयच्या डोळ्यांसमोर हे असे विविध रंगछटांनी चमकणारे काहीतरी त्याच्यापासून पाच फूटावरच हिरवळीवर टेकले … आणि लगेच त्याच्या नावाने हाका ऐकू येऊ लागल्या… विजय… विजय ! विख्यात भयकथा, गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची कुमारवयीन वाचकांसाठी उत्कंठावर्धक कादंबरी…

गोग्रॅमचा चितार !


 

175.00 Add to cart

96 मेट्रोमॉल


प्रणव सखदेव


काळेकरडे स्ट्रोक्स’नंतरची प्रणव सखदेव यांची ही दुसरी कादंबरी. रूढार्थाने ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ वास्तववादी कादंबरी आहे तर ‘96 मेट्रोमॉल’ ही अद्भुतिका! दोन्ही कादंबऱ्यांचे प्रोटॅगनिस्ट युवक असले, तरीही दोघांचे जीवनमार्ग पूर्णत: भिन्न आहेत, त्यांचं जग भिन्न आहे, त्यांतले घटना-प्रसंग, अनुभवविश्व भिन्न आहे. त्यामुळेच या दोन्ही कादंबऱ्या एकाच लेखकाच्या असल्या तरी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं भाग आहे!

‘96 मेट्रोमॉल’मधला मयंक एका काल्पनिक जगात प्रवेश करतो; हे जग असतं वस्तूंचं – आपण रोज वापरत असलेल्या वस्तूचं ! मयंकचा या वस्तूंशी जसजसा संबंध येऊ लागतो तसतसं त्या वस्तूच मयंकला वापरू लागतात! आणि यातूनच घडत जाते आजच्या उपभोगवादी जगण्यावर अद्भुतिकेतून भाष्य करणारी लघुकादंबरी…96 मेट्रोमॉल !


This novel is a work of fantasy. It speaks about the growing consumerism, self centered and individualistic approach



170.00 Add to cart

इमोझील

मनोबल उंचावणाऱ्या कथा


डॉ.महेश अभ्यंकर

आरती भार्ज


मनोबल उंचावणाऱ्या कथा

करोनाच्या संकटकाळात जागतिक स्तरावरील मानवी जीवनाला एक नवीन वळण मिळाले . सर्व स्तरांतील जनतेपुढे नवी आव्हानं उभी राहिली. आणि त्याचबरोबर जीवनातील प्रत्येक आव्हान हे आत्मपरीक्षणाची एक संधी असते , हेही या काळात प्रकर्षाने जाणवून गेलं . जगातील जवळपास प्रत्येक व्यक्तीने कमी अधिक प्रमाणात मानसिक दोलायमान स्थिती अनुभवली. सामान्य दिसणाऱ्या लोकांनी ह्या असामान्य परिस्थितीला कसे तोंड दिले , अडखळत , धडपडत का असेना , पण या काळात त्यांनी नव्या दिशा शोधल्या , असे सर्व दर्शविणाऱ्या कहाण्या म्हणजेच ‘ इमोझील ‘ अर्थात मनोबल उंचावणाऱ्या कथा.

वैद्यकीय सल्लागार डॉ . महेश अभ्यंकर आणि मानसिक विकास सल्लागार आरती भार्ज ह्यांनी ह्या काळात केलेल्या समुपदेशनावर आधारित या बारा कथा आहेत . या कहाण्या कुठल्याही कठीण काळात मार्गदर्शक ठरतील अशा आहेत . SP ह्या कथांतील पात्रांकडून तुम्हाला नवी उमेद , आयुष्य जगण्यासाठी नवीन दिशा मिळत राहील . नवनिर्माण करण्याची शक्ती आपल्याकडे आहे याची जाणीव होईल.’

आपल्यातील सुप्त मानसिक बळ ओळखा आणि सजगतेने कार्यरत राहा …. ‘ हेच सूत्र आपलं मनोरंजन करता करता सांगणारा कथासंग्रह ‘इमोझील’.

आयुष्य एक निरंतर प्रवास, आशा, अपेक्ष, भावना आणि भास एक दिवस सूर्योदय आपला असेल मनात ठेवावा नेहमी हा विश्वास!


This book is a collection of stories about human resilience and ultimately emerging as a winner with a Zeal. These short stories about psychological issues, faced by people during lock down will inspire many to transform their situation. Each story depicts real life emotional issues and coping mechanisms that can inspire millions across the globe. There is hope and despair, love and break-ups, serenity and anxiety. Yet there is a ray of hope and awareness that transforms lives.


 


300.00 Add to cart
1 2 7