978-93-92374-11-1 | Dimitri Riyaz kelkarchi goshta | दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट | Pranav Sakhadeo | “प्रणव सखदेव हे समकालीन मराठी कथेला आपल्या वेगळ्या आशयाविष्काराने नवे परिमाण प्राप्त करून देणारे महत्त्वाचे कथाकार आहेत. या संग्रहातल्या त्यांच्या कथा गोष्टी सांगण्यातली सहजता घेऊन येतात. त्या मराठीतील रूढ मध्यमवर्गीय कथेला छेद देत, या जगण्यातील दाहकता आणि अंतरंगातील तळकोपरे धुंडाळत जीवनाशयाला वैशिष्ट्यपूर्ण आयाम मिळवून देतात, बाजारू काळातील अस्थिरतेच्या जीवघेण्या वास्तवाला चित्रित करतात. दांभिकता, हिंस्रता आणि हतबलता यांसह समाजकेंद्रित आणि श्रमिकांशी जोडलेपणातून येणारा अपराधभावदेखील या कथांमधून दिसून येतो. मराठी कथासाहित्यात मध्यमवर्गीयांची कथा हा अलीकडे हेटाळणीचा विषय झाला होता. परंतु या कथा मध्यमवर्गीय जगण्यातील नेमके कंगोरे वास्तव-कल्पितातून उजागर करतात. समकाळाने प्रभावित केलेल्या मानवी जीवनाच्या अनेक मिती या कथनऐवजातून साकार होतात. व्यवस्थेचे अजस्त्र रूप आणि मानवी जीवनानुभवाची क्षुद्रता आकळल्याने सखदेव वास्तवाला अनेक कोनांतून प्रक्षेपित करण्यासाठी या कथांचा वापर करतात. त्यामुळे या कथा एकरेषीयता ओलांडून अनेक दिशांचे पसरलेपण घेऊन येतात. मानवी जीवनाच्या जाणीव-नेणिवांचा शोध घेत या पसरलेपणात समाजभान व्यक्त करणं हे सखदेव यांच्या कथेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट या संग्रहातून पुढे येते.” – दत्ता घोलप |
Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | 168 | Fiction | कथा संग्रह | २४० |
नंदनवनातील धोका व इतर २ कथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या ३ कथा…
१. माहितोष रॉय यांना धमकी देणाया चिठ्ठ्या वारंवार येत असतात. चौकशीअंती फेलूदाला असं समजतं की, काही दिवसांपूर्वीच एका नटाच्या बदल्यात रॉय यांना ‘अप्सरा थिएटर’ या कंपनीत घेतलेलं असतं. त्यामुळे तो नट त्यांच्यावर चिडलेला असतो. तसंच वडिलोपार्जित मालमत्तेत पुरेसा हिस्सा न मिळाल्याने रॉय यांच्या सख्ख्या भावाचाही त्यांच्यावर राग असतो. फेलूदाच्या चातुर्याचा कस लागतो अप्सरा थिएटर प्रकरणात!
२. फेलूदा, तपेश आणि लालमोहनबाबू काश्मीरला फिरायला जायचं ठरवतात. तिथे त्यांची ओळख माजी न्यायाधीश मलिक यांच्याशी होते. मलिक हे शिक्षा दिलेल्यांच्या आत्म्यांशी संवाद साधतात आणि त्यांनी दिलेली शिक्षा योग्य होती की नाही, हे पडताळून पाहतात. अचानक फेलूदावर हल्ले व्हायला सुरुवात होते, आणि मलिक यांची निर्घृण हत्या केली जाते. आणि समोर उभा राहतो – नंदनवनातील धोका!
३. लखनौला जाताना फेलूदाची श्रीयुत बिश्वास यांच्याशी ओळख होते. त्यांच्या घराण्याचा रंजक इतिहास ऐकताना असं समजतं की, एकेकाळी प्रसिद्ध असलेली नटी शकुंतला यांचा कंठहार त्यांच्याकडे जपून ठेवलेला आहे. एके दिवशी तो हार अचानक गायब होतो. पण मौल्यवान असलेला शकुंतलेचा कंठहार फेलूदा ‘युक्ती’ने शोधून काढतो!
Reviews
There are no reviews yet.