रोहन प्राइम New Layer सभासद व्हा! रोहन साहित्य मैफल वाचनानंद घ्या! रोहन प्राइम खरेदी करा

Best Marathi books, Marathi books in india, best marathi books in india, best books in india, online marathi books, online best marathibooks, online books in india

'रोहन'ची पुस्तकं जाणून घ्या...

एक कळी दोन पानं

लेखक : डॉ. अलका कुलकर्णी


चहा !

जगातील दोन नंबरचं पेय… पहिला नंबर अर्थात पाण्याचा. पावणे पाच हजार वर्षांपासून मानवजात चहा पितेय,  त्याच्या लागवडीसाठी अनेक भूखंड बळकावतेय, अनेक युद्धं लढतेय… अशा या चहाच्या मळ्याच्या पार्श्वभूमीवर रंगवलेली ही कादंबरी. ही कहाणी आहे एका संघर्षाची; स्वातंत्र्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या मजुरांच्या लढ्याची ! स्वतःच्या देशात मजूर म्हणून राबणारा गोरा साब- क्रेग ब्रोडी भारतात येऊन एका चहाच्या मळ्याचा मालक बनतो आणि त्याचबरोबर वेठबिगार म्हणून राबणाऱ्या शेकडो जीवांचाही ! कथानक फिरतं ते दोन प्रमुख पात्रांभोवती ब्रोडीचा औरस मुलगा जेम्स आणि ब्रोडीलाही अज्ञात असलेला त्याचा अनौरस मुलगा जॉर्ज… एक असतो वसाहतवादी ‘गोरा साहेब’ आणि एक स्वतंत्र भारतातला ‘काळा साहेब’. पिचलेले साधे मजूर बिरजू, भोला, सावित्री, गंगा, चंपा, मौनिमौसी एकीकडे आणि त्यांचे प्रश्न समजून घेणारी, त्यांच्या हक्कांसाठी प्रयत्न करणारी मिसेस ब्रोडी म्हणजेच जेन दुसरीकडे. ही सगळीच पात्रं चहाच्या मळ्यातील हा संघर्ष जिवंत करतात. कथानकाच्या ओघाने मजुरांना सोसावे लागणारे अन्याय, मानहानी, अपार कष्ट चहाच्या शेतीतील शोषणाचा इतिहास सांगून जातात. जगभरात पैदास होणाऱ्या चहापैकी

८० टक्के चहा पिकवणाऱ्या भारतातल्या चहामळ्यांतील संघर्षाची संवेदनशील कादंबरी..

295.00 Add to cart

रुह

लेखक : मानव कौल
अनुवाद : नीता कुलकर्णी


काश्मिरी लोकांच्या आत्म्याला झालेल्या जखमांची हळवी कथा


माझी नजर तिथे खिळून आहे… जिथून तुझा परिमळ दरवळतो आहे… जिथून तू दिलेली हाक मला साद घालते आहे त्याच त्या सफेद भिंतीतल्या निळ्या दरवाजाकडे !


 

295.00 Add to cart

कथाविविधा

सुहास बारटक्के


आपल्या रोजच्या आयुष्यात भावनांचं खमंग मसालेदार मिश्रण असतं … एखादा दिवस रागाचा असतो तर एखादा छानश्या हास्याचा, एखादा नुसताच आठवणींचा आणि एखादा अनाकलनीय भितींचा… या सगळ्या मिश्रभावना आपलं जीवन विविधरंगी बनवत असतात. अशा विविध भावनांची खमंग फोडणी असलेला खुसखुशीत कथासंग्रह सुहास बारटक्के खास वाचकांसाठी घेऊन आले आहेत. यातल्या काही कथा मनसोक्त हसवतात, काही विचारप्रवृत्त करतात, काही कथा वाचून पाठीच्या कण्यातून भीतीची शिरशिरी दौडत जाते, तर काही व्यक्तिरेखात्मक लेख अनोख्या व्यक्तिंशी, प्रसंगांशी भेट घडवून देतात. बारटक्के यांना अनेक वर्षांचा अध्यापनाचा, पत्रकारितेचा आणि लेखनाचा अनुभव आहे. त्यांच्या लेखनातून हे अनुभव समर्थपणे डोकावताना दिसतात. ‘हार्ट टू हार्ट’, ‘चांडाळणीचं भूत’ सारख्या नर्मविनोदी कथा असोत किंवा ‘व्हायन’, ‘उपरा’ आणि ‘शेवंता’सारख्या मनाला स्पर्शन

जाणाऱ्या कथा असोत, या सर्व कथा वाचकाला समाधान देतात,

वेगळी अनुभूती देतात. सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या

विविध ढंगांच्या कथांचा संग्रह… कथाविविधा

150.00 Add to cart

वशाट आणि इतर कथा

सुहास बारटक्के


आपल्या रोजच्या आयुष्यात भावनांचं खमंग मसालेदार मिश्रण असतं… एखादा दिवस रागाचा असतो तर एखादा छानश्या हास्याचा, एखादा नुसताच आठवणींचा आणि एखादा अनाकलनीय भितींचा… या सगळ्या मिश्रभावना आपलं जीवन विविधरंगी बनवत असतात. अशा विविध भावनांची खमंग फोडणी असलेला खुसखुशीत कथासंग्रह सुहास बारटक्के खास वाचकांसाठी घेऊन आले आहेत. यातल्या काही कथा मनसोक्त हसवतात, काही विचारप्रवृत्त करतात, काही कथा वाचून पाठीच्या कण्यातून भीतीची शिरशिरी दौडत जाते, तर काही व्यक्तिरेखात्मक लेख अनोख्या व्यक्तिंशी, प्रसंगांशी भेट घडवून देतात. बारटक्के यांना अनेक वर्षांचा अध्यापनाचा, पत्रकारितेचा आणि लेखनाचा अनुभव आहे. त्यांच्या लेखनातून हे अनुभव समर्थपणे डोकावताना दिसतात.

‘चिनी कम’, ‘नोटबंदीचा दणका’सारख्या नर्मविनोदी कथा मनाला गुदगुल्या करत हसवतात, तर ‘उपाध्येंचा अहंकार’, ‘खिचडी’ आणि ‘वशाट’ सारखी शीर्षक कथा मनाला खोल स्पर्शन जातात. या कथांमुळे वाचकाला वेगळी अनुभूती मिळत जाते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या विविध ढंगांच्या कथांचा संग्रह…

वशाट आणि इतर कथा

150.00 Add to cart

मंत्र

बिनायक बंदोपाध्याय
अनुवाद : सुमती जोशी


… पितृछत्र हरपलेल्या कोवळ्या वयातल्या उत्तरणला त्याची आई संन्यासी ब्रह्मचारी ठाकूर यांच्या पायाशी समर्पित करते. परंतु कठोर वास्तवाच्या आघातामुळे एके दिवशी उत्तरणला आश्रम सोडून निघून जावं लागतं. आश्रम सोडल्यानंतर जिच्या घरी त्याला आसरा मिळतो, त्या अनसूयेला उत्तरणच्या सेवेत स्वतःला वाहून घ्यायचंय. संसार करावा की व्रतस्थ आयुष्य जगावं अशा संभ्रमावस्थेत असतानाच उत्तरण विचारांच्या एका वळणावर अनुसूयेसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतो.

हे नातं पुढील आयुष्यात कोणतं वळण घेतं? उत्तरणपुढे कोणते पेच निर्माण होतात? या व इतर पेच प्रसंगांची उकल कशी होत जाते? लेखक बिनायक बंद्योपाध्याय त्यांच्या संवादी शैलीत ही कथा या कादंबरीत समर्थपणे रंगवत जातात.

ईश्वरासोबत एकरूप होत आयुष्यातील विविध प्रश्नांची उत्तरं शोधू पाहणाऱ्या एका ‘संसारी संन्याशाची’ अध्यात्मिक धाटणीची कादंबरी… मंत्र !

240.00 Add to cart

दैत्येर बागान… अर्थात दैत्याचा बगीचा

शाश्वती नंदी
अनुवाद : सुमती जोशी


हा माणूस किती मोठा क्रिमिनल आहे, ते त्याच्याकडे बघून कधीच समजलं नसतं. अनेक दिवस त्याने सगळ्यांना मूर्ख बनवलं. दिवसेंदिवस माती उकरत राहिला, कुदळीचे घाव घालत राहिला, माती दाबून-पसरून त्या कबरींवर फुलझाडं लावत गेला. रोपं रुजली, मोठी झाली, फुलंही येऊ लागली. रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या विखुरल्या जात होत्या. तिथे पाकळ्यांची रंगीबेरंगी अल्पना सजवली जात होती. ते बघून लोक मुग्ध होत होते पण बागेतल्या त्या मातीखाली थरावर थर रचून काय दडवलं जात होतं?…ख्यातनाम बंगाली साहित्यिक शाश्वती नंदी यांनी साकारलेली सत्य घटनेवर आधारित एक खिळवून ठेवणारी थरारक कादंबरी… दैत्येर बागान !

195.00 Add to cart

इलोनवरचा संघर्ष

साधना शंकर
अनुवाद : इंद्रायणी चव्हाण


सीनीचा मृत्यू झाला आणि सगळं काही बदलून गेलं. कित्येक वर्ष टिकून राहिलेल्या शांततेचा भंग झाला!

काही शेकडो वर्ष इलोन या ग्रहावर स्त्री आणि पुरुष आपापल्या सीमारेषा आखून वेगवेगळे राहत होते. पृथ्वीवरचे एकेकाळचे एकमेकांचे साथीदार आता परस्परांचे विरोधक झाले होते. त्यांनी आपापल्या भागात शहरं वसवली होती, अमरत्व प्राप्त केलं होतं आणि मीलनाशिवाय संतती निर्मिती करायचं तंत्रज्ञानही अवगत केलं होतं स्वतंत्रपणे !

पण सीनीच्या मृत्यूनंतर, स्त्री आणि पुरुष पुन्हा युद्धाची – निर्णायक संघर्षाची भाषा बोलू लागले. इतकी वर्षं त्यांच्यात जी शांतता प्रस्थापित झाल्यासारखी वाटत होती, ती खोटी, आभासी तर नव्हती, की तो एक दीर्घ विराम होता? हा संघर्ष किती काळ चालणार होता? या संघर्षाचे परिणाम महाभयानक होते. दोन्ही बाजू संघर्षाच्या टोकावर पोचल्या होत्या. पण प्रत्यक्ष संघर्ष झाला का?

विनाश टळला का? फँटसीच्या साहाय्याने विचारही करता येणार नाही अशी सामाजिक रचना उभारून स्त्री-पुरुष संबंधांवर, त्यांच्या सहजीवनावर भाष्य करणारी ‘कल्पित’ कादंबरी

इलोनवरचा संघर्ष !

375.00 Add to cart

इत्रनामा

हिनाकौसर खान


ही गोष्ट ऐन पंचविशीतल्या नाझियाची. तिच्या पत्रकारितेची, तिच्या मुस्लीम असण्याची, तिच्या सामाजिक जाणिवांची, तिच्या मैत्रीची आणि तिच्या प्रेमाचीही !

जगण्याविषयीच्या कल्पना मनात स्पष्ट असणाऱ्या नाझियाला सुमीत भेटतो. समंजस, शहाणा आणि थोडासा कन्फ्युज्डही ! दोघंही एकमेकांत गुंतत जातात. भलेही अलीकडचे काही तरुण धर्म-जात मानत नसतील, मात्र नकळत्या वयात झालेल्या संस्कारांची सोबत तर प्रत्येकाबरोबर असतेच. प्रेमात सबकुछ करायला तयार असणारी मंडळी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र गोंधळून जातात, अशावेळी उमगलेली आस्था आणि न उमगलेली आस्था यांच्यातलं घर्षण अटळ होऊन जातं. या सगळ्या व्यवहार-संघर्षातून नाझिया आणि सुमीतही सुटलेले नाहीत.

लहानपणापासूनचा नाझियाचा घट्ट मित्र असद हा तिच्याच धर्मातला… तिच्या विचारांचा, तिच्या स्वप्नांचा आदर करणारा आणि तिच्यावर बेहद प्यार करणाराही… पण प्रेम असं सोयीने करता येतं का? अनेक पेच, अनेक प्रश्न…

प्रेम, मैत्री, आस्था, आस्तिकता आणि मानसिक

आंदोलनाच्या विवरात अडकलेल्या या तिघांची

धर्मापलीकडे जाणारी कादंबरी…

350.00 Add to cart

द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट

क्रिकेट या सुसंस्कृत खेळाबरोबर असलेलं माझं आजन्म प्रेमप्रकरण
_______________________________________________________________________

रामचंद्र गुहा
अनुवाद  : अजेय हर्डीकर


भारतात गल्ली-बोळांत, छोट्या-मोठ्या मैदानांत उपलब्ध साधनांद्वारे क्रिकेट खेळलं जातं आणि हा खेळ पाहणारेही जागच्या जागी थबकून, जीव ओतून तो पाहत असतात; इतका क्रिकेट हा खेळ भारतीयांच्या नसानसांत भिनला आहे!

क्रिकेटचा चाहता आणि काही वर्ष स्थानिक क्रिकेट खेळलेला एक खेळाडू या नात्याने ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी भारतीय क्रिकेटचा इतिहास आत्मकथनपर शैलीत या पुस्तकात सांगितला आहे.

क्रिकेट हे त्यांचं प्रेमप्रकरण आहे, असं सुरुवातीलाच सांगून ओघवत्या व सहज-सुंदर शैलीत त्यांच्या बालपणीच्या क्रिकेटच्या आठवणी, तेव्हाचे स्थानिक, राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरचे त्यांचे ‘हिरो’ खेळाडू, त्यांची बलस्थानं आणि मर्यादा यांबद्दल ते कथन करतात. तसंच शालेय, कॉलेज, क्लब, राज्य आणि देश अशा सर्व पातळ्यांवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटचं महत्त्वही ते पुस्तकात आवर्जून विशद करतात.

पुस्तकातील शेवटच्या भागात भारतीय क्रिकेट बोर्डाच्या नियामक मंडळामध्ये नियुक्त प्रशासक म्हणून काम करताना आलेले अनुभव परखडपणे मांडून ते आजच्या बदललेल्या क्रिकेट-संस्कृतीची चिकित्साही करतात.

क्रिकेट खेळावर निस्सीम प्रेम करणाऱ्या विचारवंत इतिहासकाराचं क्रिकेटच्या आठवणींना उजाळा देणारं आणि वाचकालाही त्या काळाची सफर घडवून आणणारं प्रांजळ कथन… द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट!

450.00 Add to cart

घर खऱ्या अर्थाने समृद्ध करणारी पुस्तकं

Best Marathi books in india
खाली तुमचा ईमेल भरा, आमच्यासोबत जोडलेले रहा!

अपडेट्स जाणून घ्यायचेत? नवे लेख वाचायचेत?