‘आहार-गाथा’ या पुस्तकातील निवडक अंश
डॉ. कमला सोहोनी : एक विदुषी योगिनी सामान्यत: प्रकाशकाने लेखकाचा किंवा लेखिकेचा परिचय करून देण्याचा प्रघात मराठीत नाही. पण मला या पुस्तकाच्या संदर्भात लेखिका डॉ. कमलाबाई सोहोनी यांचा परिचय मुद्दाम करून द्यावासा वाटतो. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कमलाबाईंचे जीवन, त्यांचा अभ्यास व त्यांचे संशोधन यांचा या पुस्तकाशी फार निकटचा संबंध आहे. कमलाबार्इंच्या कर्तुत्वाची ओळख झाल्याने [...]