हितगुजातून उलगडलेली वहिदा रेहमान

एका प्रतिभासंपन्न अभिनेत्रीचा चित्रपट व जीवनप्रवास तिच्याच शब्दांत

नसरीन मुन्नी कबीर यांची हिंदी चित्रपटविश्वाबद्दलची सोळाहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यांनी यूकेतल्या ‘चॅनेल फोर’साठी टीव्ही मालिकांची निर्मिती केली आहे. या चॅनेलसाठी त्या सल्लागार म्हणून काम करतात. तसंच त्या ‘ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट बोर्डा’च्या माजी गव्हर्नर होत्या. सध्या त्या लंडनमध्ये वास्तव्यास असतात.

अनुवाद :
गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.

प्रतिभा, आगळं सौंदर्य आणि व्यक्तिरेखा समजून घेऊन त्यात जीव ओतण्याची असामान्य क्षमता व बुध्दिमत्ता या बळावर वहिदा रेहमानने चित्रपटसृष्टीत आपलं विशेष स्थान निर्माण केलं. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात (१९५५-७५) गुरू दत्त, विजय आनंद ते सत्यजित राय यांसारख्या महान दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून तिने आव्हानात्मक भूमिका साकार केल्या आणि एकप्रकारे ती पर्यायी स्त्री-प्रतिमांसाठी अवकाश निर्माण करणारी अभिनेत्री ठरली. ‘प्यासा’, ‘गाइड’, ‘अभिजान’, ‘मुझे जीने दो’, ‘तीसरी कसम’, ‘खामोशी’ आदी चित्रपटांतील तिच्या सघन-सजीव व्यक्तिरेखा अविस्मरणीय व कायमस्वरूपी ठसा उमटवणार्‍या ठरल्या… आजकालच्या ‘रंग दे बसंती’ किंवा ‘दिल्ली-६’ पर्यंत तो ठसा कायम आहे.
‘आज फिर जीने की तमन्ना है’ म्हणत पडद्यावर स्त्री-स्वातंत्र्याचा उद्धोष करणारी ही अभिनेत्री पडद्यामागील जीवनाबाबत नेहमीच मितभाषी राहिली. लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्रीला तिच्या भूमिकांबाबत, तिच्या व्यक्तित्वाबाबत आणि तिच्या जीवनप्रवासाबाबत बोलतं केलं आणि त्या बहुस्पर्शी संवादावर आधारित ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ वहिदा रेहमान’ हे इंग्रजी पुस्तक साकार केलं. त्याच इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी सिध्द केलेला हा मराठी अनुवाद- वहिदा रेहमान…हितगुजातून उलगडलेली!

295.00 Add to cart

भारत : समाज आणि राजकारण

यशवंतराव चव्हाण यांचे प्रगट चिंतन

डॉ. जयंत लेले हे कॅनडातील किंग्स्ट्न येथील क्वीन्स विद्यापीठातील राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि जागतिक विकास ह्या विषयांचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले असून आता ते तिथेच सन्माननीय प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. जयंत लेले हे ‘शास्त्री इंडोकॅनेडिअन इन्स्टिट्यूट’चे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष होते. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि आर्थिक प्रश्नांवर बरंच लिखाण केलं आहे. भारत आणि दक्षिणपूर्ण आशियावरच्या अनेक पुस्तकांचे ते लेखक आणि संपादक आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय विकासावरची त्यांची पुस्तके आणि लेख अनेक विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून वापरली जातात.

अनुवाद:

आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करून देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी तीन खंडांमधून आत्मचरित्र लिहिण्याचे ठरवले होते. प्रत्यक्षात त्यातील एकच खंड प्रकाशित होऊ शकला. प्रा. जयंत लेले यांच्या प्रदीर्घ मुलाखतसत्रांतून आकारास आलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे एका अर्थाने यशवंतरावांनी लेले यांना सांगितलेले आत्मचरित्र म्हणावे लागते. ‘‘हा मी स्वत:शी करत असलेला संवाद आहे” असे स्वत: यशवंतरावच म्हणतात यात सारे काही आले. यशवंतरावांचे राज्य व राष्ट्र या दोन्ही पातळ्यांवरचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक दृष्टिकोन आणि व्यवहार यांचा हा सखोल अभ्यास आहे. विशेष म्हणजे हा अभ्यास जागतिक पातळीवरील स्थित्यंतरांच्या संदर्भात करण्यात आलेला असल्याने तो एकमेवच मानावा लागतो. आपण मनापासून स्वीकारलेली स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे एकीकडे व प्रत्यक्ष राजकीय व्यवहार दुसरीकडे. तर प्रसंगी स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांमधील द्वंद्वावर मात करण्याची यशवंतरावांची धडपड लेले यांनी हळुवारपणे उकलली आहे. चव्हाण साहेबांची राजकीय भूमिका व शैली यांच्यासाठी त्यांनी केलेला सैद्धांतिक व्यवहारवाद हा शब्दप्रयोग अत्यंत समर्पक म्हणावा लागेल.

स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान झालेली यशवंतरावांची वैचारिक वाटचाल, स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई राज्याच्या व द्वैभाषिकाच्या कायदेमंडळात घडलेला प्रशासक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अविचलपणे राष्ट्रीय व प्रादेशिक हितसंबंधांचा मेळ घालणारा मुत्सद्दी, चिनी आक्रमणामुळे अचानकपणे अंगावर आलेली जबाबदारी पेलणारा खंबीर नेता व विचारवंत असे अनेक पैलू या ग्रंथातून उलगडतात. महाराष्ट्र आणि भारत या दोन्ही स्तरांवरील सहकारी व स्पर्धक यांच्याशी आपल्या मानवी पातळीवरील संबंधांविषयी इतक्या स्पष्टपणे यशवंतराव कधीच बोलले नव्हते. या सर्व गोष्टींचा उपयोग राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत वावरणाऱ्यांना तर होईलच पण महाराष्ट्राने यशवंतरावांचा कृतज्ञतापूर्वक अभिमान का बाळगायचा हे देखील समजेल.

600.00 Add to cart

स्पर्धा काळाशी

भाषणे व मुक्त संवाद

भारतीय राजकारणात गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले नेते. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार अतिशय महत्वाची भूमिका बजावत आले आहेत. त्यांनी त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्वाची पदं भूषवली आहेत. ती म्हणजे- तीनदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद, संरक्षण मंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री. १९९९मध्ये त्यांनी राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. २००५ ते २००८ शरद पवार BCCIचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. २०१० ते २०१२ या काळात त्यांनी ICCचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. गेली अनेक वर्षं राजकारणाशिवाय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ते उल्लेखनीय काम करत आहेत. ते अतिशय जाणकार वाचक असून राजकारण, समाजकारणाशिवाय मराठी साहित्यातील नवीन लेखन नेहमी वाचत असतात.

आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण कार्यक्रमास १९९१ साली आम्ही जो प्रारंभ केला त्या संदर्भात शरदजींच्या असलेल्या बांधीलकीचे मला या ठिकाणी स्मरण होते. किंबहुना आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी १९८०च्या दशकात राजीव गांधी यांनी उचललेल्या अनेक धाडसी पावलांना शरदजींनी पाठिंबाच दर्शविला होता.
महाराष्ट्राच्याही पलीकडे राजकारण आणि सार्वजनिक जीवनाच्या प्रांतात — राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापक अनुभव शरदजींच्या गाठीशी आहे. प्रस्तुत ग्रंथात संकलित केलेल्या त्यांच्या विचारांमध्ये त्या अनुभवांचे प्रतिबिंब स्वाभाविकपणेच डोकावते. अनेक बाबतीतील त्यांच्या भूमिकेशी सुसंवादी अशीच माझी भूमिका असते. विशेषत: आर्थिक धोरण, सातत्यशील विकास आणि आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक बाबी यांचा निर्देश या संदर्भात करता येईल. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपयोजन राष्ट्रीय विकासासाठी करण्याबाबत दृढबांधीलकी असणार्‍या आमच्या काही अत्यंत प्रगल्भ नेत्यांमध्ये शरदजींची गणना होते. एक आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास येऊ शकतो, या त्यांच्या मताशी मी सहमत आहे.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग

375.00 Add to cart

स्पर्धा काळाशी (डिलक्स आवृत्ती)

500.00 Add to cart