चतुर
साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त लेखकाची तिसरी कादंबरी…
चतुर
खरंतर गोष्ट आहे तशी साधी…
मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे.
फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.
साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त लेखकाची तिसरी कादंबरी…
चतुर
खरंतर गोष्ट आहे तशी साधी…
थरारक आणि स्वानुभवातून उतरलेली इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणारी कथा… टेरर इन इस्लामाबाद !
लेखक अमर भूषण यांनी राज्य आणि केंद्रीय इंटेलिजन्स एजन्सींसाठी व खासकरून ‘रॉ’साठी काम केलं आहे. भारताच्या तांत्रिक इंटेलिजन्स सव्हिसचे प्रमुख म्हणून २००५मध्ये ते निवृत्त झाले.
द झीरो – कॉस्ट मिशन जमात – ए – इस्लामीच्या कारवायांमुळे भारत – बांगलादेश संबंध बिघडतात. कारण असतं जमातच्या छावण्यांमधून केली जाणारी पाकिस्तानच्या आय.एस.आय.ला मदत. या छावण्यांत प्रशिक्षित एजंट्स भारतात पाठवून दहशतवादी कारवाया करतात. भारताच्या एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या बांगलादेश ऑपरेशन्सचे प्रमुख विजय शुक्ला एक धाडसी प्लॅन आखतात. त्यासाठी आवश्यक असतो अंगी कौशल्यं असलेला, आव्हानांना भिडण्याची वृत्ती असलेला आणि गरज पडली तर वरिष्ठांबद्दल काहीशी बेफिकिरी दाखवू शकणारा माणूस. असे गुणधर्म अंगी असतील असा ‘ऑपरेटिव्ह’ एजन्सीला मिळेल? मुख्य म्हणजे त्यांची योजना यशस्वी होईल ?
थरारक आणि स्वानुभवातून उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा… द झिरो कॉस्ट मिशन आणि द वायली एजन्ट !
लेखक अमर भूषण यांनी राज्य आणि केंद्रीय इंटेलिजन्स एजन्सींसाठी व खासकरून ‘रॉ’साठी काम केलं आहे. भारताच्या तांत्रिक इंटेलिजन्स सव्हिसचे प्रमुख म्हणून २००५मध्ये ते निवृत्त झाले.
२०२१ चा साहित्य अकादेमी युवा पुरस्कार प्राप्त लेखक प्रणव सखदेव लिखित ३ कथासंग्रहांचा संच
प्रणव सखदेव लिखित ३ कथासंग्रह
१) दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट
२) निळ्या दाताची दंतकथा
३) नाभीतून उगवलेल्या वृक्षाचे
रु. ७४० ची पुस्तकं सवलतीत रु. ५९५ (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!
२०२१ चा साहित्य अकादेमी युवा पुरस्कार प्राप्त लेखक प्रणव सखदेव लिखित ३ कादंबऱ्यांचा संच
प्रणव सखदेव ३ कादंबऱ्या
१) चतुर
२) ९६ मेट्रोमॉल
३)काळेकारडे स्ट्रोक्स
रु. ६६० ची पुस्तकं सवलतीत रु. ५२० (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!
मिशन नेपाळ आणि द वॉक इन !
सत्य घटनांवर आधारित थरारक तितक्याच खिळवून ठेवणाऱ्या कथा
३) द झीरो- कॉस्ट मिशन
लेखक अमर भूषण यांनी राज्य आणि केंद्रीय इंटेलिजन्स एजन्सींसाठी व खासकरून ‘रॉ’साठी काम केलं आहे. भारताच्या तांत्रिक इंटेलिजन्स सव्हिसचे प्रमुख म्हणून २००५मध्ये ते निवृत्त झाले.
टपाल खर्चासहित पूर्ण संच रु. ७००
भविष्यकालीन विज्ञानाचा वेध घेऊन विद्यार्थ्यांना केलेलं बहुमोल मार्गदर्शन
भारताचे माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मुलांचे लाडके ‘शिक्षक’ ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि विख्यात तरुण लेखक सृजन पाल सिंग यांनी सखोल संशोधनातून हे पुस्तक साकारलं आहे. यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अतुलनीय कामगिरीने आपण काय साध्य केलं आहे व त्याचे आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहेत, याची रंजक माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकातून त्यांनी भविष्यकालीन विज्ञानाचा, त्यातील क्षेत्रांचा वेध घेऊन त्याविषयीचं व्यापक चित्र आजच्या विद्यार्थ्यांपुढे उभं केलं आहे. तसंच भविष्यात विज्ञानात मोठ्या प्रमाणावर विकसित होणार्या रोबोटिक्स, एरोनॉटिक्स (विमानविद्या), स्पेस सायन्स (अंतराळ विज्ञान), न्यूरोसायन्स (मेंदू विज्ञान) यांसारख्या ‘आउट ऑफ द बॉक्स’ करिअर्सचा सहजसोप्या भाषेत, पण सखोल परिचय करून दिला आहे.
किशोरांसाठी मार्गदर्शक असा ३ पुस्तकांचा सप्रेम भेट संच
डॉ. कलामांनी जे विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं त्याचं तपशीलवार विवेचन या तीनही पुस्तकात वाचायला मिळेल. कलामांच्या विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत खास करून तरूण पिढीपर्यंत व्हावा म्हणून त्यांना वाहिलेली ही शब्दांजली…
अनुवाद :
तबलावादक, संगीतकार आणि तालतज्ज्ञ झाकीर हुसेन हे जागतिक पातळीवरचं ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्व. उस्ताद अल्लारखाँ यांचे सर्वांत मोठे सुपुत्र. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा जाहीर वादन केलं आणि त्यानंतर ते संगीत क्षेत्रातला ‘चमत्कार’ समजले गेले! त्यानंतर कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी तसंच नर्तकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार झाले. याबरोबरच झाकीर यांनी आपल्या सर्जकतेतून जाझ आणि जागतिक संगीतातही आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक प्रसिद्ध वादकांसोबत जगभरात कार्यक्रम केले तसंच एकलवादनही केलं. जॉन मॅकलॉघ्लिन, एल. शंकर आणि टी.एच. विनयक्रम यांच्यासोबत त्यांनी ‘शक्ती बँड’ स्थापन करून संगीत क्षेत्रात इतिहास रचला. त्यांनी जगविख्यात दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत दिलं, तसंच काही चित्रपटांत अभिनयही केला. नसरीन मुन्नी कबीर यांनी झाकीर हुसेन यांच्याशी साधलेल्या या प्रदीर्घ संवादात आपण झाकीर यांची जीवनकहाणी त्यांच्याच तोंडून ऐकतो. त्यांचं बालपण कसं होतं, माहीममध्ये त्यांनी व्यतीत केलेली सुरुवातीची वर्षं, असामान्य प्रतिभेच्या वडिलांकडून त्यांनी वयाच्या चवथ्या वर्षापासून घेतलेले तबलावादनाचे धडे, पं. रवी शंकर, उस्ताद अली अकबरखॉँ आणि उस्ताद विलायतखॉँ यांसारख्या प्रतिभावंतांसोबत काम करताना आलेले अनुभव, आठवणी आणि किस्से यांतून संगीताचं अनोखं विश्व आपल्यासमोर येतं. यात झाकीर आपल्याला त्यांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान, संगीताबद्दलची त्यांची समज, गुरू-शिष्य नातं आणि तबलावादनावर असलेलं त्यांचं निस्सीम प्रेम याबद्दल कधी मिश्किलपणे तर कधी समर्पित भावनेने बोलतात. एक विख्यात कलावंत म्हणून अमेरीका व भारत या दोन्ही देशांत आयुष्य व्यतीत करण्याची कसरत त्यांनी कशी साधली आहे याविषयीही ते मोकळेपणाने सांगतात.
व्यवसाय किंवा नोकरी-धंद्यातील प्रगतीसाठी…
चांगला उद्योजक / व्यावसायिक / नोकरदार होण्यासाठी
तुम्ही ‘जागरूकपणे’ प्रयत्न करायला तयार आहात?
सुप्रसिद्ध लेखक, ‘माइंडट्री’ कंपनीचे संस्थापक सुब्रोतो बागची यांनी
‘द प्रोफेशनल’ (मराठी आवृत्ती : मैत्री व्यावसायिकतेशी) हे पुस्तक लिहिलं आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. या पुस्तकात त्यांनी व्यावसायिकतेबद्दल त्यांच्या अनुभवांआधारे भाष्य केलं होतं, तर ‘तुमचा सच्चा साथीदार’मध्ये त्यांनी व्यावसाययिकांमध्ये आवश्यक असणार्या गुणांचा विकास व्हावा, यासाठी एका वर्कबुकचीच निर्मिती केली आहे.
या पुस्तकात त्यांनी चांगला व्यावसायिक होण्यासाठी आवश्यक असलेल्या २५ गुणांबद्दल थोडक्यात, पण मौलिक माहिती दिली आहे. तसंच हे गुण आपल्या अंगी कसे बाणवावेत, ते अधिकाधिक विकसित कसे करावेत, हे आपलं आपल्यालाच समजावं यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रश्नही विचारले आहेत. त्यांची उत्तरं देण्यासाठी पुस्तकात मोकळ्या जागा देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी आपल्याला सामोरे जावे लागणारे, आपल्या क्षमतांचा कस लावू पाहणारे वेगवेगळे घटना-प्रसंगही देण्यात आले आहेत. त्या घटना-प्रसंगांत तुम्ही कसं वागाल, काय कृती कराल हे पुस्तकात लिहायला सांगितलं आहे. कधीकधी आधी दिलेल्या उत्तरांचं पुनरावलोकन करायलाही सांगितलं आहे.
‘प्रत्यक्ष स्वाध्याय’ करायला लावून स्वत:च्या आत डोकवायला लावणारं हे आगळंवेगळं पुस्तक सगळ्या व्यवासायिकांना, उद्योजकांना आणि नोकरदारांना मौलिक मार्गदर्शन तर करेलच, शिवाय व्यावसायिक जीवनातला ‘तुमचा सच्चा साथीदार’ही होईल !
काळेकरडे स्ट्रोक्स’नंतरची प्रणव सखदेव यांची ही दुसरी कादंबरी. रूढार्थाने ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ वास्तववादी कादंबरी आहे तर ‘96 मेट्रोमॉल’ ही अद्भुतिका! दोन्ही कादंबऱ्यांचे प्रोटॅगनिस्ट युवक असले, तरीही दोघांचे जीवनमार्ग पूर्णत: भिन्न आहेत, त्यांचं जग भिन्न आहे, त्यांतले घटना-प्रसंग, अनुभवविश्व भिन्न आहे. त्यामुळेच या दोन्ही कादंबऱ्या एकाच लेखकाच्या असल्या तरी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं भाग आहे!
‘96 मेट्रोमॉल’मधला मयंक एका काल्पनिक जगात प्रवेश करतो; हे जग असतं वस्तूंचं – आपण रोज वापरत असलेल्या वस्तूचं ! मयंकचा या वस्तूंशी जसजसा संबंध येऊ लागतो तसतसं त्या वस्तूच मयंकला वापरू लागतात! आणि यातूनच घडत जाते आजच्या उपभोगवादी जगण्यावर अद्भुतिकेतून भाष्य करणारी लघुकादंबरी…96 मेट्रोमॉल !
This novel is a work of fantasy. It speaks about the growing consumerism, self centered and individualistic approach
कथा प्रेमाच्या… कथा ओढीच्या…
एका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं… Standstill!
या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल?
उदास पोकळी… की पोकळीतच उदासी राहते भरून?
समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी?
का वागतोय तो असा? ‘इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस’सारखा कधी झपाटला जातोय…
कधी ‘पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा’ गुढाकडे ओढला जातोय…
कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन
कवितांमधून व्यक्त होत जातोय…
आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे
कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग
दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते.
या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात.
मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ!
खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा
पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही!
कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनवासवरचे…
समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड
काळेकरडे स्ट्रोक्स !
माझ्या बापाने तोंड उघडलं
काही क्षण गेले असतील नसतील .
मग पहिल्यांदा त्या पत्रकाराला माझं –
या निळ्याभोर दंतराजाचं दर्शन झालं.
माझा बाप विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देत होता.
पण पत्रकारांचं सगळं लक्ष केंद्रित झालं होतं,
ते माझ्यावर – शहाणपणाच्या निळ्याभोर दंतराजावर!
माझा बाप बोलणं थांबत म्हणाला, काय झालं?
पत्रकार म्हणाला, ”तुम्हाला एक दात आहे, निळाभोर!”
बापाच्या मनात तो आवाज घुमला – ‘दंतरुपी शहाणपणा!’
तो उठणार, तोच धपकन खाली पडला आणि मेला!
आणि माझी रवानगी झाली त्या पत्रकाराच्या हिरडीत!
मानवाची फरफट आता सुरु होणार होती.
कारण माझी हि कहाणी कुणालाच ठाऊक नव्हती.
खरंतर शहाणपणाचाच शाप झाला होता!’