436 | 978-93-89458-10-7 | 96 Metromall | 96 मेट्रोमॉल | Pranav Sakhdeo | प्रणव सखदेव | काळेकरडे स्ट्रोक्स’नंतरची प्रणव सखदेव यांची ही दुसरी कादंबरी. रूढार्थाने ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ वास्तववादी कादंबरी आहे तर ‘96 मेट्रोमॉल’ ही अद्भुतिका ! दोन्ही कादंबऱ्यांचे प्रोटॅगनिस्ट युवक असले, तरीही दोघांचे जीवनमार्ग पूर्णत: भिन्न आहेत, त्यांचं जग भिन्न आहे, त्यांतले घटना-प्रसंग, अनुभवविश्व भिन्न आहे. त्यामुळेच या दोन्ही कादंबऱ्या एकाच लेखकाच्या असल्या तरी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं भाग आहे !
‘96 मेट्रोमॉल’मधला मयंक एका काल्पनिक जगात प्रवेश करतो; हे जग असतं वस्तूंचं – आपण रोज वापरत असलेल्या वस्तूचं ! मयंकचा या वस्तूंशी जसजसा संबंध येऊ लागतो तसतसं त्या वस्तूच मयंकला वापरू लागतात ! आणि यातूनच घडत जाते आजच्या उपभोगवादी जगण्यावर अद्भुतिकेतून भाष्य करणारी लघुकादंबरी…96 मेट्रोमॉल ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 128 | 18 | 12 | 1 | 100 | मोहर | Fiction | कथा-कादंबरी | 150 | 96MetromallCover | 96MetromallCoverBC.jpg |
केदारनाथची किमया आणि इतर २ कथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या ३ कथा…
१. फेलूदाला हिरो मानणार्या आपल्या पुतणीला, रुनाला एकदा अंबर सेन सांगतात की, एकदा तरी मी फेलूदाला हरवून दाखवेनच! म्हणून ते एक नाटक रचून घरातल्यांनाही त्यात सामील करून घेतात, आणि ‘गायब झालेले अंबर सेन’ शोधताना फेलूदाला उलगडतं या नाटकात दडलेलं अनपेक्षित रहस्य!
२.शंकरप्रसाद चौधरींकडे मौल्यवान अशा ‘जहांगीरच्या सुवर्णमुद्रा’ असल्याचं रहस्य चौधरींच्या जवळच्या तीन व्यक्तींनाच माहीत असतं. त्यातली एक मुद्रा चोरीला जाते. कोण असेल चोर? कसं पकडेल फेलूदा या सुवर्णमुद्रा चोरणार्याला?
३. केदारनाथच्या पर्वतातल्या एका संन्याशाकडे असते एकच ऐहिक गोष्ट – त्यांना सन्मानाने दिलेलं मौल्यवान रत्नजडित पेंडन्ट! पण त्यावर अनेकांचा डोळा असतो… फेलूदाला या प्रकरणातून बाजूला काढण्यासाठी त्याच्यावर जीवघेणे हल्ले होतात; पण ‘केदारनाथची किमया’ घडते अन् फेलूदा चातुर्याने या प्रकरणाचा छडा लावतो…!
Reviews
There are no reviews yet.