Featured

हां ये मुमकिन हे!

एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष


डॉ. तरु जिंदल
अनुवाद : रमा हर्डीकर-सखदेव


प्रसूती कक्षाच्या आत बसलेली कुत्री, शेजारीच पसरलेला बायो-मेडिकल कचऱ्याचा ढीग, दुर्गंधी पसरवणारं स्वच्छतागृह, बाळंत स्त्रियांना टाके घालणाऱ्या तिथल्याच झाडूवाल्या, स्टाफरुममध्ये एकमेकींच्या हातांना मेंदी लावणाऱ्या लेडी डॉक्टर्स…

हे दृश्य होतं बिहारमधल्या मोतिहारी जिल्हा रुग्णालयातलं आणि दृश्य बघत होती यात बदल घडवू पाहणारी प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. तरु जिंदल !

भ्रष्ट व्यवस्था, निष्क्रिय डॉक्टर्स, कुपोषणासारख्या समस्या अशा अनेक आघाड्यांवर लढत देऊन अविश्वसनीय बदल घडवून आणणाऱ्या एका तरुण डॉक्टरची प्रेरणादायी संघर्षकथा… हां, ये मुमकिन है ।



350.00 Add to cart

कोरडी शेतं… ओले डोळे

आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा… अंधारात असलेली एक सामाजिक समस्या


दीप्ती राऊत


महाराष्ट्राला गेली २५ वर्षं शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रश्न भेडसावतो आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत रोजच्या बातम्यांपासून विधी मंडळाच्या अधिवेशनापर्यंत, रोजच्या राजकारणापासून ते निवडणुकांच्या राजकारणापर्यंत हा विषय धगधगता राहिला. पण आजही आत्महत्या होत आहेत… या गंभीर समस्येची ‘जाणारा जातो पण मागे जे राहतात त्यांचं काय?’ ही बाजूही तितकीच भीषण आहे.

अनुभवी आणि संवेदनशील पत्रकार दीप्ती राऊत यांनी याच प्रश्नाचा सखोल अभ्यास केला. राज्यभर फिरून त्यांनी अशा अनेक महिलांशी संवाद करत प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. आत्महत्याग्रस्त कुटुंबांची वाताहत प्रत्यक्ष बघितली. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या अबला त्यांना भेटल्या आणि संकटाशी मुकाबला करत, त्यातून मार्ग काढत जाणाऱ्या अनेक योद्ध्याही त्यांना भेटल्या.

सामान्य जनता विचारही करू शकणार नाही अशी ही रोजची लढाई रोजच हरणाऱ्या शेकडो शेतकरी विधवांची होरपळ दाखवणारं आणि दु:खाला जिद्दीने सामोरं जाऊन लढणाऱ्यांची उदाहरणं जगासमोर आणणारं पुस्तक कोरडी शेतं…ओले डोळे !


160.00 Add to cart

आकर्षक विणकाम

लहान मुलांसाठी दोन सुईंवरील लोकरीच्या विणकामाचे नवनवीन प्रकार


[taxonomy_list name=”product_author” include=”539″]


लहानपणीच निर्माण झालेली विणकामाची आवड शकुंतला जोशी यांनी आयुष्यभर जोपासली, त्यात प्राविण्य मिळविले. छंद म्हणून सुरुवात झाली आणि विणकाम एक कला म्हणून ती विकसित होत गेली. नव्या-नव्या अत्यंत आकर्षक अशा विणींचे केवळ लहान मुलांसाठी विविध प्रकार त्यांनी या पुस्तकात दिले आहेत.
प्रमुख वैशिष्टये :
१. आकर्षक फॅशनचे कपडे / वस्तू
२. लोभस नाजूक विणी
३. आकर्षक रंगसंगती
४. सोप्या शैलीतील लिखाण
५. जास्तीत जास्त सू्चना
६. प्रत्येक वस्तूचे सुंदर, सुस्पष्ट छायाचित्र


Learning knitting with 2 needles


100.00 Add to cart

आध्यात्मिक विचारातून आनंदमयी गरोदरपण


गोपिका कपूर
अनुवाद : डॉ. अरुण मांडे 


बाळाला जन्म देण्याचा आनंद जरी अत्युच्च असला तरी त्याविषयी मनात नाना तऱ्हेच्या शंकाही निर्माण झालेल्या असतात. जसं की, ‘गरोदरपणाचे नऊ महिने व्यवस्थित जातील की नाही?’ ‘मला प्रसूतीवेदना सहन होतील का?’ ‘बाळाचं संगोपन आपण उत्तम प्रकारे करू शकू की नाही?’ आध्यात्मिक विचार आणि शास्त्रीय माहिती यांची योग्य सांगड घालत लेखिका गोपिका कपूर त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांच्या आधारे अशा प्रकारच्या द्विधा मन:स्थितीतील शंका-समस्यांसाठी काही सोपे व विचारपूर्ण मार्ग या पुस्तकात देत आहेत.
* अनपेक्षित गर्भधारणा
* हार्मोन्सचा गोंधळ
* नातेवाईकांचे अनाहूत सल्ले
* बाळंतपणानंतरची लैंगिकतेविषयी मानसिकता
* प्रसूतीच्या पर्यायी पध्दती
* गरोदरपणात घ्यावयाची शरीराची काळजी आणि गर्भधारणेपासून ते बाळ जन्माला येईपर्यंत सकारात्मक विचार व उल्हसित वृत्ती कशी ठेवावी याचे साधे सोपे पण परिणामकारक उपाय लेखिका सांगते.
बाळ गर्भाशयात असतानाच त्याचं आईशी एक भावनिक नातं तयार होतं. या पुस्तकामुळे ते नातं दृढ व्हायला नक्कीच मदत होईल.


125.00 Add to cart

आपली मंगळागौर

पूजा, खेळ, आरत्या


[taxonomy_list name=”product_author” include=”491″]


मंगळागौरीचे खेळ, त्यातील गाणी, काव्ये हा एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवाच आहे. हा ठेवा जतन व्हावा, नव्या पिढीला, परदेशस्थांना मंगळागौर अधिक विविधतेने साजरी करता यावी या दृष्टीने सौ. वैजयंती केळकर यांनी मोठया कसोशीने आणि काटेकोरपणे सर्व माहिती संग्रहीत केली आहे. मंगळागौरीचे सामाजिक महत्त्व, पूजेची तयारी, व्रतकथा, पूजा, आरत्या आणि प्रामुख्याने अनेकविध खेळ,असंख्य पारंपरिक गाणी, उखाणे… अर्थात् मराठी संस्कृतीचा एक जतनशील ठेवा आपल्यासाठी- ‘आपली मंगळागौर’ या पुस्तकाच्या स्वरूपात!



75.00 Add to cart
Featured

काळेकरडे स्ट्रोक्स


प्रणव सखदेव


उदास पोकळी… की पोकळीतच उदासी राहते भरून?
समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी?
का वागतोय तो असा? ‘इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस’सारखा कधी झपाटला जातोय…
कधी ‘पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा’ गुढाकडे ओढला जातोय…
कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन
कवितांमधून व्यक्त होत जातोय…

आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे
कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग
दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते.
या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात.
मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ!
खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा
पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही!

कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनवासवरचे…
समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड
काळेकरडे स्ट्रोक्स !



250.00 Add to cart

कापडावरील कलाकुसर


[taxonomy_list name=”product_author” include=”709″]


कापडाचे उपयोग अनेक आणि कलाकुसरीने सुशोभित केलेल्या कापडामुळे तर उपयुक्तता आणि सौंदर्य दोन्ही गोष्टी साध्य होतात.
भरतकाम, विणकाम इ. कलांची जोपासना करणार्‍या सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा काळे यांनी नेमके हेच लक्षात घेऊन या पुस्तकात अनेक कलाकुसरींची ओळख करून दिली आहे. यामुळे आपणास कपडयांची आकर्षकता वाढविता येईल, अनेक कलात्मक वस्तूही तयार करता येतील आणि आपले छंद जोपासून जीवनातील आनंद द्विगुणित करता येईल.
या पुस्तकात भरतकामातील विविध टाके, क्रॉस स्टिच, कशिदा यांची सचित्र माहिती व नमुने तर दिले आहेतच, पण स्मॉकिंग, पॅचवर्क, आरसे लावणे इ. अनेक कलातील विविधताही येथे दाखविली आहे. तसेच अशा कलाकुसरीतून बनणार्‍या अनेक वस्तू व अनेक तयार डिझाइन्सही दिली आहेत.


125.00 Add to cart

क्रोशाचे विणकाम भाग – २

एका सुईवरील लोकरीचे नावीन्यपूर्ण विणकाम


[taxonomy_list name=”product_author” include=”709″]


योग्य मार्गदर्शन मिळाल्यास एक सुई लोकरीतून काय करामत घडवू शकते याचे प्रत्यंतर ‘क्रोशाचे विणकाम’ या पुस्तकाने दाखवून दिले आहे. पहिल्या भागाप्रमाणे याही भागात रंगीत छायाचित्रं दिली आहेत. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या विणींचे प्रकार उदा. राहुल, अर्जुन, आयेषा, सुजाता, सिमरन, माधवी दिले आहेत. १ ते २ महिन्यांच्या बाळासाठी मोजे, टोपरी, स्वेटर, लहान मुलांसाठी स्वेटर, तरुणांसाठी जाकीट आणि स्त्रियांसाठी शालीचे प्रकार आकृत्यांच्या व फोटोंच्या साहाय्याने सोप्या भाषेत समजावून दिले आहे.


100.00 Add to cart

कस्तुरबा : शलाका तेजाची


[taxonomy_list name=”product_author” include=”346″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


महात्मा गांधी व कस्तुरबा या दोघांनी मिळून अहिंसात्मक चळवळीचा पाया घातला आणि दोघांनी तिला वाहून घेतले. या अलौकिक स्त्रीला कोणताही अडथळा थोपवू शकत नसे. हे पुस्तक म्हणजे महात्मा आणि कस्तुरबा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाचे फळ आहे. एका देशाच्या जन्मामागील ऐतिहासिक घटना यात आहेत. तशीच ही एक मुग्ध प्रेमकहाणीही आहे. आजपर्यंत गांधींच्या चरित्रकारांनी त्यांच्या सर्वश्रुत आख्यायिकेवर आधारून लेखन केले आहे. हे चरित्र ही या दोन मानवी जीवांची अस्सल कहाणी आहे. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राहिलेले दोन महान जीव !



195.00 Add to cart

गरोदरपणात कोणते पदार्थ टाळावेत?

जी. पद्मा विजय
अनुवाद : डॉ. अरुण मांडे 


लग्नानंतर कोणत्याही विवाहित स्त्रीला ‘विशेष बातमी’ समजल्यानंतर घरातल्या मोठ्यांकडून तिच्यावर सूचनांचा आणि सल्ल्यांचा भडिमार होतो. पिढ्यानपिढ्या आणि परंपरेनुसार कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत याची साधारण कल्पना आपल्याला असते. परंतु आजच्या बदललेल्या जीवनशैलीत अनेकविध पाश्चिमात्य पदार्थ व बाहेर बनणारे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात आपण सर्रास खातो. या बऱ्याचशा पदार्थांमध्ये काही अपायकारक जिवाणू व रसायनं असतात जे गर्भाच्या वाढीला अडथळा निर्माण करू शकतात.
या पुस्तकात टाळावेत असे काही शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची माहिती दिली आहे. हे पदार्थ का खाऊ नयेत, त्यामागील शास्त्रीय कारणं कोणती व खाल्ल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे देखील सांगितलं आहे. त्यामुळे गरोदर स्त्रीला आपला आहार ठरवताना योग्य ती सावधता बाळगता येईल.
प्रत्येक गरोदर स्त्रीचं स्वप्न असतं, सुदृढ व लोभस बाळाचं! हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयोगी ठरेल.


75.00 Add to cart

गर्भवती व बाळंतिणींसाठी पोषक पाककृती


जी. पद्मा विजय
अनुवाद : डॉ. अरुण मांडे


गरोदरपणात आणि बाळंतपणात आईच्या व बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आहारामध्ये पौष्टिक अन्नघटक योग्य प्रमाणात असणं आवश्यक असतं. अकाली प्रसूती किंवा प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे समतोल व सकस आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हाच विचार घेऊन डॉ. पद्मा विजय यांनी गर्भवती व बाळंतिणींसाठी सहजसोप्या पध्दतीने करता येतील व सर्व आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण असतील अशा विविध पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत.
या पाककृतींबरोबर सर्व पोषक घटकांचं महत्त्व काय व रोजच्या आहारत ते किती प्रमाणात असावेत याचंही उत्कृष्ट मार्गदर्शन लेखिकेने केलं आहे.

प्रमुख वैशिष्ट्यं :

* पाककृती बनवण्यासाठी लागणारा पूर्वतयारीचा व कृतीचा वेळ
* पाककृती सोबत दिलेला पोषण मूल्यांचा तक्ता
* अचूक कृती व प्रत्येक साहित्याचं प्रमाण
* प्रत्येक पाककृतीमध्ये असणारे सर्व पोषक घटक वेगळ्या चौकटीत
* पाककृतींबद्दल उपयुक्त टीप्स
* बाळंतिणींसाठी दुग्धवर्धक पाककृतींचा स्वतंत्र विभाग


200.00 Add to cart

गाणी भोंडल्याची


वैजयंती केळकर


भोंडला, हादगा, भुलाबाई हे पोरीबाळींचे खेळण्याचे उत्सवातील प्रकार आहेत. त्याची गाणी ही वरवर अर्थहीन वाटतात. परंतु तसे नाही. त्यामध्ये खोल अर्थ आहे. समाज, संस्कृती यांचे त्यामध्ये प्रतिबिंब पडलेले बघायला मिळते. नवरात्रामध्ये रोज भोंडला होतो. हस्तनक्षत्र असल्याने पाटावर हत्तीचे चित्र काढतात. १०-१५ मुली एकत्र येऊन हातात हात धरून पाटाभोवती फेर धरतात. ”ऐलोमा पैलोमा गणेश देवा” ह्या गाण्याने ह्यांची सुरुवात होते. ”माझा भोंडला संपला किंवा करा हादग्याची बोळवण” या गाण्याने भोंडल्याची सांगता होते. अशी सर्व गाणी आजच्या पिढीला कळावीत आणि म्हणता यावीत यासाठीच हे पुस्तक! वऱ्हाडात जेव्हा भुलाबाईची पूजा बांधली जाते तेव्हा महाराष्ट्रात हादग्याची पूजा केली जाते. हादग्याची परंपरा कृषी परंपरेतून आली आहे तर भुलाबाईची सृजनशीलतेतून. हादगा व भुलाबाईची पारंपरिक गाणीही या पुस्तकात वाचायला मिळतील.


30.00 Add to cart

चेटूक

विश्राम गुप्ते त्रिधारेतील पहिलं पुस्तक


विश्राम गुप्ते


वसंताच्या प्रेमात वेडी झालेली कविहृदयाची राणी, दिघ्यांच्या घराचा उंबरठा ओलांडते खरी; पण लग्नानंतर काही दिवसातच तिला प्रीती सुकून गेल्यासारखी वाटते. आपल्या जीवनात वसंत फुलवणारा तिला वैशाखवणव्यासारखा वाटू लागतो. चेटूक झाल्यागत ती उदात्त प्रीतीचा शोध घेऊ लागते आणि सुरुवात होते संघर्षाला…
म्हंटलं तर या कादंबरीचं हे थोडक्यात आशयसूत्र असलं, तरी त्यात बहुस्तरीय सूत्रांचा पेड विणण्यात आला आहे. त्यात स्वातंत्र्योतर काळातील नागपूरचं मानववंशशास्त्रीय विवेचन येतं, तसंच मानवी जीवनाच्या अपूर्णतेवर चिंतनशील भाष्यही येतं.
जागतिक वाङमयात अभिजात ठरलेल्या अॅना कॅरनिना व मादाम बोव्हारी या कादंबऱ्यांची बरीच कथन वैशिष्ट्य यात एकवटलेली दिसली, तरी ‘चेटूक’चा प्रवास हा समांतरपणे होताना दिसतो. तीत प्रीती म्हणजे काय? ती शारीर कि अशारीर? केवळ भावुकतेवर मानवी व्यवस्था सुफल होऊ शकते का? असे प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत.
गुतंवून ठेवणारी, अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारी कादंबरी चेटूक…


395.00 Add to cart

तुमच्या आमच्या लेकी

त्यांचं आरोग्य…त्यांच्या समस्या मनमोकळ्या संवादातून सहज-सोपं समुपदेशन


डॉ. लिली जोशी


आरोग्य-समस्या घेऊन येणारा पेशंट अनेक वेळा मानसिक दडपणाखाली असतो.
त्याच्या आरोग्य-तक्रारींचं मूळ कारण ही दडपणं तर नसावीत?
अशी शक्यता लक्षात घेऊन डॉ. लिली जोशी आपल्या पेशंटशी संवाद साधता साधता त्याचा विश्वास संपादन करतात आणि पेशंट त्यांच्यापाशी मन मोकळं करतो.
आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक समस्या सांगतो…आणि `डॉक्टर’ लिली जोशी यांच्याकडे येणार्‍या तरुणींसाठी किंवा रजोनिवृत्तीला आलेल्या स्त्रियांसाठीही त्या `लिलीताई’ होऊन जातात ! आरोग्य समस्यांचं मूळ कोठे आहे, याचा या डॉक्टरताना नेमका ठावठिकाणा लागतो.
वैद्यकीय उपचारांबरोबर केलेलं नेमकं समुपदेशन
लागू पडतं आणि या स्त्रिया शरीराने व मनाने तंदुरुस्त होऊन आयुष्याला भिडायला, आनंदी जीवन जगायला मोकळ्या होतात…!
डॉ. लिली जोशी यांनी त्यांच्या खास शैलीत असे विविध अनुभव बोलक्या कहाण्यांच्या स्वरुपात या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. हे अनुभव वाचकांना एक प्रकारचं सामाजिक भान तर देतीलच पण त्याचबरोबर स्वत:च्या समस्यांची उत्तरंही देऊन जातील !
आजच्या जीवनात अनेक आघाड्यांवर सामना करणार्‍या, धडपडणार्‍या, अडखळणार्‍या तरुणींना, स्त्रियांना मार्गदर्शन करणार्‍या या…तुमच्या-आमच्या लेकी!


180.00 Add to cart

तुम्हाला ब्युटीपार्लर चालवायचंय?


माया परांजपे


आजचं युग फॅशनचं आहे. सर्वत्र फॅशनचे महत्त्व वाढले आहे. चित्रपट, परदेशांशी वाढता संपर्क अशा अनेक कारणांमुळे वेगवेगळ्या फॅशन्स, सौंदर्य-प्रसाधने इत्यादींचे महत्त्व फारच वाढत चालले आहे. अशा कारणांमुळे स्त्रिया ‘ब्युटीपार्लर’ चालवावयास लागल्या आहेत. काही स्त्रिया आपल्या घरातच ‘ब्युटीपार्लर’ (लहान प्रमाणात) चालवतात व पैसे मिळवतात. अशा परिस्थितीत स्त्रियांना ‘ब्युटीपार्लर’ चालवताना काही अडचणी येऊ नयेत म्हणून हे पुस्तक लिहिले.
ब्युटीपार्लरसाठी जागा, आर्थिक मदत, ब्युटीपार्लरची ठेवण, त्यासाठी लागणार्‍या गोष्टी, ब्युटीपार्लरची आंतररचना इ. सर्व माहिती या पुस्तकात समाविष्ट आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस उत्तम ब्युटीपार्लर चालविता येईल.


100.00 Add to cart

दोन सुयांवरील आधुनिक विणकाम

(तान्ह्या बाळांपासून तरूण-तरूणींपर्यंत सर्वांसाठी विविध आकर्षक व नवनवीन प्रकार)


प्रतिभा काळे


विणकलेत अतिशय पारंगत असलेल्या प्रतिभा काळे यांनी विणकलेतील आपले कौशल्य विकसित करून या विषयावर भरपूर लिखाणही केलं. त्यांचं वैशिष्टय हे की त्यांनी सोप्या भाषेत लिहून इतरांना मार्गदर्शन करण्याचं तंत्र अवगत केलं आणि म्हणूनच त्यांची अनेक पुस्तकं आज प्रकाशित झाली आहेत.
या नव्या पुस्तकात प्रतिभा काळे
यांनी विणकामासंबंधी अनेक उपयुक्त सूचना, काही कानमंत्र, टाक्यांची सचित्र माहिती, विणींचे नमुने इ. प्राथमिक माहिती देऊन विविध वयातील लहान मुलांसाठी स्वेटर्स, टोप्या, बूट, फ्रॉक यांचे प्रकार दिले आहेत. त्याचप्रमाणे पंधरा ते पंचवीस वयोगटातील तरुण-तरुणींसाठीही अनेक आकर्षक प्रकारांचा समावेश केला आहे. मुख्य म्हणजे नव्या पिढीच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन नवे डिझाइन्स, नव्या फॅशन्स, नवे
प्रकार यांना प्राधान्य दिलं आहे. सर्व प्रकारांची रंगीत, सुस्पष्ट छायाचित्रंही दिली आहेत.


250.00 Add to cart
1 2