माझ्या धडपडीचा कार्यनामा

उद्योग, व्यवस्थापन… लेखन, समाजकार्य… एक उद्बोधक मुशाफिरी!


[taxonomy_list name=”product_author” include=”3805″]


माझ्या धडपडींचा कार्यनामा ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’ सारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधून साठ – सत्तरच्या दशकांत विद्यार्थी म्हणून घडताना, एक तरूण भवतालच्या समाजाकडेही संवेदनशीलतेने बघत होता…. तर करियर घडवताना, लठ्ठ पगाराच्या विळख्यात अडकून नोकरी एके नोकरी न करता विविध क्षेत्रांत कल्पक संकल्पनांचा अवलंब करत होता… अनेक प्रयोग करत खऱ्या अर्थाने कार्यरत होता. मॅनेजमेन्ट क्षेत्रातील गुरू आणि सामाजिक चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ता अशा दोन ध्रुवांवरच्या भूमिका निभावत विधायक काम करू पाहणारा हा धडपड्या म्हणजे आनंद करंदीकर..
‘इंडसर्च’ या प्रसिद्ध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या स्थापनेमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे . ‘मेट्रिक कन्सल्टन्सी लि.’  ही भारतातील अव्वल दर्जाची मार्केट रिसर्च आणि कन्सल्टन्सी फर्म त्यांनी दूरदृष्टी ठेवून उभारली. या कंपनीच्या माध्यमातून शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील युवकांमधील कौशल्य विकसित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. सामाजिक कामाच्या आघाडीवर ‘युक्रांद’ , ‘जनवादी महिला संघटना’ , ‘लोकविज्ञान संघटना’ अशा संघटनांसोबत अनेक संघर्षात्मक आणि विधायक कामं त्यांनी केली. या पुस्तकात त्यांनी आपल्या अशाच अनेक धडपडींना स्वतःच्या खास शैलीत शब्दबद्ध केलं आहे. हे सर्व कार्यानुभव वाचतांना जाणवते ती त्यांची काम करण्याची तळमळ, कामाकडे बघण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन, कमालीची कल्पकता आणि अचंबित करणारा उत्साह !
एका प्रसिद्ध कवीचा मुलगा ही ओळख मागे टाकत दोन टोकांवरच्या प्रवासातील उड्या घेत केलेल्या आनंदी धडपडीचा हा प्रामाणिक लेखाजोखा … अर्थात माझ्या धडपडीचा कार्यनामा !

 

Original price was: ₹395.00.Current price is: ₹340.00. Add to cart

लिव्ह टू राइड

 

मंदार ठाकूरदेसाई


हौस , शिस्त आणि साहस यांनी जर हातात हात घालून एकत्र प्रवास केला तर त्यातून मिळणारा आनंद काही विरळाच … ! मंदार ठाकुरदेसाई यांच्या हौरोची गोष्ट म्हणूनच वेगळी ठरते . सुपरबाइक्सच्या आवडीला त्यांनी प्रोफेशनल बाइकिंगची जोड दिली आवड व हौस ते साहस … आणि साहस ते ध्येयपूर्ती हा त्यांचा प्रवास सुपरबाइक्स इतकाच सुपर ठरला . कमी पल्ल्यांच्या मोहिमांपासून थेट काश्मीर ते कन्याकुमारी अशा थरारक मोहिमा करत त्यांनी सुपरबाइक्सवरुन एक लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला . वयाच्या पंचेचाळीशीपासून सुरू केलेल्या या धाडसी मोहिमांनी त्यांना आनंद तर दिलाच पण सोबत शिस्त , नियोजन कौशल्य , समयसूचकता आणि मित्र परिवार अशा बऱ्याच काही गोष्टीही ह्या मोहिमांतून त्यांना मिळत गेल्या . हौसेला मोल नसतं आणि वयाचं बंधनही नसतं असा आत्मविश्वास देणारं पुस्तक लिव्ह टू राइड !



 

500.00 Add to cart

विश्वामित्र सिण्ड्रोम

 

पंकज भोसले


विसाव्या शतकाच्या अखेरीला जागतिकीकरण नामक काहीतरी झालं आणि त्याचे पडसाद समाजाच्या सर्व थरात उमटले. जग लहान झालं. इंटरनेटच्या माध्यमातून हव्या नको त्या बऱ्याचशा गोष्टी थेट आपल्या दारात येऊन पोचल्या आणि त्यांनी आपल्या जगण्याचं तंत्रच बदलून टाकलं. ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या जोडकथा या अशा मोठ्या बदलाच्या साक्षीदार आहेत. वरवर पाहता त्या मुंबईनजीकच्या एका वस्तीत इंटरनेटवरून अवतरलेल्या पोर्नोग्राफीचा आणि त्यामुळे वरकरणी पापभीरू वाटणाऱ्या  समाजातल्या विविध वृत्तीदर्शनाचा धांडोळा घेतात, पण प्रत्यक्षात तो त्यांचा केवळ एक पैलू आहे. तंत्रज्ञानापासून संगीतापर्यंत आणि राहणीमानापासून नातेसंबंधांपर्यंत आपला भवताल कसा बदलत गेला, याचं हे एकाच वेळी धक्कादायक तरीही गमतीदार असं दर्शन आहे.
पंकज भोसले हा पत्रकार असण्याबरोबर सिनेमा आणि साहित्याचा चाणाक्ष अभ्यासक आहे, एका अस्वस्थ काळाचा निरीक्षक आहे. आणि त्याचं हे टोकदार निरीक्षण ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या कथांना त्यांच्या साऱ्या विक्षिप्तपणासह जिवंत करतं.
गणेश मतकरी

 

350.00 Add to cart

इन द लॉंग रन

पाळण्याच्या नियोजनबद्ध व्यायामासाठी शास्त्रीय मार्गदर्शन


डॉ. लिली जोशी


दिवाळीत फराळाचं खाऊन वाढलेलं वजन उतरवण्यासाठी,
की प्रेग्नंसीनंतर पुन्हा शेपमध्ये येण्यासाठी
की आपला बेस्ट फ्रेन्ड सांगतोय म्हणून केवळ….नक्की कशासाठी रनिंग सुरु करता आहात तुम्ही? याचं  उत्तर जर, “मला आता पुढच्या आयुष्यात कायमच फिट राहायचं  आहे आणि रनिंग माझ्या जीवनशैलीचा भाग बनवायचा आहे” असं असेल तर…  मिलाओ हाथ!
मग हे पुस्तक तुम्हाला नक्कीच उत्तम दिशा दाखवेल. काय आहे पुस्तकात?१. आजच्या काळातला रनिंग फिव्हर
२. रनिंगसाठी लागणारी साधन-सामग्री, आहार आणि गॅजेट्स
३. रनिंग दरम्यान शरीर रचनेत घडणारे बदल
४. रनिंगला सुरुवात कशी करावी? वॉर्म-अप, स्ट्रेचिंगचे व्यायाम कोणते?
५. रेस किंवा मॅरेथॉनसाठी लागणारी मानसिक आणि शारीरिक तयारी
६. दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचं  मार्गदर्शन
७. अनुभवी रनर्सचे जिवंत अनुभव आणि इतर बरच काही..रनिंगच्या विश्वात A  पासून Z पर्यंत तुमची बाराखडी लखलखित करणारं आणि दस्तूरखुद्द एका नामांकित डॉक्टरने लिहिलेलं इन द लॉन्ग रन उपयोगी पडणारं  पुस्तक…. इन द लॉन्ग रन!


250.00 Add to cart

द एलओसी

नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंनी भारतीय व पाकिस्तानी सैन्यासोबत केलेल्या सहप्रवासाची कहाणी


हॅपीमॉन जेकब
अनुवाद:मिलिंद चंपानेरकर 


हॅपीमॉन जेकब यांनी २०१८मध्ये भारत पाकिस्तान या दोन देशांमधील ‘ताबा नियंत्रण रेषे’च्या अर्थात ‘एलओसी’च्या दोन्ही बाजूंनी प्रवास केला. भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यदलासोबत त्यांनी केलेला सहप्रवास, दोन्हीकडील अनेक निवृत्त व सेवेतील लष्करी अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चा, आणि सीमाभागातील ‘शस्त्रसंधी उल्लंघन’-ग्रस्त लोकांशी साधलेला संवाद यांबद्दलचे तपशील हॅपीमॉन यांनी या पुस्तकातून दिले आहेत.

दोन देशांमध्ये लोकसहभागाने शांतता प्रस्थापित व्हावी हा हॅपीमॉन यांचा मूळ उद्देश आहे. पूर्वग्रहांचे अडथळे पार करून दोन्ही देशांच्या लष्करासह सर्व प्रकारच्या लोकांशी संवाद साधण्याचं अवघड असं काम गेली कित्येक वर्षं ते करत आहेत, त्याचप्रमाणे अनेक ‘ट्रॅक टू’ संवादांतील सहभागाद्वारे शांतता प्रयत्नाच्या प्रक्रियेत सातत्याने सहभागी राहिले आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकिर्त अभ्यासक आहेत.

दीर्घ अनुभव आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन यांतून नवी अंतर्दृष्टी देणारं पुस्तक द एलओसी.



325.00 Add to cart

लालबहादुर शास्त्री

राजकारणातील मर्यादापुरषोत्तम


सी.पी. श्रीवास्तव
अनुवाद :अशोक जैन


काश्मीरमध्ये आंदोलनाचा उद्रेक झाला असताना प. नेहरूंनी शास्त्रींना तेथे तातडीने पाठविले होते. श्रीनगर येथे गोठवणारी थंडी असल्याने प. नेहरूंनी स्वत:चा ओव्हरकोट शास्त्रींना दिला. जणू पुढील जबाबदारी शास्त्रींच्या खांद्यावर येणार याचेच ते सूचक होते ! पंतप्रधान म्हणून शास्त्रींनी आपला स्वतंत्र, तेजस्वी ठसा उमटवला. १९६२च्या चीन युद्धातील मानहानिकारक पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर,१९६५च्या भारत-पाक युद्धात शास्त्रींनी देशास खंबीर व यशस्वी नेतृत्व दिले आणि देशाची प्रतिमा झळाळून निघाली. ‘जय जवान, जय किसान’च्या मंत्राने सारा देश भारावून गेला. ताश्कंद शिखर परिषदेत मुत्सद्देगिरीने पावले टाकून त्यांनी अखेर अयुब खानना झुकविले. शास्त्रींनी यशाचे अत्युच्च शिखर गाठले, पण आकस्मिक त्यांचे अवतारकार्य संपुष्टात आले !

…तीच ही कहाणी तीस वर्षांनंतर दप्तरमुक्त झालेल्या अनेक सत्य घटनांच्या साक्षीने लिहिलेली प्रभावी, प्रेरक नि पारदर्शक व आजही भारावून टाकणारी जीवनगाथा!


Biography of Shri.Lal Bahadur Shastri


320.00 Add to cart

द ग्रेप्स ऑफ रॉथ

विस्थापित-स्थलांतरितांच्या जीवनावरील जगप्रसिद्ध कादंबरी


जॉन स्टाइनबेक
अनुवाद: मिलिंद चंपानेरकर


लोकाभिमुख अमेरिकन लेखक म्हणून नावाजलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त जॉन स्टाइनबेक यांच्या ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या १९३९ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या दीर्घ कादंबरीने अमेरिकेतील विस्थापित-स्थलांतरितांच्या समस्येला वाचा फोडली आणि समाज ढवळून निघाला. या वास्तववादी कादंबरीद्वारे त्यांनी या समस्येच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पैलूंवर मोठ्या सर्जनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून भाष्य केलं. ही कादंबरी १९३०च्या दशकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील असली, तरी भारतातील विस्थापितांच्या समस्यांबाबत आजही विचारप्रवृत्त करू शकेल अशी आहे.

भांडवलकेंद्री मोठ्या शेतीच्या धोरणाच्या पुरस्कारार्थ मध्य अमेरिकेतील लाखो लहान-मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींवरुन हुसकावून लावलं गेलं… पश्चिम अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील कापसाच्या, द्राक्ष-संत्र्याच्या बगिच्यांमध्ये काम मिळेल, या आशेने या विस्थापित कुटुंबांनी दोन हजार मैलांचा खडतर प्रवास करून केलेलं स्थलांतर… त्या प्रक्रियेत वाट्याला आलेलं दैन्य, निर्वासित छावण्यांमधील भीषण अमानवी जीवन आणि उद्धवस्थता…
आणि याच प्रक्रियेदरम्यान त्यांच्या जाणिवेत घडून आलेले सूक्ष्म बदल आणि आत्मिक क्षोभाची भावना…
एक विशाल बहुपेडी पट उलगडून दर्शविणारी ही एक हृदयस्पर्शी कादंबरी.

सर्जनशील रचना आणि आगळी संवादशैली या प्रमुख वैशिष्टयांनिशी साहित्य क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणाऱ्या या कादंबरीचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारप्राप्त मिलिंद चंपानेरकर यांनी साधलेला हा तितकाच प्रयोगशील असा मराठी अनुवाद.

लोकांच्या समस्या लोकांसाठी लोकभाषेत व्यक्त करणारी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’.


700.00 Add to cart

सहज


धनंजय जोशी


आलेल्या क्षणाला सहज सामोरं जाणं हे तत्त्व झेन तत्त्वज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक मानलं जातं. या तत्त्वाचं आचरण करण्यासाठी शिकागोस्थित लेखक धनंजय जोशी यांनी भारतातून, थायलंडमधून आणि दक्षिण कोरियातून अमेरिकेत आलेल्या बौद्ध गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विपस्सना (विपश्यना) आणि झेन मेडिटेशन या दोन्ही अध्यात्मपरंपरांची प्रदीर्घ काळ साधना केली. एवढंच नव्हे तर त्यांनी झेन तत्त्वज्ञान आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालून ललितशैलीत अनुभवकथन लिहिलं. त्याचंच हे पुस्तक म्हणजे ‘सहज’.

रोजच्या जगण्यातल्या नेहमीच्या अनुभवांना झेन कथा, झेन गुरूंच्या आठवणी किंवा प्रसंग यांची जोड देऊन जोशी लीलया झेन तत्त्वज्ञानातली मूलतत्त्वं आपल्याला त्यांच्या या लहानशा लेखांमधून सांगून जातात. विशेष म्हणजे ती सांगत असताना त्यांचा सूर उपदेशकाचा नसतो. तो सहज, पण काहीतरी महत्त्वाचं सांगून जाणारा असतो.

एखाद्या मित्राने किंवा जवळच्या व्यक्तीने त्याला आकळलेली शहाणीव जाता जाता आपल्याला सांगून जावी, असा अनुभव देणारं पुस्तक… ‘सहज’…



250.00 Add to cart

आधुनिक भारताचे विचारस्तंभ


रामचंद्र गुहा

अनुवाद : शारदा साठे


रामचंद्र गुहा यांचं नवं पुस्तक
‘भारत’ ही संकल्पना उलगडणारा ग्रंथ
MAKERS OF MODERN INDIA आता मराठीत
राममोहन रॉय, सय्यद अहमद खान, जोतीराव फुले, ताराबाई शिंदे, बाळ गंगाधर टिळक, रवींद्रनाथ ठाकूर, गोपाळ कृष्ण गोखले, महम्मद अली जीना, भीमराव आंबेडकर, ई.व्ही. रामस्वामी, राममनोहर लोहिया, एम.एस. गोळवलकर, मोहनदास गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, चक्रवर्ती राजगोपालाचारी, व्हेरियर एल्विन, हमीद दलवाई या १९ विचारवंतांच्या व्यक्तिरेखा व वैचारिक भूमिका यांचा एकाच ग्रंथातून परिचय करून देणारं व त्यातून भारताची वैचारिक जडणघडण स्पष्ट करणारं पुस्तक.



800.00 Add to cart