सोप्या भाषेत मेंदूचं मन उलगडणारं पुस्तक
फॉन्ट साइज वाढवा मेंदू हा माझा विज्ञान-साहित्याएवढाच आवडता विषय. ह्या विषयात माझ्याप्रमाणे आवडीने लेखन करणारा लेखक म्हणजे सुबोध जावडेकर. त्यामुळेच आमच्या मैत्रीचा धागा जुळला, घट्ट झाला. त्यांच्या दोन पुस्तकांपैकी एका पुस्तकावर मी लिहिणार आहे; ते म्हणजे ‘मेंदूच्या मनात’. त्याचं दुसरं पुस्तक म्हणजे ‘पुढच्या हाका’. सुबोध विज्ञान-साहित्याला इतर साहित्यातून वेगळं करत नाहीत. ते बरोबरच आहे. त्यामुळे [...]