निर्मळ मनाच्या संजयचं अकाली जाणं…
मौज प्रकाशन गृहाचे प्रकाशक संजय भागवत यांचं ३ फेब्रुवारी २०१९ रोजी निधन झालं. एक मित्र म्हणून संजयच्या व्यक्तिमत्त्वाचं केलेलं एक अवलोकन… या विशेष मनोगतात. मे २०१६ मधला एक दिवस. त्या दिवशी संजय ‘विशेष मूड’मध्ये दिसला. म्हणजे, बाह्यांगी तशा ‘मूड’च्या खाणाखुणा नव्हत्या. तशा त्या दिसण्याची शक्यता संजयच्या बाबतीत विरळच. कारण त्याचं व्यक्तिमत्त्वच तसं नव्हतं. कोणत्या प्रतिकूल [...]