युक्रेन युद्ध
आशिष काळकर
(आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या वर्तुळात अनेक वर्षं कार्यरत असलेले दिल्लीस्थित पत्रकार)
आशिष काळकर
(आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या वर्तुळात अनेक वर्षं कार्यरत असलेले दिल्लीस्थित पत्रकार)
नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंनी भारतीय व पाकिस्तानी सैन्यासोबत केलेल्या सहप्रवासाची कहाणी
हॅपीमॉन जेकब
अनुवाद:मिलिंद चंपानेरकर
हॅपीमॉन जेकब यांनी २०१८मध्ये भारत पाकिस्तान या दोन देशांमधील ‘ताबा नियंत्रण रेषे’च्या अर्थात ‘एलओसी’च्या दोन्ही बाजूंनी प्रवास केला. भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यदलासोबत त्यांनी केलेला सहप्रवास, दोन्हीकडील अनेक निवृत्त व सेवेतील लष्करी अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चा, आणि सीमाभागातील ‘शस्त्रसंधी उल्लंघन’-ग्रस्त लोकांशी साधलेला संवाद यांबद्दलचे तपशील हॅपीमॉन यांनी या पुस्तकातून दिले आहेत.
दोन देशांमध्ये लोकसहभागाने शांतता प्रस्थापित व्हावी हा हॅपीमॉन यांचा मूळ उद्देश आहे. पूर्वग्रहांचे अडथळे पार करून दोन्ही देशांच्या लष्करासह सर्व प्रकारच्या लोकांशी संवाद साधण्याचं अवघड असं काम गेली कित्येक वर्षं ते करत आहेत, त्याचप्रमाणे अनेक ‘ट्रॅक टू’ संवादांतील सहभागाद्वारे शांतता प्रयत्नाच्या प्रक्रियेत सातत्याने सहभागी राहिले आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकिर्त अभ्यासक आहेत.
दीर्घ अनुभव आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन यांतून नवी अंतर्दृष्टी देणारं पुस्तक द एलओसी.
भारतीय लष्कराचा मानबिंदू
मेजर जन. शुभी सूद
अनुवाद : भगवान दातार
चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत पाच युध्दांना सामोरं जाणाऱ्या आणि संपूर्ण कारकीर्दीत वादाचा किंवा अपकीर्तीचा डाग लागू न देणाऱ्या भारताच्या या आठव्या लष्करप्रमुखाचं हे प्रेरणादायी व रोमहर्षक चरित्र!
भारताचे माजी लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि विशेषत: त्यांच्यामधील नेतृत्वगुणांच्या सर्व पैलूंचं दर्शन लेखक मेजर जनरल शुभी सूद यांनी या पुस्तकातून घडवलं आहे. शुभी सूद हे माणेकशा यांचे निकटवर्ती सहकारी. त्यांच्या सोबत काम करताना आलेल्या अनुभवांमधून माणेकशांचे व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व याचं चित्रण त्यांनी या पुस्तकात संशोधनपूर्वक व अतिशय समतोलपणे केलं आहे.
युध्दरणनितीची उत्तम जाण, अभ्यास, व्युहरचनेतील मुत्सद्देगिरी, सेनानीला लागणारा निर्भीडपणा, मूल्यांवरील निष्ठा, उच्चपदी असताना देखील त्यांच्याकडे असणारी विनोदबुध्दी आणि कोणत्याही वयोगटातल्या माणसाशी त्यांचं सहृदय वर्तन अशा माणेकशांच्या सर्व पैलूंवर लेखकाने पुस्तकात प्रकाश टाकला आहे.
अतुल कहाते
देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी उद्ध्वस्त केलेली हवाई बेटं…
एका खासगी कंपनीमार्पâत गिळंकृत केलेला हाँडुरस देश…
मुजाहिदींना पुरवलेली शस्त्रास्त्रं आणि बेचिराख केलेला अफगाणिस्तान…
व्हीएतनाममध्ये केलेला नरसंहार…
विनाकारण घुसून सद्दामचा काढलेला काटा आणि इराकचं केलेलं ध्वस्तीकरण…
जगावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी
अमेरिकेने अनेक देशांमध्ये ढवळाढवळ केल्याची
अशी कितीतरी उदाहरणं देता येतील
— कधी त्यांनी तिथली सरकारं उलथवून लावली,
कधी बंडखोरांना शस्त्रास्त्रसाठा पुरवला,
तर कधी थेट आक्रमणंच केली…
सुप्रसिद्ध लेखक अतुल कहाते यांनी अशा
‘अमेरिकापीडित’ १६ देशांच्या ‘केस स्टडीज’
अभ्यासपूर्णरीत्या या पुस्तकात मांडल्या आहेत.
त्याआधारे त्यांनी अमेरिकेच्या वर्चस्ववादाचं विवेचन करून
परखड चिकित्सा केली आहे.
‘लोकशाहीवादी, खुल्या विचारांचा, संपन्न व समृद्ध देश’,
‘नशीब कमावण्याची स्वप्नभूमी’
अशी ओळख असलेल्या अमेरिकेची
आक्रमक बाजू समोर आणणारा पुस्तकरूपी दस्तऐवज…
‘युद्धखोर अमेरिका’!
सर्वोच्च लष्करी सन्मानप्राप्त शूरांच्या परमवीर-गाथा
रचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद
अनुवाद : भगवान दातार
परमवीर चक्र या सर्वोच्च लष्करी सन्मानाने गौरवण्यात आलेल्या २१ शूरवीरांच्या पराक्रमाची ही आहे परमवीर-गाथा !
कधी २०००० फूट उंचीवर दुर्गम भागात लढलेलं प्रत्यक्ष युद्ध असो, तर कधी शून्यापेक्षा कमी तापमानात शत्रुच्या कारवाईला दिलेलं सडेतोड उत्तर असो, कधी कुशल डावपेच आखून प्राण पणाला लावून जिंकलेली बाजी असो…या २१ वीरांनी भारताची सुरक्षा हेच जीवनाचं ध्येय मानलं.आई-वडील, पत्नी, मुलं, भावंडं या नात्यांपेक्षाही देशनिष्ठा त्यांनी महत्त्वाची मानली. ज्या युद्धांत अथवा चकमकीत दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्राने सन्मानित केलं गेलं त्या लढतींचं पुस्तकात केलेलं जिवंत चित्रण वाचून प्रत्यक्ष लढाईच आपल्या डोळ्यांसमोर उभी राहील.
या वीरांचे सहकारी, अधिकारी, कुटुंबीय यांच्याशी थेट संवाद साधून परमवीरचक्र मानकर्यांचं नेमकं योगदान काय आहे, हे सांगणार्या या कथा लष्कराच्या कार्यपद्धतीचीसुद्धा ओळख करून देतात.
कुशल लष्करी डावपेच आणि अपरिमित शौर्य यांची ही आहे…परमवीर-गाथा!
युद्धभूमीवर अतुलनीय पराक्रम गाजवणार्या वीरांच्या शौर्यगाथा
रचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद
अनुवाद : भगवान दातार
या कथा आहेत वीर जवानांच्या…या कथा आहेत त्यांच्या धाडसाच्या, निश्चयाच्या, जिद्दीच्या आणि वचनपूर्तीच्या ! सैनिक प्राणपणाने लढत असतो, तो देशाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी ! या पुस्तकातल्या कथा `सैनिक नावाचं रसायन’ कोणत्या मुशीतून घडतं, याची झलक तर आपल्याला देतातच पण त्याचबरोबर निश्चय आणि कटिबद्धता यांची प्रेरक कहाणीसुद्धा सांगतात.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सत्तेच्या बाजूने लढलेली युद्ध असोत किंवा स्वातंत्र्योत्तर काळात पाकिस्तान आणि चीनबरोबर आमने-सामने लढलेली युद्ध असोत… त्याचप्रमाणे प्रचंड उंचीवर लढलेलं कारगील युद्ध असो किंवा शांतता काळातले संघर्ष असोत… प्रत्येक लढाईत, प्रत्येक प्रसंगी वीरजवान जीवावर उदार होऊन लढल्यामुळेच भारताची सुरक्षा अबाधित राहिली. या सर्व युद्धांत दाखवलेल्या असामान्य शौर्यासाठी अनेक लष्करी अधिकारी व जवानांना आजवर विविध सन्मानाने गौरवण्यात आले आहे. त्यापैकी काही वीरांच्या शौर्याची, त्यांच्या नेमक्या कर्तृत्वाची ओळख या पुस्तकात तपशीलांसह व रोचकपणे करून दिली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, या आहेत असीम धैर्य आणि पराकोटीचं शौर्य दाखवणार्या वीरांच्या शौर्यगाथा !