275.00

फील्ड मार्शल सॅम माणेकशा

भारतीय लष्कराचा मानबिंदू


मेजर जनरल (निवृत्त) शुभी सूद यांचा जन्म सिमला इथे झाला. त्यांचं बालपणही तिथेच गेलं. शालेय शिक्षणानंतर त्यांनी पुण्याजवळच्या खडकवासला इथल्या नॅशनल डिफेन्स अॅलकॅडमीमध्ये (एन.डी.ए.) प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांना ८ गुरखा रायफलच्या ४ बटालियनमध्ये कमिशन मिळालं. या बटालियनमध्ये असताना त्यांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरी भागातल्या ‘झांगर’ भागात केलेल्या कारवाईत भाग घेतला. मणिपूर आणि नागालँडमधल्या मोहिमेतही ते सहभागी झाले होते. सप्टेंबर १९६८ मध्ये त्यांची लेफ्टनंट जनरल माणेकशा यांचे विशेष साहायक म्हणून नियुक्ती झाली. माणेकशा त्या वेळी लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते. लष्करप्रमुख म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर माणेकशांनी सूद यांना विशेष मदतनीस म्हणून दिल्लीला नेलं. त्या वेळी कॅप्टन असलेल्या सूद यांना १९७१च्या युद्धाच्या काही दिवस आधी बढती मिळाली व ते मेजर झाले. लष्करप्रमुखांचे डेप्युटी मिलिटरी असिस्टंट (DMA) म्हणून त्यांची नियुक्ती झाली. यामुळे १९७१च्या युद्धाच्या वेळच्या महत्त्वाच्या घडामोडी त्यांना अगदी जवळून पाहता आल्या. चेंबर्ले येथील स्टाफ कॉलेज कोर्ससाठी ते १९७२मध्ये इंग्लंडमध्ये गेले. नंतर ८व्या गुरखा रायफलच्या बटालियनचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ‘हायरकमांड’ आणि ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज कोर्स’ हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमधील २६ इन्फन्ट्री डिव्हिजनचे कमांडर म्हणून करण्यात आली. १२ कोअरचे प्रमुख असताना ३१ मार्च १९९८ रोजी ते लष्करी सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर जनरल सूद यांनी ‘ए.वी.आई.एस.टेंट ए कार' या कंपनीत मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. २००३ मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते लिखाणाकडे वळले. १९०४ मध्ये ल्हासा इथे असलेल्या कर्नल, सर एफ.ई. यंगहज्बंड यांच्या तिबेट मोहिमेविषयी सूद यांनी लिहिलेलं ‘यंगहज्बंड-ट्रबल्ड कॅपेन' हे पुस्तक डिसेंबर २००४ मध्ये प्रसिद्ध झालं.

अनुवाद :
पत्रकारितेच्या क्षेत्रांत सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ भगवान दातार कार्यरत आहेत. त्यांनी लोकसत्ता, केसरी, लोकमत, तरुणभारत, पुढारी, प्रभात आदी दैनिकात विविध पदांवर काम केलं आहे. तरुणभारत, पुणेच्या संपादकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. विविध घटनांच्या वृत्तांकनासाठी पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आदी राज्यांचा त्यांनी दौरा केला असून लोकसभेच्या कामकाजाचे वृत्तांकनही त्यांनी केलं आहे. त्यांनी रामजन्मभूमी प्रकरणाच्या वेळी अयोध्येत उपस्थित राहून वार्तांकन केलं होतं. त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा वॉर करस्पाँडन्टचा अभ्यासक्रम महू, नासिराबाद, जोधपूर, दिल्ली आणि कोचीन येथून पूर्ण केला आहे. त्यांची ‘टु द लास्ट बुलेट’, ‘शेवट नसलेलं युद्ध’, ‘बी किंमग इंडियन’ ही अनुवादित पुस्तके गाजली. ‘खिल्ली’ हे राजकीय विडंबनपर लेखांचं स्वतंत्र विनोदी पुस्तक आणि आयएस अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल ‘कलेक्टिव्ह एनर्जी’ या पुस्तकाचं संपादन केलं आहे. ‘सरदार वल्लभभाई पटेल' व ‘फील्ड मार्शल सॅम माणेकशा' ही त्यांनी अनुवादित केलेली पुस्तकं वाचकप्रिय आहेत.


चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत पाच युध्दांना सामोरं जाणाऱ्या आणि संपूर्ण कारकीर्दीत वादाचा किंवा अपकीर्तीचा डाग लागू न देणाऱ्या भारताच्या या आठव्या लष्करप्रमुखाचं हे प्रेरणादायी व रोमहर्षक चरित्र!
भारताचे माजी लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि विशेषत: त्यांच्यामधील नेतृत्वगुणांच्या सर्व पैलूंचं दर्शन लेखक मेजर जनरल शुभी सूद यांनी या पुस्तकातून घडवलं आहे. शुभी सूद हे माणेकशा यांचे निकटवर्ती सहकारी. त्यांच्या सोबत काम करताना आलेल्या अनुभवांमधून माणेकशांचे व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व याचं चित्रण त्यांनी या पुस्तकात संशोधनपूर्वक व अतिशय समतोलपणे केलं आहे.
युध्दरणनितीची उत्तम जाण, अभ्यास, व्युहरचनेतील मुत्सद्देगिरी, सेनानीला लागणारा निर्भीडपणा, मूल्यांवरील निष्ठा, उच्चपदी असताना देखील त्यांच्याकडे असणारी विनोदबुध्दी आणि कोणत्याही वयोगटातल्या माणसाशी त्यांचं सहृदय वर्तन अशा माणेकशांच्या सर्व पैलूंवर लेखकाने पुस्तकात प्रकाश टाकला आहे.


Reading Time: 2 Minutes (243 words)

227 978-93-82591-12-2 Field Marshal Sam Manekshaw फील्ड मार्शल सॅम माणेकशा भारतीय लष्कराचा मानबिंदू Major Gen. Shubhi Sood मेजर जन. शुभी सूद Bhagwan Datar भगवान दातार चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत पाच युध्दांना सामोरं जाणाऱ्या आणि संपूर्ण कारकीर्दीत वादाचा किंवा अपकीर्तीचा डाग लागू न देणाऱ्या भारताच्या या आठव्या लष्करप्रमुखाचं हे प्रेरणादायी व रोमहर्षक चरित्र!
भारताचे माजी लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि विशेषत: त्यांच्यामधील नेतृत्वगुणांच्या सर्व पैलूंचं दर्शन लेखक मेजर जनरल शुभी सूद यांनी या पुस्तकातून घडवलं आहे. शुभी सूद हे माणेकशा यांचे निकटवर्ती सहकारी. त्यांच्या सोबत काम करताना आलेल्या अनुभवांमधून माणेकशांचे व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व याचं चित्रण त्यांनी या पुस्तकात संशोधनपूर्वक व अतिशय समतोलपणे केलं आहे.
युध्दरणनितीची उत्तम जाण, अभ्यास, व्युहरचनेतील मुत्सद्देगिरी, सेनानीला लागणारा निर्भीडपणा, मूल्यांवरील निष्ठा, उच्चपदी असताना देखील त्यांच्याकडे असणारी विनोदबुध्दी आणि कोणत्याही वयोगटातल्या माणसाशी त्यांचं सहृदय वर्तन अशा माणेकशांच्या सर्व पैलूंवर लेखकाने पुस्तकात प्रकाश टाकला आहे.
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 212 21.6 14 1.4 320 The book outlines his many achievements apart from his steadfastness in the face of adversity, his strength of character and qualities of leadership that distinguished him from the others and set him apart in a class of his own. He was in the Army at a time when turbulent and tumultuous changes were taking place in the Army and the country. It specifically highlights the qualities of leadership of the Field Marshal and has many important lessons for the reader in personal and professional conduct. व्यक्तिरंग Biographical चरित्र-आत्मचरित्र 275 Field Marshal Sam Manekshaw_RGB SamManekshawBC.jpg
Weight 320 g
Dimensions 21.6 × 14 × 1.4 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.