331 | 978-93-86493-13-2 | Pradnyavant -2 : Pardeshi | प्रज्ञावंत २ : परदेशी | मानवी जीवन समृद्ध करणारे | Arvind Vaidya | अरविंद वैद्य | गेल्या काही शतकांत असे काही प्रज्ञावंत होऊन गेले आहेत, ज्यांनी आपली बुद्धी पणाला लावत अतिशय प्रतिकूल वातावरणात विविध क्षेत्रांत मूलभूत स्वरूपाचं काम करून ठेवलं आहे. त्यात संशोधक, विचारवंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, समाजकारणी, तत्त्वज्ञ अशा सर्वांचाच समावेश होतो. त्यांच्या असामान्य योगदानाचं फलित म्हणजेच आपलं आजचं प्रगत जीवन! आपल्या वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक तसंच ऐहिक जीवनाला आकार देणार्या अशा काही असामान्य प्रज्ञावंतांचा हा जीवनपट…* खिस्तोफर कोलंबस * वास्को-द-गामा * फर्डिनंड मॅगेलेन आणि कॅप्टन जेम्स कुक * गॅलिलिओ गॅलिली * आयझॅक न्यूटन * अल्बर्ट आईनस्टाईन * बेंजामिन फ्रँक्लिन * जॉर्ज वॉशिंग्टन * थॉमस जेफर्सन * अब्राहम लिंकन * सुकार्नो * नेल्सन मंडेला * कार्ल माक्र्स * व्लादिमीर लेनिन * माओ-त्से-तुंग * हो-चि-मिन्ह * चे गव्हेरा * फिडेलकॅस्ट्रो |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 184 | 21.5 | 13.9 | 1 | 200 | Pradnyawant part 1 and 2 are the biographies of famous Indian and foreigner scientists, social reformers, political leaders and philosophers who have contributed for the society. These life stories are inspirational for students. |
किशोरवाचन | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | Young Adult | किशोरसाहित्य | 140 | Pradnyawant cover 2 | PradnyawantPardeshiBC.jpg |
सहकारधुरीण
भारतातील साखर उद्योगात सहकाराची ध्वजा रोवण्याचं पायाभूत कार्य करणारे विठ्ठलराव विखे पाटील यांचं समग्र चरित्र
[taxonomy_list name=”product_author” include=”348″]
भारतातील दीनदुबळया शेतकऱ्यांना कायम स्मरणात राहावीत अशी जी थोडी नावं आहेत, त्यामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांचं नाव अढळ असायला हवं. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावच्या विठ्ठलरावांनी शेतकऱ्यांना सहकाराचा मंत्र देऊन त्यांना दारिद्रय आणि अज्ञानाच्या कर्दमातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. पिळवणूक करणारे सावकार, धनदांडगे व्यापारी, राज्यसत्तेचे लबाड प्रतिनिधी, जातिभेद, वर्गविग्रह यांसारख्या बलाढय शत्रूंशी अहिंसक मार्गाने लढण्यासाठी त्यांनी अर्धपोटी भूमिपुत्रांची सेना संघटित करून त्यांचं यशस्वी नेतृत्व केलं… आणि त्यांच्याच सहभागाने ‘प्रवरा सहकारी साखर कारखाना’ हा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना १९५० मध्ये उभारला.
कारखान्याच्या उभारणीसोबतच विठ्ठलरावांनी समाजविकास व शिक्षणप्रसाराच्या कार्याला चालना दिली आणि त्यामुळेच सहकारी कारखाना म्हणजे क्रांतिकारक बदलाचं प्रारूप ठरलं. त्याचं लोण केवळ पश्चिम महाराष्ट्रात पसरलं असं नाही, तर त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं आर्थिक, सामाजिक व राजकीय चित्र बदललं. या प्रक्रियेत त्यांच्या सहकारी कारखान्याने उत्प्रेरकाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सहकारी चळवळीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला शेती-शक्तीचा आधार देण्यामध्ये विठ्ठलरावांचं योगदान मोठं ठरलं आणि त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने ‘सहकारधुरीण’ ठरतात.
विठ्ठलरावांच्या जीवनाच्या व कार्याच्या विविध टप्प्यांबाबत प्रदीर्घ काळ संशोधन करून सिध्द केलेला हा समग्र चरित्रग्रंथ ‘सहकारधुरीण’ महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांबाबत अंतर्दृष्टी देणारा ठरावा.
Reviews
There are no reviews yet.