296 | 978-93-82591-96-2 | Sun Mere Bandhu Re | सून मेरे बंधु रे | एस.डी. बर्मन यांचं जीवन-संगीत | Satya Saran | सत्या सरन | Milind Champanerkar | मिलिंद चंपानेरकर | हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातील अग्रणी संगीतकार सचिन देव बर्मन यांना चित्रपटमाध्यमाची चांगली जाण होती; गानदृश्य व्हिज्युअलाइज करण्याची आणि प्रसंगानुरूप गाणी स्वरबद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात होती. त्यांच्या अशा वैशिष्ट्यांमुळेच ते इतर समकालीन संगीतकारांपेक्षा खचितच अधिक चतुरस्र व सदाबहार संगीतकार ठरू शकले. अशा त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांचा शोधक नजरेने मागोवा घेणार्या सत्या सरन लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला हा अनुवाद– `सुन मेरे बंधु रे’. `ये रात ये चाँदनी तू कहां’, `जलते है जिसके लिए’, `गाता रहे मेरा दिल’ ते `कोरा कागज था ये मन मेरा’ यांसारखी असंख्य आनंददायी प्रणयगीतं… `वक्त ने किया क्या हंसी सितम’, `जाये तो जाये कहाँ’ यांसारखी अविस्मरणीय विरहगीतं… `ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ सारखी सामाजिक रोष व्यक्त करणारी गीतं ते `वहाँ कौन है तेरा’, `सुन मेरे बंधु रे’ सारखी त्यांनी स्वत: गायलेली या मातीतली व तत्त्वज्ञानात्मक डूब असलेली गाणी… त्यांच्या संगीतातील वैविध्याची साक्ष देणारी अगणित गीतं आहेत, परंतु अशा त्यांच्या गीतांची निर्मितीप्रक्रिया उलगडून दर्शवणारं आणि त्यामागच्या प्रेरणास्रोतांचा कल्पकतेने वेध घेणारं हे एकमेवच पुस्तक ठरावं.एस.डी.बर्मन यांच्या संगीताचा व त्यांच्या बालपणापासूनच्या व्यक्तिजीवनातील प्रेरणास्रोतांचा अन्वय लावणारं, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं सांगणारं मराठी संगीत-रसिकांसाठी एक संग्राह्य असं पुस्तक `सुन मेरे बंधु रे…’ |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 304 | 21.7 | 14.2 | 1.8 | 380 | Sun Mere Bandhu Re is a book that is dedicated to the late great S D Burman, one of India’s greatest composers, who created music for over a hundred different films. S D Burman was a multi-talented, multi-faceted man with the skill and talent of numerous great artists. He is best-known for his compositions but he was also a singer, musician and teacher during his peak years. He has created music that has stood the test of time. The book goes over all of his achievements and shows how the lasting popularity of his compositions is perhaps the greatest compliment an artist can receive of their work. Having lived a simplistic and unfaltering life, he is an inspiration to artists around the world, regardless of their generation. The author of this book has painstakingly compiled all the lesser-known facts about the great artists, using newspaper clippings, insider secrets and detailed interviews that aim to illuminate the man behind the music and the mind behind the man. Sun Mere Bandhu Re is a treat for music lovers and fans of S D Burman, a collective experience that is compiled beautifully to unmask one of the great musical minds of our country. His son, R D Burman went on to stake his claim as one of the greats himself. The book explains how we can never fully appreciate the beauty of having an inspirational father such as the senior Burman. |
व्यक्तिरंग | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | Cinema – Music | चित्रपट – संगीत | 300 | Sun Mere Bandhu Re cover | SunMereBandhuReBC.jpg |
टेलिकॉम क्रांतीचं महास्वप्न
माझा प्रवास…
[taxonomy_list name=”product_author” include=”579″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”493″]
सत्यनारायण गंगाराम पित्रोदा… ओडिशा राज्यातल्या तितिलगड या छोट्याशा गावातला हा तरुण ‘स्वप्नभूमी’ अमेरिकेत गेला काय आणि झपाट्याने विस्तारत जाणार्या तंत्रज्ञानाच्या अवकाशात त्याच्या हाती सोनं लागलं काय! सत्यनारायणचा ‘सॅम’ झाला आणि जागतिक पेटंट्सच्या मालकीमुळे कोट्याधीश बनला…
पण गांधीवादी विचारांचा पगडा असलेल्या सॅमना मात्र आपलं ज्ञान आणि गाठीशी असलेला अनुभव आपल्या मायभूमीसाठी वापरावा अशी आस लागली. आणि म्हणून ते भारतामध्ये परतले, तेच एक ‘महाध्येय’ घेऊन… भारतात ‘टेलिकॉम-क्रांती’ घडवण्याचं ! तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचंही त्यांना समर्थ पाठबळ लाभलं… आणि मग केवळ एक रुपया वेतनावर अविरत कष्ट करणारे सॅम आणि देशाच्या कानाकोपर्यात दिसणारे ‘एसटीडी/पीसीओ बूथ’ म्हणजे एक अतूट समीकरणच होऊन गेलं…!
राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर मात्र सॅम यांचं जगच हादरलं. भ्रष्टाचाराचे आरोप, त्यातच आलेला हृदयविकाराचा झटका आणि आर्थिक कफल्लकता यांमुळे ते खोल गर्तेत बुडाले, पण तरी निराश न होता फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून उसळून वर आले…!
भारतीय टेलिकॉम-क्रांतीचं महास्वप्न प्रत्यक्षात आणणार्या सॅम पित्रोदा यांची ही प्रेरक आत्मकथा !
Reviews
There are no reviews yet.