Reading Time: 3 Minutes (276 words)
202 | 978-93-80361-82-6 | Keval Manavatesathi | केवळ मानवतेसाठी | आपलं अवघं आयुष्य मानवसेवेला समर्पित करून सेवा-केंद्रांचं अभूतपूर्व जाळं विणणार्या अब्दुल सत्तार इदी यांचं आत्मचरित्र | Tehnima Durani | तेहनिमा दुराणी | Shrikant Lagu | श्रीकांत लागू | अब्दुल सत्तार इदी यांचा जन्म भारतातला. पण फाळणीमुळे किशोरवयातच ते कराचीला स्थलांतरित झाले. गरीब, गरजू आणि आपत्तीग्रस्तांसाठी केलेल्या अभूतपूर्व मदत-कार्यामुळे तिसऱ्या जगतामधील जनतेत त्यांना मसिहाच समजलं जातं. मूळच्या सेवाभावीवृत्तीमुळे १९४८ मध्ये त्यांनी मिठादर येथे धर्मादाय दवाखाना सुरू केला. अल्पावधीतच आपत्कालीनप्रसंगी मदत कार्यासाठी पाकिस्तानात सर्वत्र रुग्णवाहिका व मालवाहू वाहनांच्या सेवेचं जाळं विणलं. त्याचबरोबर शिस्तबध्द सेवाकर्मींची मोठी फळी उभी केली. कालांतराने त्यात हेलिकॉप्टर सेवेचीही भर पडली. पूर, भूकंप किंवा रेल्वे अपघातासारखी कोणतीही आपत्ती असो, इदी फाऊंडेशनचे स्वयंसेवक सरकारी यंत्रणेआधीच मदतीचा हात घेऊन घटनास्थळी पोहोचलेले असतात. झुल्फिकार अली भुट्टो असो किंवा नवाज शरीफ वा आसिफ अली झरदारी असो सर्वच राज्यकर्त्यांनी वेळोवेळी इदींच्या सेवाकेंद्रांची मदत घेतली. इदींनी केलेल्या त्यांच्या सेवाकार्याच्या प्रचंड विस्तारामुळे आणि त्यांच्या धर्मनिरपेक्ष सेवाभावामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीही लाभली आहे. सेवाकार्य व मानवता ही मूल्यं आचरणात आणून मानवसेवेसाठी इदींनी स्वत:ला सर्व कुटुंबासह जणू वाहूनच घेतलं! रस्त्यात त्यांनी अक्षरश: भीक मागून विलक्षण अशा भीक अभियानाच्या प्रयोगातून संस्थेसाठी प्रचंड निधी जमा केला. शासनाची दंडेलशाही, धर्मांधांचा विरोध आणि दहशतवाद्यांचा दबाव याला सामोरं जात, त्यांनी आपलं कार्य जिद्दीने पुढे नेलं. त्याचंच हे चित्तवेधक व प्रेरणादायी आत्मकथन… केवळ मानवतेसाठी…! | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 300 | 21.6 | 14 | 1.6 | 380 | Autobiography of Abdul Sattar Edhi. He lead his whole life to help humankind. Developed the most widespread Helpline and Ambulance network in every town and village of Pakistan. His organisation reaches the calamity site even before the government. In this book he describes his life, work and experiences. A sure inspiration for the Humankind!! | व्यक्तिरंग | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | Social | सामाजिक | 195 | KevalManavtesathi.jpg | Keval ManavtesathiBC.jpg |
Reviews
There are no reviews yet.