340 | 978-93-86493-22-4 | Maza Dhangarwada | माझा धनगरवाडा | Dhananjay Dhurgude | धनंजय धुरगुडे | शेळ्या-मेंढ्यांसोबत आपला कुटुंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकणारा एक धनगर आपल्या पोरांना शिकवायचं असा निश्चय करतो, आणि बापाचं हे स्वप्न उराशी घेऊन धनगरवाड्यातलं एक कोकरू बिचकत बिचकत शाळेत जाऊ लागतं… वादळवारा असो, वा सतत बदलणारा मुक्काम असो, काबाडकष्ट करून ते आपलं शालेय शिक्षण पूर्ण करतं. नंतर शहरामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेतं. शिक्षणासाठी प्रसंगी मोलमजुरी करून ‘बापाचं स्वप्न पूर्ण करायचंच’ असा निर्धार करतं आणि स्वत:च स्वत:ला प्रेरित करत राहतं! आत्मभान जागृत झालेल्या एका धनगराचं हे विलक्षण आत्मकथन… या कथनात लेखक धनंजय धुरगुडे धनगर समाजाच्या रूढी-चालीरीती आणि जीवनपद्धती यांचं जिवंत चित्रण करतात. त्यांचे पारंपरिक धनगरी खेळ, गजीनृत्य व सण-उत्सव यांचं शब्दचित्र रेखाटतात, आणि शिक्षणामुळे झालेला आपला विकास सांगत धनगर समाजाचं वास्तववादी दर्शन घडवतात. एका धनगराने अस्सल धनगरी शैलीत प्रथमच चितारलेला हा – माझा धनगरवाडा! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 388 | 21.6 | 14 | 2.1 | 460 | समाजरंग | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | Social | सामाजिक | 400 | Majha_Dhangarwada | MazaDhangarwadaBC.jpg |
वॉर्ड नंबर पाच, केईएम
डॉ. रवी बापट
सुनीती जैन
ही सारी कहाणी आहे केईएम हॉस्पिटलमधील ‘वॉर्ड नंबर पाचची’. वैद्यकीय व्यवसायात असताना डॉ.बापट यांना आलेले अनुभव, उपचारादरम्यान भेटलेले विविध प्रकारचे रुग्ण, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज…
डॉक्टरने रुग्णाकडे केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि पुस्तकी ज्ञानातून पाहणं पुरेसं नाही. रुग्णाचं मन, त्याचा स्वभाव, त्याच्या भोवतालचं वातावरण हे समजून घेवून त्यांच्याशी संवाद साधून मगच उपचार करणं डॉ.बापट यांना गरजेचं वाटलं. शरद पवार ते सतीश राजे, दादा कोंडके ते दत्तू मिस्त्री, रुग्ण कुणीही असो त्याची पत-प्रतिष्ठा न पाहता शल्यचिकित्सक डॉक्टर बापटांनी सारख्याच आपुलकीने उपचार केले. अशा सर्व अनुभवांविषयी…
Reviews
There are no reviews yet.