अष्टपैलू स्मार्टफोन

आपल्या अँड्रॉइड मोबाइलमधील सर्व सोयी-सुविधा व अ‍ॅप्स आत्मविश्वासाने वापरण्यासाठी सचित्र मार्गदर्शन


सुश्रुत कुलकर्णी


श्री. व सौ. देशमुख यांनी मुलांच्या आग्रहाखातर स्मार्टफोन घेतला खरा, पण तो वापरताना काही चुकलं तर कुठेतरी गडबड होईल, या भीतीने ते अँड्रॉइड स्मार्टफोनचा पूर्ण वापर करताना बिचकत होते.
पण थोड्याच दिवसांत, श्री. व सौ. देशमुख स्मार्टफोनला केवळ सरावलेच नाहीत, तर आत्मविश्वासाने फोटो काढून ते वॉट्सअ‍ॅप करू लागले, आणि हवे ते गेम्स, अ‍ॅप्सही डाउनलोड करू लागले! ही किमया घडवली होती, अष्टपैलूू स्मार्टफोन या पुस्तकरूपी मित्राने! या मित्राने त्यांना खालील गोष्टी सचित्र समजावून सांगितल्या :

– बॉक्समधून आलेला नवाकोरा स्मार्टफोन कसा जोडायचा?
– कॉन्टॅक्ट्स सेव्ह कसे करायचे, त्यांचे ग्रुप कसे करायचे?
– एसएमएस, ग्रुप एसएसएस कसे करायचे?
– कार्यक्रमाला जाताना फोन ‘सायलेंट’ कसा करायचा?
– वाय-फाय स्मार्टफोनला कसे जोडून घ्यायचे?
– ईमेल कसा करायचा? त्याला फाइल कशी जोडायची?
– फोटो किंवा व्हिडिओ कसा काढायचा, तो शेअर कसा करायचा?
– वॉट्सअ‍ॅप, फेसबुक इ. अ‍ॅप्स कशी वापरायची?
– वॉलपेपर, थीम्स कशा बदलायच्या?
– आणि अर्थात, ऑनलाइन शॉपिंग कसं करायचं… आणि अनेक!

या पुस्तकातल्या छोट्या-छोट्या, पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्समुळे श्री. व सौ. देशमुख बिनधास्त स्मार्टफोनमधल्या उपलब्ध सोई-सुविधा वापरू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच तुम्हीही या अष्टपैलू स्मार्टफोनचं ‘बोट’ धरा, स्मार्ट व्हा!


125.00 Read more

आपल्यासाठी आपणच

उत्तरायुष्य गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी


डॉ. रोहिणी पटवर्धन


वय वाढणं म्हणजे नक्की काय असतं? तर वयाबरोबर अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होणं. या बदलांमुळे थोडंसं गोंधळल्यासारखं होतं. साठीनंतरच्या या टप्प्यात अनेक कौटुंबिक व सामाजिक समस्याही जाणवू लागतात आणि त्यावर समंजस भूमिका घेण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळावं अशी एक गरज वाटू लागते.
आज आपली दैनंदिन जीवनशैली अमूलाग्र बदलली आहे. त्याचबरोबर आयुष्यमानही वाढलं आहे. वाढलेल्या आयुष्याचं नियोजन कसं करावं याचा विचारही ज्येष्ठांनी केलेला नसतो. त्यामुळे अनेक समस्या भेडसावतात.
या दृष्टीने या पुस्तकात ज्येष्ठांचे प्रश्न निर्माण होण्यामागची कारणं कोणती? वृध्दांच्या समस्यांवर काम करणार्‍या संस्था नक्की काय करतात? अशा प्रश्नांची चर्चा केली आहे. याशिवाय ‘वृध्दकल्याणशास्त्र’ या नवीन विद्याशाखेची ओळख करून दिली आहे. तसेच वृध्दनिवासाचे विविध पर्याय, वृध्दाश्रमांचे प्रकार व तेथील सोयी-सुविधांची माहितीही यात आहे.
वृध्दांच्या समस्या वृध्दांनीच सोडवाव्यात, त्यासाठी त्यांनी मानसिकता बदलावी व वृध्दकल्याणासाठी पुढाकार घ्यावा. म्हणजेच ‘आपल्यासाठी आपणच’ हा सर्वस्वी नवा विचार व सकारात्मक दृष्टिकोन या पुस्तकात लेखिकेने मांडला आहे.


175.00 Add to cart

आनंदस्वर ज्येष्ठांसाठी

चैतन्यमयी सेकंड इंनिंगसाठी सहज सोपं मार्गदर्शन


डॉ. रोहिणी पटवर्धन


आयुष्याची ‘पहिली इनिंग’ खेळून झाली आहे… जबाबदाऱ्या, कर्तव्यं पार पाडून झाली आहेत. केलेले, झालेले, दिलेले असे सगळे हिशोबही करून झाले आहेत. आता खूप सारा वेळ आहे. आयुष्याच्या संध्याकाळी डोळ्यासमोरून पुर्वायुष्य जातं, आणि जाणवतं… प्रेमाची, हक्काची माणसं जवळ नाहीत किंवा जवळ असूनही नसल्यासारखीच…
मग ‘दुसरी इनिंग’ खेळण्यासाठी खऱ्या अर्थाने आपणच उरतो आपल्यासाठी!
ज्येष्ठत्वाकडे नेणारा हा प्रवास आता सुरू होतो आहे याची जाणीव करून देत, आयुष्याच्या या ‘सेकंड इनिंग’ची सुरुवात किती ‘चैतन्यमयी’ होऊ शकते याचा प्रत्यय देणारं हे पुस्तक आहे. ही ‘सेकंड इनिंग’ सकारात्मकरित्या जगून अर्थपूर्ण कशी करता येईल याबद्दल अत्यंत सहज-सोप्या पद्धतीने
मार्गदर्शन यात मिळतं.
उतारवयातल्या विविध आजारांविषयीची थोडक्यात माहिती, वृद्धकल्याणशास्त्र या अभ्यासाच्या नव्या शाखेचा परिचय, इच्छापत्र व मृत्यूपत्राबद्दलचे समज-गैरसमज, वृद्धाश्रमांची माहिती अशा अनेक कळीच्या विषयांवर लेखिका छोट्या सुटसुटीत लेखांमधून संवाद साधते.
आजकाल आयुर्मान वाढतं आहे आणि त्याला जोडून येणारे मानसिक, शारीरिक क्लेशही वाढत आहेत… मात्र यावर मात करून आयुष्याची ही ‘सेकंड इनिंग’ समृद्ध करता येते… ती कशी करावी याचा तालबद्ध मंत्र देणारं पुस्तक…आनंदस्वर ज्येष्ठांसाठी!


125.00 Add to cart

आजी-आजोबा : आधार की अडचण?


भा.ल. महाबळ


लेखक भा.ल.महाबळ यांनी अनेक प्रकारे विचारमंथन करून आपापल्या परीने मार्ग काढणारे काही आजी-आजोबा या पुस्तकात उभे केले आहेत. हे आजी-आजोबा अनेकविध कुटुंबातील आजी-आजोबांचे स्थान आणि संबंध यांचे नमुने दाखवतात. दोन्हीपक्षी कुठे काय चुकत असते तेही समोर ठेवतात.
प्रत्येकाने विचार करून, थोडे अंतर्मुख होऊन आपापले काटे-कंगोरे झिजवून घेतले, आपापल्या भूमिका समजून घेतल्या, दुसर्‍याच्या मन:स्थितीचा विचार केला तर कितीतरी संसार सुखा-समाधानाने एकमेकात गुंतून राहू शकतील.
प्रस्तुत पुस्तकातील लेख कुटुंबातील सर्व घटकांना विचार करायला प्रवृत्त करतील व घरात निकोप वातावरण निर्माण होण्यास सहाय्यभूत होतील अशी आशा आहे.


170.00 Add to cart

जेष्ठांसाठी ४ गोष्टी युक्तीच्या

कुटुंबातील सामंजस्याकरता…


भा.ल. महाबळ


आज बदललेल्या जीवनशैलीमुळे एकत्र कुटुंबाचं विभाजन होऊन विभक्त कुटुंबांचं प्रमाण वाढलं आहे. कोणाला वेळ द्यायला किंवा कोणाचा वेळ घ्यायलाही आपल्याकडे फुरसत नसते. तरीही, बरीच कुटुंबं अशी आहेत जी गुण्यागोविंदाने एकत्र राहाता आहेत, एकमेकांशी संवाद ठेवून आहेत. अशा एकत्र कुटुंबातील ज्येष्ठांसाठी भा. ल. महाबळ काही बोलक्या व्यक्तिरेखांमधून व प्रसंगांतून नात्यात जाणवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नकळत मार्गदर्शन करून जातात. घरात सशक्त व आनंदी वातावरण निर्माण व्हावं यासाठी घरातील सदस्य — विशेषत: ज्येष्ठ व्यक्ती विधायक व परिपक्व भूमिका बजावू शकतात. कुटुंबातील प्रत्येकाने विचारपूर्वक कृती केल्या व दुसऱ्याचा विचार केला तर कुटुंब कसं सुखी व समाधानी राहू शकतं हे लेखक विविध लेखांमधून पटवून देतात.

नुसतं वयाने ‘ज्येष्ठ’ न राहता वागण्यातून ‘ज्येष्ठ’ होण्यासाठी ज्येष्ठांसाठी चार गोष्टी युक्तीच्या….


140.00 Read more

स्मार्टपणे व्हा कॅशलेस

आपले आर्थिक व्यवहार निर्धास्तपणे `कॅशलेस’ पद्धतीने करण्यासाठी सचित्र मार्गदर्शन


प्रणव सखदेव


देसाई काका-काकूंकडे डेबिट कार्ड तर होतं, पण ते कसं वापरायचं हे त्यांना माहिती नव्हतं. खरंतर, माहिती नसण्यापेक्षा त्यांच्या मनात कार्ड वापरण्याविषयी भीती होती. मग एके दिवशी त्यांना सोसायटीतल्या हास्यक्लबमधल्या देशमुखकाकांनी एक पुस्तक भेट दिलं. या पुस्तकात पुढील विषय सचित्र समजावून सांगितले होते –
* क्रेडिट/डेबिट कार्डाचा वापर करून ऑनलाइन खरेदी कशी करायची? कार्ड स्वाइप करताना काय करायचं?
* रेल्वेचं कवा सिनेमाचं तिकिट ऑनलाइन कसं बुक करायचं?
*ऑनलाइन वीज बिल कसं भरायचं?
* NEFT/ RTGS, UPI इत्यादी सेवा कशा वापरायच्या?
* इंटरनेट बँकिंग व मोबाइल बँकिंगमधल्या सुविधा कोणत्या, त्या कशा वापरायच्या?
* सशक्त पासवर्ड्स कसे तयार करायचे?
* ई-वॉलेट्समध्ये पैसे कसे भरायचे आणि ते कसे वापरायचे?
* लघु व मध्यम उद्योजकांनी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी कोणती साधनं घ्यायची?
* सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना, इत्यादी
या पुस्तकातल्या टिप्स आणि मार्गदर्शनामुळे देसाई काका-काकू निर्धास्तपणे कॅशलेस व्यवहार करू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच आजच्या स्मार्टयुगात या पुस्तकाच्या सोबतीने तुम्हीही स्मार्टपणे व्हा कॅशलेस !



125.00 Add to cart

साठीनंतरचा आहार व आरोग्य

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेलं मार्गदर्शन


डॉ. वर्षा जोशी


वैद्यकशास्त्रातील नवनवीन संशोधनांमुळे माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे. आज वृद्धत्वाची व्याख्या नव्याने करण्याची वेळ आली आहे. साठीनंतर आयुष्यातली प्रमुख कर्तव्यं बहुतांशपणे पार पडलेली असतात, थोडा निवांतपणाही लाभला असतो. पण त्याचबरोबर आयुष्यातल्या या टप्प्यावर आरोग्याच्या थोड्या कुरबुरीही सुरू होत असतात.

या पार्श्वभूमीवर साठीनंतरही सर्वांना चांगलं आयुष्य जगता यावं हा विचार मनात ठेऊन डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकाची रचना केली आहे. साठीनंतरच्या व्यक्तींनी कोणता आहार घ्यावा, तो किती व कोणत्या वेळी घ्यावा, कोणते व्यायाम करावेत, यासाठी त्या या पुस्तकात मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे साठीनंतर उदभवू शकणारे ज्ञानेंद्रियांचे आजार कोणते, विस्मरणावर मात करण्यासाठीचे उपाय कोणते, एकटेपणा, नैराश्य व दैनंदिन जीवनातील ताण यावर मात कशी करावी यासाठीही डॉ. वर्षा जोशी मार्गदर्शन करतात. मुख्य म्हणजे हे सर्व त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून व सोप्या पध्दतीने सांगितलं आहे.

विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून साठीनंतरचं जीवन व्याधीमुक्त व आनंददायी कसं करता येईल यासाठी या पुस्तकातून निश्चितच नवा मूलमंत्र मिळेल.


175.00 Add to cart