Reading Time: 2 Minutes (232 words)
213 | 978-93-80361-99-4 | Sathinantarcha Aahar Va Aarogya |
साठीनंतरचा आहार व आरोग्य | शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेलं मार्गदर्शन | Dr. Varsha Joshi | डॉ. वर्षा जोशी | वैद्यकशास्त्रातील नवनवीन संशोधनांमुळे माणसाची आर्युमर्यादा वाढली आहे. आज वृध्दत्वाची व्याख्या नव्याने करण्याची वेळ आली आहे. साठीनंतर आयुष्यातली प्रमुख कर्तव्यं बहुतांशपणे पार पडलेली असतात, थोडा निवांतपणाही लाभला असतो. पण त्याचबरोबर आयुष्यातल्या या टप्प्यावर आरोग्याच्या थोड्या कुरबुरीही सुरू होत असतात.
या पार्श्वभूमीवर साठीनंतरही सर्वांना चांगलं आयुष्य जगता यावं हा विचार मनात ठेऊन डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकाची रचना केली आहे. साठीनंतरच्या व्यक्तींनी कोणता आहार घ्यावा, तो किती व कोणत्या वेळी घ्यावा, कोणते व्यायाम करावेत, यासाठी त्या या पुस्तकात मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे साठीनंतर उदभवू शकणारे ज्ञानेंद्रियांचे आजार कोणते, विस्मरणावर मात करण्यासाठीचे उपाय कोणते, एकटेपणा, नैराश्य व दैनंदिन जीवनातील ताण यावर मात कशी करावी यासाठीही डॉ. वर्षा जोशी मार्गदर्शन करतात. मुख्य म्हणजे हे सर्व त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून व सोप्या पध्दतीने सांगितलं आहे. विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून साठीनंतरचं जीवन व्याधीमुक्त व आनंददायी कसं करता येईल यासाठी या पुस्तकातून निश्चितच नवा मूलमंत्र मिळेल. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 130 | 21.6 | 14 | 0.7 | 160 |
It is a health guide for the people who have crossed sixty. The book gives information about the ideal diet and exercise for the seniors. The book also provides information about differenet diseases & psychological issues which can occur after sixty.
|
Health | आरोग्य | Senior Citizen | जेष्ठांसाठी | 125 | Sathinantarcha Aahar Va Aarogya_jpg | Sathinantarcha Aahar Va Aarogya_BackBC.jpg |
Reviews
There are no reviews yet.