महत्त्वाकांक्षी कादंबरीत्रय – चेटूक, ऊन व ढग

आवडते लेखक विश्राम गुप्ते यांच्या कादंबरीच्या या त्रिधारेची मी बरीच वर्षं वाट बघत होते. चेटूक कादंबरीची सुरुवात होते साधारण पन्नासच्या दशकातील काळात. राणी ही इंदोरसारख्या शहरातील एका सीकेपी कुटुंबातील तरुण मुलगी वसंत दिघेच्या प्रेमात पडते. वसंतही राणीसाठी वेडा होतो. राणीचं अवघं सतराचं वय. प्रेमाचा अर्थही न सुधरण्याचं वय. खरंतर नुसतंच आकर्षण. लग्न झाल्यावर स्त्रीपुरुष संबंधातील [...]

बेमालूमपणे विणलेली त्रिसूत्री… सेक्स-व्हायलन्स-कॉन्स्पिरसी

अगाथा ख्रिस्तींनी मिस मार्पले आणि हर्क्यूल पॉयरॉ अशा दोन स्वयंभू डिटेक्टिव पात्रांना रहस्यकथांच्या साहित्यविश्वात आणलं. अर्ल स्टॅनली गार्डनर यांनी पेरी मेसन आणि पॉल ट्रेक अशा दोघांना वकील आणि डिटेक्टिव म्हणून सादर केलं. ऑर्थर कॉनन डॉयल यांनी शेरलॉक होम्स आणि डॉक्टर जॉन वॉट्सन या अजरामर व्यक्तींना कल्पनाविश्वातून साहित्य-सत्यात आणलं. करमचंद या डिटेक्टिव हिंदी सिरियलने त्याच नावाचा [...]

वाचकांचे समाजमाध्यमांवरील प्रतिसाद

लैंगिकतेचा वेध घेणाऱ्या दीर्घकथा नुकतीच रोहन प्रकाशनाने हृषीकेश गुप्तेंची तीन पुस्तकं प्रसिद्ध केली. या पुस्तकांचा आकार आणि निर्मिती खूपच देखणी आहे. गुप्तेचं ‘परफेक्टची बाई आणि फोल्डिंगचा पुरुष' हे पुस्तक त्याच्या नेहमीच्या पुस्तकांपेक्षा जरा हटके आहे.एक स्त्री विधवा होते आणि नंतर तिला भेटलेले पुरुष, एक स्त्री म्हणून त्या त्या पुरुषांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तीदेखील त्यांच्याकडे कशा [...]

युगानुयुगे चालत आलेलं स्थलांतरसूक्त

‘वाचकांची मनं विदीर्ण व्हावीत म्हणून मी यथाशक्ती प्रयत्न केला आहे, त्यांना समाधान प्राप्त व्हावं यासाठी नाही. जीवन जसं जगलं जातं तसंच हे पुस्तक लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे, पुस्तकं जशी लिहिली जातात तसा नव्हे. वाचकाला वस्तुस्थितीच्या अनुभवात सहभागी होण्यास प्रवृत्त करावं यासाठी मी पुस्तकात प्रयत्नशील राहिलेलो आहे..’-जॉन स्टाइनबेक ‘ग्रेप्स ऑफ रॉथ' वाचून तीन दिवस उलटले [...]

वाचकांचे प्रतिसाद

बोलकी पुस्तकं फेसबुकमुळे अनेक चांगले मित्र-मैत्रिणी मिळाले, त्यांच्यातली वैशिष्ट्यं मनाला मोहवून गेली. या सगळ्यांकडून आजही भरभरून काही ना काही मिळतं….त्यातच पुस्तकं म्हटलं की, गेल्या काही दिवसांत काही मित्र-मैत्रिणींनी अनेक पुस्तकं दिली. त्यांतलाच एक फेसबुकवरचा मित्र म्हणजे फारूक एस. काझी!कुरियर आलं आणि त्यात एकच पुस्तक असावं असं मी गृहीत धरलं. पण जेव्हा वाचण्यासाठी पार्सल उघडलं, तेव्हा [...]

‘मैत्रिणी म्हणाव्यात अशा लेखिका’ या मनोगताला आलेली दाद…

डॉ. वर्षा जोशी हृद्य मनोगत : ‘मैत्रिणी म्हणाव्यात अशा लेखिका' हे संपादक प्रदीप चंपानेरकर यांचं मनोगत हृद्य वाटलं. हृद्य या दृष्टीने की, आपल्या व्यवसायामध्ये भेटलेल्या स्त्रियांविषयी असे कौतुकोद्गार काढणारी व्यक्ती - विशेषत: पुरुष विरळाच. हा लेख म्हणजे स्त्री-पुरुषांमधल्या विशुद्ध स्नेहाचं प्रतीकच म्हणावं लागेल. मनोगताच्या निमित्ताने चंपानेरकर यांचं एकंदर लेखनही मला कसदार वाटतं. माझा, त्यांचा व [...]

तुफानी, भिजवून टाकणारे, बेदरकार… काळेकरडे स्ट्रोक्स!

“स्पृहा, तुला माझी नवीन कादंबरी पाठवायची आहे. पत्ता पाठव.” – प्रणवचा काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर आलेला मेसेज. मला फारच भारी वाटलेलं. मराठीतला आजच्या महत्त्वाच्या लेखकांमध्ये गणला जाणारा हा माणूस कॉलेजची जुनी ओळख लक्षात ठेवून मला पुस्तक पाठवतोय! आणि मग तीन-चार दिवसांत माझ्या हातात पडलं – ‘काळेकरडे स्ट्रोक्स’. प्रणवचं नवंकोरं पुस्तक. हातात पडल्यावर अधाशासारखं वाचून संपवलं. आणि [...]

आधुनिक भारताची जडणघडण करणारे शिल्पकार

भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याला आता सात दशकांहून अधिक काळ लोटला आहे. भारताला राष्ट्र म्हणून स्वतंत्र अस्तित्व मिळालं आणि त्याचबरोबर एक लोकशाही राष्ट्र म्हणूनही त्याचा जन्म झाला. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या वेळी परदेशातील अनेक पत्रकार, राजकीय अभ्यासक यांनी असं भाकित वर्तवलं होतं की, भारताची अफाट लोकसंख्या, बहुविध जाती, अनेक भाषा, भिन्न धर्म व मोठ्या प्रमाणावर असणारी [...]