Reading Time: 9 Minutes (877 words)

लैंगिकतेचा वेध घेणाऱ्या दीर्घकथा

Perfectchi Bai cover

नुकतीच रोहन प्रकाशनाने हृषीकेश गुप्तेंची तीन पुस्तकं प्रसिद्ध केली. या पुस्तकांचा आकार आणि निर्मिती खूपच देखणी आहे. गुप्तेचं ‘परफेक्टची बाई आणि फोल्डिंगचा पुरुष’ हे पुस्तक त्याच्या नेहमीच्या पुस्तकांपेक्षा जरा हटके आहे.
एक स्त्री विधवा होते आणि नंतर तिला भेटलेले पुरुष, एक स्त्री म्हणून त्या त्या पुरुषांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तीदेखील त्यांच्याकडे कशा प्रकारे बघते आणि त्यांचा उपयोग किंवा वापर कशा पद्धतीने करते, हे खूप वेगळ्याच तऱ्हेनं गुप्तेंनी मांडलेलं आहे. तिच्यावर लट्टू झालेले वेगवेगळ्या स्तरातले, वेगवेगळ्या स्वभावधर्माचे पुरुष आणि त्यांना नीट हाताळत शेवटी आयुष्यात स्थैर्य किती महत्त्वाचं आहे, हे लक्षात घेऊन तिने केलेली त्यातल्या एका पुरुषाची निवड आणि त्याच वेळी त्याने आपल्याला पूर्ण समाधानी न केल्यास तिने ‘हातचा राखून ठेवलेला’ असतोच, हे सगळं वाचताना खूपच मजा येते. खरंतर असं वास्तव आपण आपल्या आजूबाजूला अनेकदा बघितलेलं असतं, पण ते ज्या पद्धतीने गुप्तेंनी मांडलंय ते वाचताना खूप वेगळा अनुभव(एव्हरिथिंग इज फेअर इन लव्हं अँड वॉर प्रमाणे) येतो. तसंच उत्कंठाही वाढत जाते. हे कथानक उभं करताना गुप्तेंनी विक्रम-वेताळ ही पात्रं घेवून कथेची सुरुवात आणि शेवट केलेला आहे.
दुसरी कथा आहे ‘तिळा दार उघड…’ वयात येणाऱ्या मुलाला लैंगिकतेची जाणीव जेव्हा होते, किंवा करून दिली जाते त्यावर ही कथा बोलत जाते. जन्मत:च या मुलाच्या लिंगावर तीळ दिसतो आणि त्यावर पुढे तो स्त्रियांना वश करण्यात तरबेज कसा होणार वगैरे चर्चा झडायला लागतात. त्याच्या वयाच्या त्या त्या टप्प्यात त्याच्यातले होणारे बदल, त्याला मिळत जाणारं लैंगिक ज्ञान, हस्तमैथुनाचा अनुभव, मित्रांच्या गप्पा आणि शेअिंरग, प्रत्यक्ष स्त्रीचा अनुभव न घेताही मारलेल्या बढाया असं सगळं काही आपण त्याच्या प्रवासात बघत राहतो. या कथेचीही मांडणी देखील गुप्तेंनी निराळ्या तऱ्हेनं केलेली आहे.
दोन्ही दीर्घकथा लैंगिकतेभोवती फिरत असल्या तरी त्या कुठेही अश्लील वाटत नाहीत किंवा आपला ताळतंत्र सोडत नाहीत. एकच सांगेन, कुठलेही नीतिमत्तेचे निकष वगैरे न लावता स्वच्छ मनाने या दोन्ही कथा वाचायला हव्यात, तरच त्यांच्यातली वैशिष्ट्यं आणि मौज अनुभवता येईल.

  • दीपा देशमुख, पुणे (फेसबुक वॉलवरून साभार)

करोनाकाळातल्या नकारात्मकतेत ‘प्रेमाचा कोअर’ जपणारा कथासंग्रह

LITOC-cover

आठ मान्यवर, जाणत्या लेखकांच्या एकाहून एक सरस कथा असलेलं ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ हे पुस्तक म्हणजे करोनाच्या काळातल्या आपल्या बदललेल्या; आधी होती त्यापेक्षा अधिक स्वार्थी आणि संकुचित झालेल्या मानसिकतेचा आरसाच म्हणावं लागेल. यात बाहेरच्या जगासारखीच लॉकडाऊन झालेली नाती आहेत; त्यातली अगतिकता आहे; ‘बहती गंगा मे हाथ धोने वाले’ आहेत तसेच नि:स्वार्थपणे जनसेवा करणारे सरकारी कर्मचारीही आहेत. आलेल्या प्रत्येक फॉरवर्ड व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवणारी अंधश्रद्धा आहे; हजारो किलोमीटर रिकाम्या पोटी पायी चालत जाणाऱ्या मजुरांची व्यथा आहे. आणि या सगळ्याची सांगता झाली आहे सृष्टीला शरण गेलेल्या क्षुद्र मानवाच्या हतबलतेने.या करोनाच्या इतक्या ताणतणावात, निगेटिव्हिटीमध्ये लिखाणात ‘प्रेम’ हा कोअर जपणं मला कठीण वाटतं. पण यातली कुठलीच कथा त्याबाबतीत निराश करत नाही. नीरजांची ‘एक तुकडा’ असू दे किंवा मनस्विनींची ‘जादूची बोट’. त्यात कोरोनाचं संकट गेल्यानंतरच्या उजळ भविष्याचं स्वप्नरंजन आहे. मतकरींची ‘नाऊ यू सी मी’ आणि बोजेवारांची ‘निके निके..’ दोन्हींत एकीकडे नात्यातला दुरावा तर दुसरीकडे ओलावा आहे. आणि ‘बी निगेटिव्ह’ची मिताली तर कमालीची धीराची आणि आश्वासक आहे. प्रणवचं एका मुख्य विषयासोबत इतरही कन्सर्न्स हाताळण्याचं कौशल्य; हषीकेशच्या मिथकाच्या अंगाने जाणाऱ्या कथेत वाक्यावाक्यात भरलेला सिम्बॉलिझम; ‘मायं गाव’च्या नायिकेची आपल्या मातीची ओढ हे सगळं मिळून तयार झालेलं ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ नावाचं रसायन मनात घर करतं. पुस्तकाचं मुखपृष्ठ, कथांचा क्रम फार सूचक आहेत. त्यासाठी अनुजा आणि रोहन टीमचं विशेष कौतुक.
या करोनाच्या मुकुटाचे काटे अंगावर झेलत आपण जगतो आहोतच. त्या जखमा कधी बऱ्या होतील की नाही, हे सांगणं कठीण आहे. पण त्यांच्यामुळे झालेल्या दु:खाला वाट करून देण्याचं काम या पुस्तकाने केलंय, हे निश्चित.

  • सृजना प्रज्ञा, पुणे (फेसबुक वॉलवरून साभार)

गोष्टीवेल्हाळ पण अंतर्मुख करणाऱ्या दीर्घकथा

तुम्ही अरेबियन नाईट्स वाचलं आहे? एक गोष्ट, त्या गोष्टीत गोष्ट, त्या गोष्टीतल्या गोष्टीत एक गोष्ट, आणि त्या गोष्टीत अजून एक गोष्ट. मूळ मुद्दा हरवून टाकणं आणि गोष्ट ऐकणाऱ्याला उभ्या दुनियेची सैर घडवून आणणं. सतीश तांबे लिखित, रोहन ओरिजिनल ईबुक्स अंतर्गत प्रकाशित झालेल्या ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’चा मात्र उद्देश तसा नाही. गोष्टीचा बाज असला, तरी निव्वळ एकाला एक जोडून गोष्ट वाढवत नेऊन रंजन करणं हा इथे अजिबातच उद्देश नाही. मार्तंड भणंगे नामक ज्येष्ठ वयाचा लेखक आणि तरुण होतकरू लेखक भुवन वेंदळे यांच्यातील मैत्रीवजा संवाद या रूपाने खरंतर आधुनिक काळातील समग्र मराठी साहित्यातील प्रवाहांचा वेध घेणारा हा इतिहासच सांगितलेला आहे. साठोत्तरी मराठी साहित्याचा इतिहास म्हणता येईल, पण सांगितला आहे कथेच्या अंगाने. एक लेखक स्वत:ची ओळख शोधत असतो, आणि त्याला ती स्वत:पुरती आणि विशिष्ट अशी हवी असते. इतर कोणाही लेखकापेक्षा वेगळी. तशी त्याला ती सापडतेही. आणि पुढे काय काय होतं? हे स्वप्नवत वाटणारं कथानक काहीसं एखाद्या महानगरातील गूढ गल्ल्यांमधून भरकटत शोधत प्रत्यक्षच वाचण्यासारखं आहे. गंमत म्हणजे, गोष्टीत गोष्ट उलगडत जात असताना मध्येच गोष्टीत कविता येते. हे कथेचा फॉर्म म्हणून एक निराळेच वैशिष्ट्यं आहे असं वाटतं.
याच पुस्तकातील दुसरा भाग म्हणजे ‘रावण आडनावाच्या पांडवपुत्राच्या नावाची जन्मकथा’ ही गूढकथा म्हणता येईल अशी कथा! नावापासूनच उत्कंठा लावणारी आणि वरवर निव्वळ पुराणातल्या चमत्कारिक दंतकथा असतात तशी भासणारी, पण प्रत्यक्षात त्यापेक्षा फार सखोल अर्थ असलेली कथा आहे ही. मानवी आयुष्य, नातेसंबंध, इच्छा, आकांक्षा इत्यादींचा न संपणारा पट त्यातून उलगडत जातो. पुस्तकाचे दोन भाग कथा म्हणून तसे स्वतंत्र असले तरीही पहिल्या भागात आधुनिक काळातील साहित्याच्या पार्श्वभूमीवर उलगडणारा पट आणि दुसऱ्या भागात अतिशय पुरातन काळापासून चालत आलेला मानवी जीवनाचा पट हे दोन्ही एकमेकांशी संलग्न आणि म्हणूनच एकसंध आहेत, हे लक्षात येते. हीच या पुस्तकाची खरी ताकद आहे.

  • विनील भुर्के, (किंडलवरील रिव्ह्यूजमधून साभार)

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल ऑक्टोबर २०२०


हेही वाचून पहा…

मर्डर इन माहीम


कवी, कादंबरीकार, अनुवादक आणि पत्रकार म्हणून जेरी पिंटो प्रसिद्ध आहेत. ते मुंबईत राहतात. ‘एम अँड द बिग हूम' या त्यांच्या ‘द हिंदू लिटररी प्राईझ आणि द क्रॉसवर्ड बुक अ‍ॅवॉर्ड फॉर फिक्शन’ या पुरस्कारप्राप्त पुस्तकाचे तसंच, ‘हेलन : द लाईफ अँड टाइम्स ऑफ अँन एच –बॉम्ब’ या चित्रपटविषयक सर्वोत्तम पुस्तकाचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे ते लेखक आहेत. प्रसिद्ध मराठी लेखक दया पवार यांच्या ‘बलुतं' या आत्मचरित्राचा तसंच, मल्लिका अमरशेख यांच्या ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय' या आत्मचरित्रपर लेखनाचा आणि वंदना मिश्रा यांच्या ‘मी मिठाची बाहुली’ या आत्मकथनाचा इंग्लिश अनुवाद त्यांनी केला आहे. जेरी पिंटो यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं असून त्यांना येल युनिव्हर्सिटीच्या विन्डहॅम-कॅम्पबेल पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.

अनुवाद : 
मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.

माटुंगा रेल्वे स्टेशनच्या टॉयलेटमध्ये सापडलेला एका तरुणाचा मृतदेह आणि तिथून सुरू झालेला शोधाचा एक प्रवास… क्षणोक्षणी वेगळ्याच व्यक्तींकडे वळणारी संशयाची सुई आणि या प्रवासात सतत येणारी अनपेक्षित वळणं !

इन्स्पेक्टर झेंडे आणि निवृत्त पत्रकार पीटर डिसूझा यांच्या या शोधप्रवासात उलगडते – ‘मुंबई’ या मायानगरीच्या पोटात दडलेली एक वेगळीच दुनिया…यातलं ‘गे’ व्यक्तींचं जग, त्याला असणारी अनेक अस्तरं ! इथली अगतिकता…शत्रुत्व…स्पर्धा… मैत्री…क्रौर्य…अशा अनेक भावनांचा प्रत्ययकारी अनुभव ही कादंबरी देते.

संवेदनशील पत्रकार आणि प्रतिभावान लेखक जेरी पिंटो यांचं मानवी नातेसंबंधांतल्या अनेक कंगोऱ्यांचा वेध घेणारं आणि ‘अस्वस्थ’ मुंबईचं वास्तव दर्शन घडवत एका खुनाच्या मुळाशी जाणारं… मर्डर इन माहीम !


250.00 Add to cart

हृषीकेश गुप्ते संग्रहिका

३ पुस्तकांत… २ लघुकादंबऱ्या, २ दीर्घ कथा


शिक्षणाने आणि व्यवसायाने केमिकल इंजिनिअर असलेले हृषीकेश गुप्ते हे मराठी साहित्यातले आजचे आघाडीचे तरुण सर्जनशील लेखक आहेत. रायगड जिल्ह्यातील नागोठणे या गावी त्यांच्या जन्म झाला आणि शिक्षणही तिथेच झाले. 2000 सालापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि 2008 सालापासून त्यांचं लेखन विविध नियकालिकांमधून प्रसिद्ध झालं. मनातली भीतीची आदिम भावना, माणसाच्या लैंगिक प्रेरणा, त्याच्या भावभावनांची उलघाल ही त्यांच्या लेखनाची मुख्य आशयसूत्रं होतं. गूढ-अद्भुतता, चित्रमय, प्रासादिक व ओघवती भाषा या लेखनवैशिष्ट्यांमुळे त्यांचं लेखन खिळवून ठेवतं. 'दंशकाल’, 'चौरंग' या कादंबऱ्या, 'काळजुगारी’, 'हाकामारी' या लघुकादंबऱ्या आणि 'अंधारवारी’, ‘दैत्यालय’, 'घनगर्द’, 'परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष' हे कथासंग्रह अशी त्यांची एकूण साहित्यसंपदा प्रकाशित आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी 'दिल, दिमाग और बत्ती’ या चित्रपटाचं आणि 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ या स्वलिखित कथेवर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे.

स्थलकालाची रोचक, अद्भुत आणि रम्य सफर

घडवणारी, मराठी रूपककथांच्या दालनात

मोलाची भर घालणारी लघुकादंबरी… काळजुगारी

 

पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून

स्त्री-पुरुष संबंधांतले आदिम पदर उलगडणाऱ्या

दोन अनोख्या दीर्घ कथा…परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष

 

गूढ रहस्याच्या परिघाभोवती क्रौर्य आणि करुणेचे

अस्तर ल्यालेली, अंताला सार्वकालिक सामाजिक आशयाच्या

वेगळ्या उंचीला पोहोचवणारी लघुकादंबरी…हाकामारी


360.00 Add to cart

झुरांगलिंग


हृषीकेश पाळंदे याचा जन्म १९८५ सालचा. तो पुण्यातच शिकला आणि वाढला. आर्किटेक्चरची डिग्री अर्धवट सोडून त्याने बी.एस्सी. स्टॅटिस्टिक्स केलं. त्यानंतर एम.एस्सी व डिप्लोमा इन जर्नालिझम हे दोन्ही कोर्सेसही त्याने अर्धवट सोडून दिले. त्यानंतर कुठलीच नोकरी नीट केली नाही. अर्धवट सोडणं, हे त्याचं लक्षण बनलं. 'काय करणारेस तू पुढे?' या प्रश्नाला कंटाळून कुटुंब आणि पुण्याला सोडून २०११ साली अहमदाबाद ते जम्मू असा १९०० किमीचा एकांडा सायकलप्रवास त्याने केला. या सफरीत त्याला स्वत:बद्दल आणि आयुष्याबद्दल अनेक इंटरेस्टिंग प्रश्न पडले. तो डोक्यातला गुंता त्याने 'दोन चाकं आणि मी' या प्रवासवर्णनपर पुस्तकातून लिहिला. डोक्यातल्या प्रश्नांच्या चक्राला वाहिलेल्या 'बयो' आणि 'भरकटेश्वर' या दोन कादंबऱ्याही लिहिल्या. त्यानं अजूनतरी लिखाणाला सोडलं नाहीये. सध्या तो कोकणात राहतोय. चंगळवादाची झापडं लावून बसलेल्या जगात तो मिनिमलिस्ट जीवनशैलीनी जगू बघतोय . बुद्धाने सांगितलेल्या मध्यमार्गावर सध्या तो बरंच काही वाचतोय, त्यावर उलटसुलट विचार करतोय.

टडंगऽऽऽ टडंगऽऽऽ

मी आहे एक लेखकदेव…

एकदा काय झालं, पुण्यनगरीतल्या त्याच त्या रूटीनला वैतागून मी दूर हिमालयाच्या मुख्य रांगेच्याही पलीकडच्या रम्य प्रदेशात गेलो. हा लदाखी प्रदेश रूक्ष, बोडक्या मातकट पर्वतांचा. हिवाळ्यात तयार होणाऱ्या शुभ्र हिमगालिच्यांचा, खळाळ वाहणाऱ्या नद्यांचा, दरीतल्या हिरवाईचा, डोक्यावर असणाऱ्या गर्द निळ्याभोर आभाळाचा आणि त्याखाली ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाचा! तिथे मी खूप दिवस मुक्काम ठोकला. सामान्य टुरिस्ट म्हणून गेलो नसल्याने मनसोक्त भटकत असतांना मी एक गोष्ट ऐकली. मग झालं काय की, त्या गोष्टीतल्या घटनांच्या प्रवाहाचा माग काढता काढता त्यात अनेक प्रवाह मिसळत गेले. म्हणजे अनिता-लोब्झांग, झुरांग-निस्सू, मेमेले…अशा जिवंत माणसांचा, अवलोकितेश्वर-तारादेवी या देवांचा आणि लिंग केसरसारख्या आख्यायिकांचाही! या प्रवाहात मी पाहिलेलं, न पाहिलेलं, माझ्या डोक्यातलं, मनातलं..असं सगळंच वाहत वाहत आलं. थोडक्यात काय तर, या लेखकदेवानी एक गोष्टच विणून टाकली वाचकदेवासाठी… अस्तित्वातल्या आणि नास्तित्वातल्या घटनांची… झुरांगलिंग !


300.00 Add to cart

शिन्झेन किस

हे जपानमधील सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि सायन्स फिक्शन लिहिणारे लेखक. होशी मुख्यतः प्रसिद्ध होते त्यांच्या 'लघु-लघु' विज्ञानकथांसाठी. कमी लांबीच्या या कथा विशेष गाजल्या. त्यांच्या कथांची पुस्तकं इंग्रजीत अनुवादित झालेली असून ती लोकप्रिय ठरली. त्यांना महत्त्वाचे पुरस्कार व मानसन्मानही मिळाले आहेत.

अनुवाद :
निसीम बेडेकर जन्म : १ ९ ७७ . दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून १ ९९ ७ मध्ये जपानी भाषेत बी.ए. पदवी संपादन . जपान सरकारच्या शिष्यवृत्तीवर टोकियोतील सुप्रसिद्ध वासेदा विद्यापीठात ( १ ९९ ७ - ९ ८ ) एक वर्षाचा जपानी भाषेचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण . जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून २००० मध्ये एम.ए. पूर्ण . जपान सरकारच्या शिष्यवृत्तीवर २००२-०४ ही दोन वर्ष टोकियो परकीय भाषा विद्यापीठात जपानी भाषेचे अध्ययन व संशोधन २००५-२००९पर्यंत विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जपानी भाषेचं अध्ययन आणि सॉफ्टवेअर कंपनीत पेटंटचं भाषांतर . २०० ९पासून हैद्राबाद येथील इंग्रजी आणि विदेशी भाषा विद्यापीठात जपानी भाषेचं अध्यापन . ' बोक्कोचान आणि इतर जपानी कथा ' , ' राशोमान आणि इतर जपानी कथा ' हे अनुवादित कथासंग्रह आणि ' कल्चर शॉक जपान ' हे जपानी संस्कृतीची ओळख करून देणारं पुस्तक प्रकाशित . ' महाराष्ट्र टाइम्स ' व ' लोकसत्ता ' या वृत्तपत्रांमधून लेख आणि ' केल्याने भाषांतर ' व अन्य मासिकांमधून जपानी कथांचे मराठी अनुवाद प्रकाशित .

शववाहिकेतून गायब झालेलं प्रेत,
स्मृतिभ्रंश करून टाकणारे अज्ञात ग्रहावरचे हल्लेखोर, पूर्णपणे रिकामी असलेली डिलक्स तिजोरी, मुलांना शिस्त लावणारे रागीट काका…
…जपानचे सुप्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आणि लघुकथांचे दैवत अशी ख्याती असलेले शिन्इची होशी यांच्या अलौकिक लेखणीतून साकारलेल्या अशा या २१ अद्भूतरम्य कथा !
अफलातून कथानक आणि धक्कादायक शेवटामुळे वाचकांना थक्क करणाऱ्या या कथा गंभीर विषयही अगदी सहजपणे वाचकांसमोर सादर करतात.
जपानी भाषेवर प्रभुत्व असलेले निसीम बेडेकर यांनी होशी यांच्या निवडक कथांचा थेट जपानी भाषेवरून मराठीत केलेला रसाळ अनुवाद…
`शिन्झेन किस’


195.00 Add to cart

Angthi-1820 cover
आवर्जून वाचावे असे…

‘अंगठी १८२०’ या कादंबरिकेतील निवडक भाग

अझमतने रियाला घातलेल्या त्या एंगेजमेंट रिंगमध्ये टॅफिएट या नावाने ओळखला जाणारा महागडा हिरा होता. दुर्मीळ निळसर, गुलाबी झाक असलेला हिरा…

निवडक भाग वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *