‘अन्नपूर्णा’ हे मंगला बर्वे यांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक जरी असलं तरी त्यांच्यातली ‘पूर्ण अन्नपूर्णा’ उलगडली गेली, ती रोहन प्रकाशनात... १९८३ मध्ये रोहन प्रकाशनाने त्यांचं ‘फ्रिज-ओव्हन-मिक्सर : त्रिविध पाककृती’ हे पहिलं पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यानंतर मंगला बर्वे यांनी २० पुस्तकं ‘रोहन’साठी लिहिली आणि ती वाचकप्रिय ठरली.
जितके सणांचे, व्रतांचे वैविध्य, तितकेच उपवासाच्या पदार्थांचेही… फराळाचे पदार्थ, बेगमीचे पदार्थ, अल्पोपहार, गोड पदार्थ, भात-भाज्या-आमटी यांचे प्रकार, पोळ्या, पराठे… जोडीला नेम-नियम पाळून करता येण्यासारखी लोणची, चटण्या, कोशिंबिरी… एक ना दोन अशा जवळजवळ १७५ पाककृतींचा या पुस्तकात समावेश आहे.
सोबतच या फराळात वापरले जाणारे विविध जिन्नस, म्हणजे साबुदाणा, शेंगदाणे, वरईचे तांदूळ, राजगिरा आदींचीही वैशिष्टय, गुणधर्म, उपयुक्तता याबद्दलही माहिती करून दिली आहे. तसेच नेम-नियम, सण, व्रत-वैकल्य आदींच्याही इत्थंभूत माहितीचा या पुस्तकात अंतर्भाव आहे.