विवाहसोहळा व रुखवताचे पदार्थ
₹75.00
मंगला बर्वे
विवाह-समारंभ हा आपल्या घरातील अतिशय आनंदाचा समारंभ. तो जबाबदारीने व यथासांग पार पडावा, त्यात कुठेही गडबड, गोंधळ होऊ नये अशी सर्वांची इच्छा असते. हल्लीच्या कुटुंबात घरात अनुभवी वडीलमंडळी असतात असे नाही. त्यामुळे कुठली कामे व ती कशी करावी ह्याचा प्रश्न अनेकांपुढे पडतो. ह्या सर्व अडचणी लक्षात घेऊन ह्या पुस्तकाची मांडणी केली आहे.
लग्न ठरवताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष पुरवावे, घरगुती पत्रे कशी लिहावी, साखरपुडा कसा साजरा करावा, साखरपुडयाला काय मेनू ठरवावा, लग्नपत्रिकेतील मजकूर कसा असावा ह्याविषयी खूप माहिती ह्या पुस्तकात दिली आहे.
विवाहविधीसाठी कोणत्या वस्तू व किती प्रमाणात लागतील त्याची सविस्तर माहिती दिली आहे. त्याखेरीज मंगलाष्टके, उखाणे, मुलीचे मनोगत व रुखवताचे नानाविध प्रकार दिले आहेत. लग्नाच्या वेळी मुलीसाठी काय तयारी करावी तेही सांगितले आहे.
Reviews
There are no reviews yet.