इति आदि

दैनंदिन चीजवस्तूंचा उगमापासून आजपर्यंतचा कुतूहलजनक प्रवास


अरुण टिकेकर


‘‘वाचक या पुस्तकात गुंततो याला काही कारणं आहेत. एकतर टिकेकरांची रसाळ, गोमटी भाषा. त्यांच्या लेखनाला जुन्या पिढीने कमावलेलं सौष्ठव आहे. इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो,’ असा या लेखनाचा बाज आहे. त्यामुळे वाक्यागणिक नवनवी माहिती आपल्याला कळत जाते आणि आपण या सुग्रास माहितीचा आस्वाद घेऊ लागतो.

दुसरी गोष्ट म्हणजे, टिकेकरांचं वाचन बहुविद्याशाखीय असल्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला समृद्ध करत जातं. इतिहास, भूगोल, साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र अशा कितीतरी अभ्यासशाखांतील संबद्ध माहिती ते आपल्याला उलगडून देतात. त्याशिवाय वैद्यक, उद्योग-व्यापार, आहारशास्त्र वगैरेंमधील आवश्यक संदर्भही पुरवतात….

या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्न आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात….”



500.00 Add to cart

डाएट डॉक्टर

तुमच्या प्रकृतीनुसार वजन कमी करण्यासाठी परिपूर्ण डाएट प्लॅन देणारा


ईशी खोसला
अनुवाद : डॉ.अरुण मांडे


फक्त फलाहार करणे , फक्त पालेभाजी – भाकरीच खाणे , फक्त एक वेळेसच जेवणे … वजन कमी करण्याचे असे चित्र – विचित्र व अशास्त्रीय उपाय करून तुम्ही कंटाळला आहात का ? तर मग सोप्या , संयमित आणि शास्त्रीयदृष्ट्या योग्य अशा पद्धतीने वजन कमी करण्यासाठी तयार व्हा ! या पुस्तकाच्या लेखिका ईशी खोसला या दिल्लीस्थित विख्यात आहारतज्ज्ञ आहेत . पुस्तकात त्या ‘ ओव्हरवेट’च्या समस्येकडे वळण्याआधी भारतीयांची देहयष्टी , त्यांचा नित्य आहार आणि त्यांचं वजन वाढण्यामागची कारणं अशा मूलभूत घटकांची चर्चा करतात . त्यामुळे वजनासंदर्भातल्या संकल्पनांचं पूर्णपणे निराकरण होतं . या पुस्तकाची वैशिष्ट्य म्हणजे * भारतीयांच्या ठेवणीमुळे वजन कमी करण्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्याप्रमाणे मार्गदर्शन * प्रत्येकाच्या वजनानुसार कोणते अन्नघटक घ्यावेत याचं काटेकोर मार्गदर्शन * नाष्टा , दुपारचं जेवण , मधल्या वेळेचं खाणं आणि रात्रीचं जेवण कसं व काय घ्यावं याचं मार्गदर्शन * सहज – सोप्या व टेस्टी पाककृतींचा समावेश तुमच्या प्रकृतीनुसार वजन कमी करण्यासाठी शास्त्रसिद्ध उपाय सांगणारा असा हा खात्रीशीर ‘ डाएट डॉक्टर ‘ … !


35.00 Read more

आहाराविषयी सारे काही

आपल्या आरोग्यानुसार आपल्या आहाराची काळजी घेणारे पुस्तक


वसुमती धुरू


आहारतज्ज्ञांनी किंवा डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्याची आपली कितीही इच्छा असली, तरी पोषणमूल्यांचे क्लिष्ट ‘गणित’ सोडवून एखादा पदार्थ करताना कॅलरीज, कोलेस्टेरॉल, प्रथिनं आदींचं संतुलन साधणं कठीण जातं. त्यात त्या पदार्थाची चव किंवा वैशिष्टय राखण्याची कसरत करणं म्हणजे महाकठीणच काम!
हे लक्षात घेऊनच ज्येष्ठ आहारतज्ज्ञ वसुमती धुरू यांनी या पुस्तकात पाककला व आहारशास्त्र यांचा सुयोग्य मेळ साधला आहे. सर्व प्रकारच्या विविध पाककृती पध्दतशीरपणे देऊन त्या खाली त्या पदार्थाच्या प्रत्येक वाटपातून प्रत्येकाला किती प्रमाणात प्रथिनं, खनिजं, जीवनसत्त्वं, तंतू, कॅलरीज इ. पोषणमूल्यं लाभतील याचा ‘रेडीमेड’ तक्ताच दिला आहे. तसेच हा पदार्थ कोणत्या आजारासाठी वा व्याधीसाठी पथ्यकारक ठरेल वा कुपथ्यकारक ठरेल, कुणी तो आवर्जून खावा, कुणी तो कमी प्रमाणात खावा, कुणी तो वर्ज्य करावा याचीही माहिती तिथल्यातिथेच दिली आहे. या पुस्तकाची हीच वैशिष्टये आहेत, म्हणूनच हे पुस्तक इतर पाककृती व आहारशास्त्रावरील पुस्तकांपेक्षा संपूर्णपणे आगळंवेगळं ठरावं.
थोडक्यात, गृहिणींना पाककलेसोबतच आहारशास्त्रावरही सहजपणे पकड घेण्यास समर्थ करणारं व भान देणारं पुस्तक आहाराविषयी सारे काही…



225.00 Add to cart

आनंदी शरीर आनंदी मन

बदलत्या जीवनशैलीला अनुसरून शरीराच्या व मनाच्या स्वास्थ्यासाठी


डॉ. लिली जोशी


सध्या बदलाची गती इतकी अफाट झाली आहे की आपली जीवनशैली केवळ बदलूनच गेली नाही, तर पार विस्कळित झाली आहे. या बदलांनी शरीर-मनावर आपली हुकूमत गाजवायला सुरुवात केली आहे. अनेकविध विचार आणि ताणतणाव आपल्यात ठाण मांडून बसत आहेत. हे टाळून आनंदी आणि समृध्द जीवन जगायचं, तर वेगळी जागरुकता आणि चार युक्तीच्या गोष्टी गाठीला हव्यात. शरीराला ‘आनंदी’ ठेवण्यासाठी मन आनंदी हवं आणि मन आनंदी असण्यासाठी शरीर ‘आनंदी’ हवं. मात्र हे कसं साध्य करायचं? त्यासाठीच आहार-विहारापासून कामजीवनापर्यंत आणि मधुमेहापासून पाठदुखीपर्यंत आरोग्याच्या अनेकविध बदलांविषयी संवाद साधणारं आपल्याच शरीर-मनाची नव्याने ओळख करून देणारं पुस्तक…. ‘आनंदी शरीर, आनंदी मन!’



300.00 Add to cart

आहार-गाथा

आहार व आरोग्य विचार 


डॉ. कमला सोहोनी


डॉ. कमला सोहोनी या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अभ्यासक व शास्त्रज्ञ आहेत. अन्य अनेक विषयांबरोबरच त्यांनी आहार या विषयावरही शास्त्रशुध्द, प्रयोगनिष्ठ संशोधन केले आहे.
आपले हे ज्ञान इंग्रजीतील निबंधातून, शोधपत्रिकांतून बंदिस्त राहू नये, ते सर्वसामान्य लोकांच्या उपयोगास यावे असे कमलाताईंच्या मनात आले आणि त्यांनी मराठी नियतकालिकांतून लेख लिहिण्यास सुरुवात केली. हे सर्व लेख, त्यांनी स्वत: केलेल्या आहार-प्रयोगांवर आधारित आहेत. वेगळया शब्दात सांगायचे म्हटले तर आपले स्वयंपाकघर हीच आपली ‘र-रस’ प्रयोगशाळा मानणार्‍या कमलाबाईंचे हे सगळे लेखन ‘आधी केलं, मग सांगितलं’ या स्वरूपाचं आहे. आपला आहार हा केवळ आपल्या शरीरप्रकृतीशीच संबंधित नसतो, तर तो आपल्या एकूण जीवनाशी, आपल्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत असतो; त्यामुळेच प्रत्येकाने स्वत:च्या गरजेपुरती का होईना आपल्या आहाराची नीट माहिती करून घेणे आवश्यक ठरते. या पुस्तकातून अशी माहिती सोप्या, साध्या शब्दात, सहजशैलीत दिली आहे. मुख्य म्हणजे शास्त्रीय लेखात दिलेल्या माहितीचा पाठपुरावा करणार्‍या काही पाककृतीही त्यांनी या पुस्तकात सुचविल्या आहेत. म्हणूनच हे पुस्तक वाचून सामान्य माणूस निश्चितच तृप्त होईल.


Information about healthy food


 

 

150.00 Add to cart

आहाराद्वारे उपचार (सर्वसामान्य आजारांवर)


हरी कृष्ण बाखरू
अनुवाद : डॉ. अरुण मांडे


आपल्या रोजच्या आहारातील किंवा अन्य अन्नपदार्थांत अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात. त्यांच्यातील सुप्त गुणांमध्ये अनेक आजार किंवा जुनी दुखणी दूर करण्याची क्षमता असते. अशाच उपचारपध्दतींचं शास्त्रीय अभ्यासावर आधारित मार्गदर्शन हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकाद्वारे केलं आहे.


275.00 Add to cart

गरोदरपणात कोणते पदार्थ टाळावेत?

जी. पद्मा विजय
अनुवाद : डॉ. अरुण मांडे 


लग्नानंतर कोणत्याही विवाहित स्त्रीला ‘विशेष बातमी’ समजल्यानंतर घरातल्या मोठ्यांकडून तिच्यावर सूचनांचा आणि सल्ल्यांचा भडिमार होतो. पिढ्यानपिढ्या आणि परंपरेनुसार कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत याची साधारण कल्पना आपल्याला असते. परंतु आजच्या बदललेल्या जीवनशैलीत अनेकविध पाश्चिमात्य पदार्थ व बाहेर बनणारे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात आपण सर्रास खातो. या बऱ्याचशा पदार्थांमध्ये काही अपायकारक जिवाणू व रसायनं असतात जे गर्भाच्या वाढीला अडथळा निर्माण करू शकतात.
या पुस्तकात टाळावेत असे काही शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची माहिती दिली आहे. हे पदार्थ का खाऊ नयेत, त्यामागील शास्त्रीय कारणं कोणती व खाल्ल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे देखील सांगितलं आहे. त्यामुळे गरोदर स्त्रीला आपला आहार ठरवताना योग्य ती सावधता बाळगता येईल.
प्रत्येक गरोदर स्त्रीचं स्वप्न असतं, सुदृढ व लोभस बाळाचं! हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयोगी ठरेल.


75.00 Add to cart

गर्भवती व बाळंतिणींसाठी पोषक पाककृती


जी. पद्मा विजय
अनुवाद : डॉ. अरुण मांडे


गरोदरपणात आणि बाळंतपणात आईच्या व बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आहारामध्ये पौष्टिक अन्नघटक योग्य प्रमाणात असणं आवश्यक असतं. अकाली प्रसूती किंवा प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे समतोल व सकस आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हाच विचार घेऊन डॉ. पद्मा विजय यांनी गर्भवती व बाळंतिणींसाठी सहजसोप्या पध्दतीने करता येतील व सर्व आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण असतील अशा विविध पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत.
या पाककृतींबरोबर सर्व पोषक घटकांचं महत्त्व काय व रोजच्या आहारत ते किती प्रमाणात असावेत याचंही उत्कृष्ट मार्गदर्शन लेखिकेने केलं आहे.

प्रमुख वैशिष्ट्यं :

* पाककृती बनवण्यासाठी लागणारा पूर्वतयारीचा व कृतीचा वेळ
* पाककृती सोबत दिलेला पोषण मूल्यांचा तक्ता
* अचूक कृती व प्रत्येक साहित्याचं प्रमाण
* प्रत्येक पाककृतीमध्ये असणारे सर्व पोषक घटक वेगळ्या चौकटीत
* पाककृतींबद्दल उपयुक्त टीप्स
* बाळंतिणींसाठी दुग्धवर्धक पाककृतींचा स्वतंत्र विभाग


200.00 Add to cart

गुणकारी आहार

उत्तम आरोग्याचा नैसर्गिक मार्ग


हरी कृष्ण बाखरू
अनुवाद : डॉ. अरुण मांडे


फळे, भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, सुकामेवा व इतर अन्नपदार्थात अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात. परंतु एखाद्या जादूसारखे परिणाम करणारे त्यातील जे सुप्त गुण ते आपल्याला कुठे माहीत असतात? सुप्रसिध्द निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. हरी कृष्ण बाखरू यांनी सखोल अभ्यास करून ही माहिती तपशीलवार व सामान्यजनांना सहज उपयोगी पडेल अशा पध्दतीने या पुस्तकात दिली आहे. प्रत्येक अन्नपदार्थाची सर्वसाधारण शास्त्रीय माहिती, त्यातील अन्नमूल्ये, त्याचे औषधी गुणधर्म आणि मुख्यत: हे अन्नपदार्थ कोणकोणत्या आजारावर उपयुक्त आहेत व त्यासाठी त्यांचा वापर कसा करावा; या सर्वांबाबतची परिपूर्ण माहिती या पुस्तकात आहे. उत्तम आरोग्यासाठीच्या या नैसर्गिक मार्गाची काही उदाहरणे पहा –
संधिवातावर : केळे, काकडी, लसूण, टोमॅटो, उडीद
दम्यावर : बेलफळ, अंजीर, द्राक्ष, आवळा, संत्र, दुधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा, लसूण, आले, पुदिना, नारळ, करडईच्या बिया, मध
मधुमेहावर : पपनस, आवळा, जांभूळ, आंब्याची पाने, कार्ले, मेथी, लेट्यूस, सोयाबीन, टॉमेटो, हरभरे, भुईमूग
पित्तावर : पपनस, बटाटे, भात, खोबरे, मध, ऊस
उच्च रक्तदाबावर : भात, लसूण, लिंबू, सफरचंद
लठ्ठपणावर : लिंबू, कोबी, टोमॅटो, भुईमूग


225.00 Add to cart

छोटे प्रभावी आरोग्य सल्ले


सोनिया कक्कर
अनुवाद :डॉ. अरुण मांडे


सुदृढ आरोग्य म्हणजे तंदुरुस्त शरीर व त्याला मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याची असलेली जोड. म्हणजेच जर शरीर तंदुरुस्त असेल आणि तुमचं मन-चित्त प्रसन्न असेल तरच तुम्ही आनंददायी जीवन जगू शकता. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे? डॉ. सोनिया कक्कर या पुस्तकाद्वारे अगदी सहज सोप्या भाषेत व थोडक्यात ‘आरोग्यदायी जीवनशैली’चे विविध कानमंत्र देतात. जड वैद्यकीय भाषेत नसलेले छोटे परंतु अत्यंत प्रभावी असे हे कानमंत्र आहेत.
रोजच्या आयुष्यात डोकावणार्‍या साध्या-सुध्या प्रश्नांची तसेच गंभीर प्रश्नांचीही चर्चा त्यांनी यात केली आहे. उदाहरणार्थ मधुमेहाची लक्षणं कशी ओळखावीत, तणावमुक्त कसं राहावं, औषधाचा बॉक्स अद्ययावत् का ठेवावा इथपासून ते डुलकी घ्यावी की नाही आणि योग्य ब्रश कसा निवडावा इथपर्यंत विविध समस्यांचा ऊहापोह त्यांनी केला आहे.
आरोग्याशी निगडित विविध समस्यांची सोपी उत्तरं देणारं आणि जीवनाकडे बघण्याची एक नवीन व निकोप दृष्टी देणारं पुस्तक…छोटे प्रभावी आरोग्य सल्ले!


125.00 Read more

फिटनेस मंत्र टीनएजर्ससाठी


नमिता जैन
अनुवाद : डॉ. अरुण मांडे


फिट रहायला आणि आकर्षक दिसायला कुणाला आवडत नाही? कॉलेजमध्ये मित्र-मैत्रीणींसोबत लेटेस्ट फॅशनचे कपडे घालायला तर तुम्हाला विशेष आवडत असेल. पण जर शरीराने तुम्ही फिट नसाल तर…?
निराश होऊ नका! नमिता जैन या विख्यात फिटनेस गुरू खास तुम्हा तरुणांसाठी या पुस्तकाद्वारे एक अनोखा ‘फिटनेस मंत्र’ देत आहेत. या मंत्रामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होईल, तुम्हाला चांगल्या आहाराची सवय लागेल, व्यायामाची गोडी लागेल व मानसिक संतुलनही लाभेल. लठ्ठपणाशी फाईट कशी द्यावी? स्टॅमिना कसा वाढवावा? टीनएज समस्यांना तोंड कसं द्यावं? अशा समस्यांचं उत्कृष्ट मार्गदर्शनही त्यांनी या पुस्तकात केलं आहे.
उत्तम आरोग्य, नितळ त्वचा आणि आकर्षक फिगरसाठी प्रभावी ‘फिटनेस मंत्र’ टीनएजर्ससाठी!

‘हे पुस्तक म्हणजे तरुणांसाठी एक खजिनाच आहे. जितकं तुम्ही वाचाल, तितकी त्याची उपयुक्तता तुम्हाला पटेल. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती याचा प्रत्यय देणारं पुस्तक…’
-सायना नेहवाल

‘या पुस्तकातला फिटनेस मंत्र अमलात आणा, त्यामुळे तुम्हाला हवा तसा मस्त आकार शरीराला देता येईल. माझ्यावर विश्वास ठेवा हा मंत्र खरोखरच जादुई आहे.’
-दीपिका पदुकोण


150.00 Add to cart

साठीनंतरचा आहार व आरोग्य

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेलं मार्गदर्शन


डॉ. वर्षा जोशी


वैद्यकशास्त्रातील नवनवीन संशोधनांमुळे माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे. आज वृद्धत्वाची व्याख्या नव्याने करण्याची वेळ आली आहे. साठीनंतर आयुष्यातली प्रमुख कर्तव्यं बहुतांशपणे पार पडलेली असतात, थोडा निवांतपणाही लाभला असतो. पण त्याचबरोबर आयुष्यातल्या या टप्प्यावर आरोग्याच्या थोड्या कुरबुरीही सुरू होत असतात.

या पार्श्वभूमीवर साठीनंतरही सर्वांना चांगलं आयुष्य जगता यावं हा विचार मनात ठेऊन डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकाची रचना केली आहे. साठीनंतरच्या व्यक्तींनी कोणता आहार घ्यावा, तो किती व कोणत्या वेळी घ्यावा, कोणते व्यायाम करावेत, यासाठी त्या या पुस्तकात मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे साठीनंतर उदभवू शकणारे ज्ञानेंद्रियांचे आजार कोणते, विस्मरणावर मात करण्यासाठीचे उपाय कोणते, एकटेपणा, नैराश्य व दैनंदिन जीवनातील ताण यावर मात कशी करावी यासाठीही डॉ. वर्षा जोशी मार्गदर्शन करतात. मुख्य म्हणजे हे सर्व त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून व सोप्या पध्दतीने सांगितलं आहे.

विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून साठीनंतरचं जीवन व्याधीमुक्त व आनंददायी कसं करता येईल यासाठी या पुस्तकातून निश्चितच नवा मूलमंत्र मिळेल.


175.00 Add to cart