378-13-42521-52-4 | Diet Doctor | डाएट डॉक्टर | तुमच्या प्रकृतीनुसार वजन कमी करण्यासाठी परिपूर्ण डाएट प्लॅन देणारा | ईशी खोसला | डॉ.अरुण मांडे | फक्त फलाहार करणे , फक्त पालेभाजी – भाकरीच खाणे , फक्त एक वेळेसच जेवणे … वजन कमी करण्याचे असे चित्र – विचित्र व अशास्त्रीय उपाय करून तुम्ही कंटाळला आहात का ? तर मग सोप्या , संयमित आणि शास्त्रीयदृष्ट्या योग्य अशा पद्धतीने वजन कमी करण्यासाठी तयार व्हा ! या पुस्तकाच्या लेखिका ईशी खोसला या दिल्लीस्थित विख्यात आहारतज्ज्ञ आहेत . पुस्तकात त्या ‘ ओव्हरवेट’च्या समस्येकडे वळण्याआधी भारतीयांची देहयष्टी , त्यांचा नित्य आहार आणि त्यांचं वजन वाढण्यामागची कारणं अशा मूलभूत घटकांची चर्चा करतात . त्यामुळे वजनासंदर्भातल्या संकल्पनांचं पूर्णपणे निराकरण होतं . या पुस्तकाची वैशिष्ट्य म्हणजे * भारतीयांच्या ठेवणीमुळे वजन कमी करण्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्याप्रमाणे मार्गदर्शन * प्रत्येकाच्या वजनानुसार कोणते अन्नघटक घ्यावेत याचं काटेकोर मार्गदर्शन * नाष्टा , दुपारचं जेवण , मधल्या वेळेचं खाणं आणि रात्रीचं जेवण कसं व काय घ्यावं याचं मार्गदर्शन * सहज – सोप्या व टेस्टी पाककृतींचा समावेश तुमच्या प्रकृतीनुसार वजन कमी करण्यासाठी शास्त्रसिद्ध उपाय सांगणारा असा हा खात्रीशीर ‘ डाएट डॉक्टर ‘ … ! | Book | Rohan Prakashan | Marathi | 182 | आरोग्य | 159 |
गुणकारी आहार
उत्तम आरोग्याचा नैसर्गिक मार्ग
हरी कृष्ण बाखरू
अनुवाद : डॉ. अरुण मांडे
फळे, भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, सुकामेवा व इतर अन्नपदार्थात अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात. परंतु एखाद्या जादूसारखे परिणाम करणारे त्यातील जे सुप्त गुण ते आपल्याला कुठे माहीत असतात? सुप्रसिध्द निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. हरी कृष्ण बाखरू यांनी सखोल अभ्यास करून ही माहिती तपशीलवार व सामान्यजनांना सहज उपयोगी पडेल अशा पध्दतीने या पुस्तकात दिली आहे. प्रत्येक अन्नपदार्थाची सर्वसाधारण शास्त्रीय माहिती, त्यातील अन्नमूल्ये, त्याचे औषधी गुणधर्म आणि मुख्यत: हे अन्नपदार्थ कोणकोणत्या आजारावर उपयुक्त आहेत व त्यासाठी त्यांचा वापर कसा करावा; या सर्वांबाबतची परिपूर्ण माहिती या पुस्तकात आहे. उत्तम आरोग्यासाठीच्या या नैसर्गिक मार्गाची काही उदाहरणे पहा –
संधिवातावर : केळे, काकडी, लसूण, टोमॅटो, उडीद
दम्यावर : बेलफळ, अंजीर, द्राक्ष, आवळा, संत्र, दुधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा, लसूण, आले, पुदिना, नारळ, करडईच्या बिया, मध
मधुमेहावर : पपनस, आवळा, जांभूळ, आंब्याची पाने, कार्ले, मेथी, लेट्यूस, सोयाबीन, टॉमेटो, हरभरे, भुईमूग
पित्तावर : पपनस, बटाटे, भात, खोबरे, मध, ऊस
उच्च रक्तदाबावर : भात, लसूण, लिंबू, सफरचंद
लठ्ठपणावर : लिंबू, कोबी, टोमॅटो, भुईमूग
Reviews
There are no reviews yet.