मैफल संवाद : जागते राहो! – रोहन चंपानेरकर

"Technology Increases Exponentially"तंत्रज्ञान झपाट्याने वाढतं.- माहिती तंत्रज्ञानात असं कायमच म्हटलं जातं नवं शतक सुरू होण्याच्या दरम्यान आपण नवीन युगात म्हणजेच प्रगत इंटरनेट युगात प्रवेश केला आणि त्यावरील नवीन घडामोडी, नव्या बदलांचा अनुभव घेऊ लागलो. YouTube वर आपण व्हिडिओज बघू लागलो तर गुगलवर आपण प्रचंड प्रमाणात माहिती मिळवू लागलो. त्याचबरोबर पुढे फेसबुक, इन्स्टाग्राम अशा समाजमाध्यमांचा वापर करून व्यक्त [...]

आयुष्य संपन्न करणारे तीन ‘बाबू मोशाय’

‘साहित्य क्षेत्र’ हे सर्जनशील जनांचं, मनांचं क्षेत्र. तेव्हा, या क्षेत्रातील संबंधितांच्या कल्पनाविलासाला खाद्य पुरवणं हे प्रत्येक साहित्यसंमेलनाचं जणू आद्य कर्तव्य होय. या खेपेस वादाचं कोणतं निमित्त घडेल, याविषयीचे अंदाज बांधण्यात सर्जनशील मनं कामाला लागली होती. पण एकतर ‘संमेलनाचे अध्यक्ष’ विनानिवडणूक, एकमताने ठरले आणि इतरही सर्व सुरळीतपणे चालू होतं. तेव्हा या खेपेस ‘विकेट’ मिळणं कठीण दिसतंय, [...]

विचार ‘प्रतिमा-बदल’ व ‘अवकाश-विस्तारा’चा…

फॉन्ट साइज वाढवा ‘रोहन प्रकाशन’चा बदलयुक्त प्रवास : ४ बदल घडत राहणं किंवा अगदी जाणीवपूर्वक घडवत राहणं ही एक स्वाभाविक क्रिया असते. त्याचप्रमाणे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अपरिहार्य ठरलेल्या बदलांचीही एक वेगळी जातकुळी असते. कोणत्याही कारणाने का असेना; वैयक्तिक आयुष्यात असोत वा व्यावसायिक आघाडीवर असोत, बदल घडतात आणि एका प्रक्रियेअंतर्गत ते घडत असतात. अस्तित्वाच्या लढाईसाठी अनेक [...]

वेगळ्या ‘लीग’वर नेऊन ठेवणारी पुस्तकं…

‘रोहन प्रकाशन’चा बदलयुक्त प्रवास : ३ नोव्हेंबर २२, १९९२ रोजी माधव गडकरी लिखित आमची दोन पुस्तकं समारंभपूर्वक प्रसिद्ध झाली. त्यानंतर दोनच दिवसांनी ‘रोहन प्रकाशन’चे अध्वर्यू व एक संस्थापक आणि माझे वडील मनोहर चंपानेरकर यांचं देहावसान झालं. वास्तविक तत्पूर्वी वर्षभर; ते गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यामुळेच त्यांचं निधन होणं ही एक दुर्दैवी बाब असली, तरी धक्कादायक [...]

बालवाङ्मयाच्या नाना कळा…

‘काय तो जमाना होता…’ ‘आमच्या वेळी असं नव्हतं हं…’ वगैरे वगैरे म्हणत आजच्या काळाला दुगाण्या देण्याची एक सर्वमान्य पद्धत आहे. पण खरं सांगायचं तर, त्या-त्या काळातलं एक प्रकारचं जगणं असतं. त्या जगण्यात काही अधिक, तर काही उणे असतंच. आता मुलांना पडलेल्या सुट्टीचाच विषय घ्या…. वार्षिक परीक्षेतून मुलं मोकळी झाली की, पूर्वी बैठे खेळ, मैदानी खेळ, [...]

हातात हात घालून फिरणारे सोबती…प्रवास व वाचन

एप्रिल-मे महिने हे पर्यटनाचे आणि पर्यटन म्हटलं की, प्रवास आला. माझ्या मते, प्रवास आणि वाचन यांचं एकमेकांना पुरक असं नातं असतं. परंतु, पर्यटनासाठी होणाऱ्या प्रवासात वाचन होणं कठीण असतं. कारण बहुतेक वेळा तुमच्यासोबत कुटुंब असतं, मित्रपरिवार असतो. अशा वेळी एकलकोंड्यासारखं वाचन करत बसायचं हे ‘स्पॉइल स्पोर्ट’ असण्याचं लक्षण; आणि मुख्य म्हणजे पर्यटनाचा उद्देशच वेगळा असतो, [...]

मैत्रिणी म्हणाव्यात अशा लेखिका…

अनेक वेळा आपण पाहतो की, एखादं पद भूषवण्यासाठी महिलेचीच निवड करण्यात येते किंवा एखाद्या कार्यक्रमाचं उद्घाटन महिलेच्या हस्ते करण्यात येतं. समाजातलं महिलांचं स्थान अधोरेखित करण्यासाठी ती एक प्रतीकात्मक कृती असते. मात्र, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे… भारतात ५२ वर्षांपूर्वी इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, याला त्यांचं महिला असणं कारणीभूत नव्हतं. आणि पुढे स्वबळावर त्यांनी ते पद [...]

उद्देश… यशमापनातील एक प्रमुख घटक

फॉन्ट साइज वाढवा ‘रोहन प्रकाशन’चा बदलयुक्त प्रवास : ५ ‘Nothing succeeds like success…’ असं म्हटलं जातं. मराठीत सांगायचं तर, ‘यशस्विता हीच यशाची जननी’ असं म्हणता येईल. पण असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा यशाची व्याख्या नेमकी कोणती, याची आपल्याकडे स्पष्टता हवी. मी पुस्तक प्रकाशन व्यवसायासंबंधी विचार करतो, तेव्हा यशाची व्याख्या ‘विक्री आणि नफा’ इतपत ती मर्यादित [...]

‘रोहन-मोहर’ बहरतंय…

वर्ष २०१८ सरलं आणि आता नववर्ष २०१९ उजाडलं आहे. अंगवळणी पडलेलं ‘२०१८’ सुरुवातीचे काही आठवडे आपली पाठ सोडणार नाही. याचं साधं-सोपं उदाहरण म्हणजे कुठेही तारीख लिहिताना नकळतपणे ‘२०१८’ असंच काही वेळा लिहिलं जाणार. मग आली खाडाखोड किंवा चूक तशीच राहून जाण्याची शक्यता. पडलेल्या सवयींचं, त्यांच्या उपद्रवमूल्यांचं हे झालं अगदी अनुल्लेखनीय उदाहरण. पण उलटलेलं वर्ष आपली [...]

आत्मविश्वास प्रदान करणारी दशकपूर्ती

‘रोहन प्रकाशन’चा बदलयुक्त प्रवास : २ लहानपणीचा किंवा तरुणपणीचा जरा अलीकडचा काळ हा अनेक गोष्टींचं अप्रूप वाटण्याचा किंवा क्वचित प्रसंगी अवाक होण्याचा काळ. आणि ऐवढं निश्चित की, आयुष्यातला तो एक चांगला काळ असतो. अनेक गोष्टी ग्रहण करून घेण्याचा तो काळ… नंतर जरा चार बुकं शिकल्यावर, पाच-पंचवीस अनुभव पाठीशी बांधल्यावर आणि त्या बळावर स्वत:चं व्यक्तिमत्त्व प्राप्त [...]
1 2 3