नामवंतांचे विनोद
विविध क्षेत्रांतील पु.ल.देशपांडे, नाना पाटेकर, अशोक सराफ, अमोल पालेकर, सुधीर तळवलकर अशा नामवंतांनी सांगितलेले किंवा ते आपल्या कार्यात व्यस्त असताना घडलेले उत्स्फूर्त असे अनेक दुर्मिळ विनोद आनंद घोरपडे यांनी या पुस्तकात टिपले आहेत. हे किस्से आपल्याला आनंद तर देतीलच; पण आपल्या अनौपचारिक बैठकीतही रंगत आणतील.
प्रतिभावंतांचे विनोदी किस्से (पॉकेट)
सर्वच दृष्टीने धकाधकी, दगदग असलेल्या आजच्या जीवनात एखादा विनोद चांगलीच करमणूक करून जातो तसेच काल्पनिक विनोद तात्पुरता आनंद निश्चितच देऊन जातात, परंतु आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, पु.ल. देशपांडे, ना.सी. फडके, मामा वरेरकर, ग.दि. माडगूळकर, चि.वि. जोशी, पंडित नेहरू, रवींद्रनाथ टागोर, मार्क ट्वेन, बर्नाड शॉ, चर्चिल, क्रुश्चेव अशा महान प्रतिभावंतांनी प्रत्यक्ष लिखाणातून, भाषणातून, संभाषणातून, वादविवादातून निर्माण केलेले उत्स्फूर्त, समयसूचक, हजरजबाबी व मार्मिक असे हे विनोद करमणूक तर करतीलच, परंतु उच्च कोटीच्या आनंदाची प्रचिती देतील.
मुलांसाठी १११ विनोदी चुटके
आपल्या मित्र-मैत्रिणीत, पिकनिकला, प्रवासात तसेच वाढदिवस, सण-उत्सव या निमित्ताने एकत्र जमल्यावर तुम्ही छान-छान विनोद खास शैलीत सांगितले तर आनंदी वातावरणात हर्षोत्सवाची भर पडेल. म्हणूनच निखळ आनंद देणारे हे खुसखुशीत विनोदी चुटके खास तुमच्यासाठी!
मैफल विनोदी किस्स्यांची
रोजच्या जीवनात वावरताना आपल्याला विविध प्रकारच्या प्रसंगांचा अनुभव येत असतो… कधी कडू तर कधी गोड! त्याचप्रमाणे मजेदार, गमतीदार प्रसंगांचाही अगदी सहजगत्या, नकळत अनुभव येऊन जातो. सामान्यांप्रमाणेच नामवंतांच्या आणि विविध क्षेत्रांत विशेष कामगिरी करणाऱ्यांच्याही आयुष्यात विनोदी प्रसंग उद्भवत असतात.
या पुस्तकाचे संकलक सु. ल. खुटवड यांनी अनेक चरित्र-आत्मचरित्र वाचून त्यांतील अशा विनोदी प्रसंगांची नोंद केली आणि त्यातूनच जमली आहे ही साहित्यिक, शाहीर, नाटककार, चित्रपटकार, कलावंत, राजकारणी, पोलीस खात्यातील अधिकारी, व्यावसायिक अशा सर्वांची मैफल… अर्थात ‘मैफल विनोदी किस्स्यांची!’
यांनी केलं विनोदविश्व समृद्ध
मराठी विनोदी साहित्यावर आस्वादात्मक दृष्टिक्षेप
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चि. वि. जोशी, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, गंगाधर गाडगीळ, दत्तू बांदेकर, मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले या बारा विनोदवीरांची मैफल जमवून विनोदी लेखनाच्या वाचनाचा आस्वाद घेता घेता आपली जाण समृद्ध करणारं व त्यात भर टाकणारं पुस्तक…
विनोदी चुटके
निखळ करमणुकीसाठी निवडक चुटक्यांचं हे पुस्तक तुम्हाला नक्कीच हसायला लावेल. बंडोपंतांपासून बर्नार्ड शॉ ह्यांच्या आयुष्यात घडलेले खुसखुशीत विनोद!
हसरे-किस्से
हास्यझरे
खुमासदार विनोदी किस्स्यांची खास मैफल विनोदी चित्रांसहित! चार पुस्तकांचा खजिना आकर्षक आकारात उपलब्ध केला आहे.
हास्यतारे
खुमासदार विनोदी किस्स्यांची खास मैफल विनोदी चित्रांसहित! चार पुस्तकांचा खजिना आकर्षक आकारात उपलब्ध केला आहे.
हास्य-तुषार
हास्यपाठ
खुमासदार विनोदी किस्स्यांची खास मैफल विनोदी चित्रांसहित! चार पुस्तकांचा खजिना आकर्षक आकारात उपलब्ध केला आहे.
हास्यवारे
खुमासदार विनोदी किस्स्यांची खास मैफल विनोदी चित्रांसहित! चार पुस्तकांचा खजिना आकर्षक आकारात उपलब्ध केला आहे.