युक्रेन युद्धाचा अन्वयार्थ
आशिष काळकर लिखित ‘युक्रेन युद्ध सत्तासंघर्ष की ऊर्जासंघर्ष?’ हे पुस्तक रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असणार्या युद्धाचा बातम्यांपलीकडे मागोवा घेतं. पुस्तकामध्ये यूएसएसआर अर्थात विघटन होण्याच्या आधीचा रशिया, झार राजांच्या काळातील रशियाच्या महत्त्वांकाक्षा यांचा तपशीलवार मागोवा घेण्यात आलेला आहे. आपलं साम्राज्य मोठं करायचं ही साम्राज्यवादी प्रेरणा रशिया घडण्यामागे कशी होती, हे काळकर पहिल्या काही प्रकरणांतून सांगतात. [...]