मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. वेगवेगळ्या बोलीभाषांमधले, वर्गांमधले लेखक वेगवेगळे आशय-विषय घेऊन कथालेखन करत आहेत. परंतु अजूनही मराठी वाचक, आस्वादक नवकथेच्या पुढे पाऊल टाकू शकलेला नाही. म्हणूनच गेल्या वीस वर्षांत लिहिल्या गेलेल्या कथांवर काहीएक चर्चा व्हावी, असा विचार करून आम्ही नीतीन रिंढे, दीपा देशमुख आणि किरण येले या तीन मान्यवर लेखकांना, गेल्या वीस वर्षांतल्या त्यांना आवडलेल्या कथांवर लेख लिहायला सांगितलं. हे लेख एक किंवा मोजक्या काही कथांवर असले, तरी वाचकांना दिशादर्शन व्हावं यासाठी त्यांना आवडलेल्या इतर कथांची यादीदेखील द्यायला सांगितलं. त्यातला लेखक, समीक्षक व विचक्षण वाचक नीतीन रिंढे यांचा लेख…

निवडलेली कथा : छटाकभर रात्र, तुकडा तुकडा चंद्र
(लेखक : जयंत पवार)


कितीही वस्तुनिष्ठ राहण्याचा प्रयत्न केला तरी एखाद्या साहित्यकृतीची सर्वोत्कृष्ट म्हणून निवड करण्याच्या प्रयत्नात व्यक्तिगत आवडीचा काही अंश उतरतोच. जयंत पवार यांची ‘छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र’ ही कथा गेल्या वीस वर्षांतली सर्वोत्कृष्ट कथा वाटते, असं मी म्हटलं तर त्या बाबतीतही हे काही प्रमाणात खरं असेल. पण या निवडीमागे असणारी कारणं केवळ व्यक्तिगत नाहीत. या कथेचा घाट आणि तिच्यातून लेखकाने व्यक्त केलेलं जीवनभान या दोन्ही अंगांनी ही कथा वाचकाला फार समृद्ध करणारा अनुभव देते. मराठी साहित्य, मराठी समाज, कला आणि जीवन यांच्यातलं नातं अशा व्यापक विषयांवर भाष्य करणारी ही कथा मराठीतली श्रेष्ठ कथा आहे, असं माझं मत आहे.
जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या पहिल्या कथासंग्रहातली ही अखेरची कथा आहे. पण या कथेपासून कथाकार म्हणून जयंत पवार यांनी एक नवं, निर्णायक वळण घेतलं आहे. याच वळणाने ‘वरणभात लोन्चा न् कोन नाय कोन्चा’ या त्यांच्या दुसऱ्या कथासंग्रहातल्या कथा अधिक पुढे गेल्या आहेत. तरीही ‘छटाकभर रात्र…’ या कथेला जयंत पवार यांच्या एकूण कथासाहित्यात आणि एकंदर समकालीन मराठी कथासाहित्यात महत्त्वाचं स्थान आहे.
कादंबरीच्या तुलनेत कथेचा अवकाश लहान, मर्यादित असतो. या मर्यादित अवकाशात एखादा कथाकार अनेक आशयसूत्रांची, रचनेच्या, कथनाच्या बहुविध पातळ्यांची अशी काही व्यामिश्र बंदिश रचतो की, वाचकाने थक्क व्हावं. जयंत पवारांची ‘छटाकभर रात्र…’ ही कथा अशा तऱ्हेचा अनुभव देते. या कथेचा आकृतिबंध एका गुन्हेगारकथेचा किंवा रहस्यकथेचा आहे. पण मानवी अस्तित्वाचं आणि दु:खाचं नातं काय असतं या सनातन आधिभौतिक (metaphysical) रहस्याचा मागोवा, हे या कथेचं मुख्य आशयसूत्र आहे. खून, मारामाऱ्या आणि अपघात याही कथेत आहेत. पण त्यासोबत बारमध्ये रात्री उशिरापर्यंत बसून केलेल्या जीवनाविषयीच्या तात्त्विक चर्चा आहेत. मुंबईसारख्या महानगरातलं गुंड-दारुड्यांचं अधोविश्व आणि लेखक-कवींचं जग या दोन जगांचं ‘ब्लेंडिंग’ ‘छटाकभर रात्र…’ या कथेत जयंत पवार यांनी अत्यंत परिणामकारकरीत्या केलं आहे.
रहस्यकथेत अखेरपर्यंत सामान्यत: रहस्य उलगडलेलं असतं; गुन्हेगार कोण याचं उत्तर दिल्याशिवाय रहस्यकथा संपत नाही. ‘छटाकभर रात्र…’ या कथेत मात्र लेखकाने कथेच्या गाभ्याशी असलेला मुख्य प्रश्न अनुत्तरित ठेवलेला आहे. आणि केवळ गाभ्याचा प्रश्न नव्हे, तर रहस्यमय कथानकातले आणि त्याच्याआड दडलेल्या मानवी जीवनाच्या सत्याविषयीचे सगळेच प्रश्न लेखकाने अधांतरी सोडून कथा संपवली आहे. ही अशी ‘विपरीत रहस्यकथा’ आहे.
रहस्यकथेचा असा ‘विपरीत’ आकृतिबंध लेखकाने का योजला असेल? आधुनिक साहित्यात खूपविक्ये (bestsellers), लोकप्रिय साहित्यप्रकार बिनप्रतिष्ठेचे मानले जातात. गंभीर साहित्यप्रकार अभिरुचीच्या शिडीवर वरच्या पायरीवर प्रस्थापित झालेले असतात. अलीकडे उत्तराधुनिकवादी विचाराने जीवनातल्या अनेक श्रेणीव्यवस्थांना सरुंग लावला, त्यात साहित्यप्रकारांची ही श्रेणीव्यवस्थाही कोसळली. लोकप्रिय साहित्याचे आकृतिबंध आणि गंभीर आशय यांचं ‘ब्लेंडिंग’ केलं जाऊ लागलं. जयंत पवार यांनी ‘छटाकभर रात्र…’मध्ये असं ‘ब्लेंडिंग’ केलं आहे, ते केवळ प्रयोग म्हणून नव्हे. गंभीर जीवनाशय मांडताना त्याच्या विपरीत वाटणारा लोकप्रिय कथाप्रकार निवडून त्यांनी सध्याच्या जीवनाविषयी एक महत्त्वाचं भाष्य अतिशय सूचकपणे केलं आहे.
जयंत पवारांनी आकृतिबंध निवडलाय तो रहस्यकथेचा. आता रहस्यकथा या साहित्यप्रकाराची मूल प्रेरणा काय आहे? तर सत्याचा शोध घेणं. प्रत्येक रहस्याच्या मुळाशी एक न उलगडलेलं सत्य असतंच; आणि पुराव्यांचा कसोशीने शोध घेऊन त्यांच्यातील संगती शोधल्यास, अन्वय लावल्यास ते सत्य सापडतं, असा विश्वास रहस्यकथेच्या निर्मितीमागे आहे. रहस्यकथेच्या मूल प्रेरणेचं नातं पुन्हा आधुनिक जीवनदृष्टीशी आहे. विवेकशील, वस्तुनिष्ठ दृष्टीने शोध घेत गेल्यास मानव सृष्टीचं रहस्य भेदून सत्य ज्ञान हस्तगत करू शकतो, असा दुर्दम्य आत्मविश्वास या आधुनिक जीवनदृष्टीत आहे. सगळ्या आधुनिक शास्त्र-विज्ञानांचा उदय याच जीवनदृष्टीतून झाला आहे. तिथे सत्याचा ठामपणा आहे. रहस्यकथेचं थेट नातं या ठामपणाशी आहे.
याच्या उलट जयंत पवार यांच्या कथेचा रहस्यकथालेखक असलेला ‘निवेदक’ जरी सत्याचा पाठपुरावा करत असला, तरी सत्य शोधण्यात त्याला सपशेल अपयश येतं. तो लोकप्रिय रहस्यप्रधान-गुन्हेगारी कथालेखक असला, तरी त्याची ही कथा मात्र रूढ प्रकारची ‘क्राइमस्टोरी’ नसल्यामुळे कुठेही प्रसिद्ध होऊ शकत नाही. त्याआधी हा लेखकच संसर्गजन्य तापाच्या साथीत मरून जातो. कथा गंभीर ‘वळणा’ची नसल्यामुळे तिला प्रतिष्ठित दर्जा मिळणं तर शक्यच नसतं, आणि रहस्याचा भेद करू न शकल्यामुळे (फसलेली गुन्हेगारी कथा झाल्यामुळे) ती रहस्यकथा म्हणूनही उभी राहू शकत नाही; तिला प्रसिद्धीचा प्रकाशही दिसत नाही. अशा प्रकारे जयंत पवारांनी कथेचा बाज हा रहस्यकथेचा स्वीकारला आहे, पण रहस्यकथेचं मूलतत्त्वच मोडीत काढलं आहे. मानवी जीवनातला सत्याचा शोध अखेर संदिग्धतेच्या धुक्यात हरवून जातो, सत्य हे मानवी आकलनापलीकडे राहतं, असं या रहस्यकथेतून सुचवलं आहे. पण जयंत पवार इथेच थांबत नाहीत. रहस्यकथेचा निवेदक किंवा इतर पात्रं सत्यापर्यंत का पोचू शकत नाहीत? हा प्रश्न त्यांनी कथेच्या अखेरच्या भागात उपस्थित केलेला आहे. आणि तिथे आपल्या लक्षात येतं की, लेखकाने लोकप्रिय, खूपविक्या(bestsellers) साहित्यप्रकाराचा आकृतिबंध योजून एकप्रकारे या प्रश्नाचं, समस्येचं निदान करण्याचा प्रयत्न केला आहे. ते निदान काय आहे याचा विचार शेवटी करू. इथे एवढं मात्र नमूद करू की, श्रेष्ठ साहित्यकृतीचा घाटदेखील तिच्या आशयाचा, लेखकाच्या जीवनदृष्टीचा अविभाज्य भाग होऊन अनुभवास येत असतो. हा अनुभव ‘छटाकभर रात्र…’ ही कथा देते.

रहस्यकथेचा असा ‘विपरीत’ आकृतिबंध लेखकाने का योजला असेल? आधुनिक साहित्यात खूपविक्ये (bestsellers), लोकप्रिय साहित्यप्रकार बिनप्रतिष्ठेचे मानले जातात. गंभीर साहित्यप्रकार अभिरुचीच्या शिडीवर वरच्या पायरीवर प्रस्थापित झालेले असतात. अलीकडे उत्तराधुनिकवादी विचाराने जीवनातल्या अनेक श्रेणीव्यवस्थांना सुरुंग लावला, त्यात साहित्यप्रकारांची ही श्रेणीव्यवस्थाही कोसळली. लोकप्रिय साहित्याचे आकृतिबंध आणि गंभीर आशय यांचं ‘ब्लेंडिंग’ केलं जाऊ लागलं. जयंत पवार यांनी ‘छटाकभर रात्र…’मध्ये असं ‘ब्लेंडिंग’ केलं आहे, ते केवळ प्रयोग म्हणून नव्हे


प्रत्यक्ष आयुष्यात सत्य हे संदिग्ध असतं, त्याविषयी नेमकं काही सांगता येत नाही, हा अनुभव अनेकांनी घेतलेला असू शकतो. साहित्यातही हा अनुभव मांडणारी ‘छटाकभर रात्र…’ ही काही एकमेव साहित्यकृती नव्हे. मग या कथेत वेगळं, नवं काय आहे? का ही कथा एक ताजा अनुभव देते? याचं उत्तर आपल्याला, जयंत पवारांच्या या कथेमध्ये परस्परविरुद्ध भासणाऱ्या, पण कथानकात अगदी एकजीव झालेल्या बहुविध संदर्भांमध्ये सापडेल.
बऱ्याच लेखकांना प्रत्यक्षातल्या व्यक्तींवरून पात्रं बेतण्याचा, आणि वाचकाला ती पात्रं कोणत्या व्यक्तीवरून घेतलेली आहेत हे सहज लक्षात यावं असे, दुवे कथानकात सोडण्याचा ‘नाद’ असतो. अशा लेखकांनी रंगवलेली पात्रं बहुतेकदा प्रत्यक्षातल्या व्यक्तींचे ‘कॅरिकेचर्स’ तरी असतात किंवा प्रत्यक्षातील व्यक्तींच्या चरित्रात्मक तपशिलावरच पात्रं हुबेहूब उभारलेली असतात. ‘छटाकभर रात्र…’ या कथेत ‘रहस्यकथाकार’ म्हणून स्वत:ची ओळख करून देणारा निवेदक आणि कवी म्हणून वावरणारी चार पात्रं प्रत्यक्षात होऊन गेलेल्या व्यक्तींवर बेतलेली आहेत. पण कथेतली ही पात्रं ना प्रत्यक्षातल्या व्यक्तींची ‘कॅरिकेचर्स’ आहेत, आणि ना त्यांच्या जीवनातल्या केवळ चरित्रात्मक तपशिलांचा वापर लेखकाने पात्रनिर्मितीसाठी केला आहे. प्रत्यक्षातल्या लेखक-कवींची व्यक्तिमत्त्वं, वैचारिक भूमिका, जीवनदृष्टी यांचं कथेतल्या पात्रांवर कलम करून, त्यांच्या तोंडून, त्यांच्या भिन्न दृष्टिकोनांतून जीवनासंदर्भातल्या मूलभूत प्रश्नांवर विविध कोनांतून प्रकाश टाकण्याचं कौशल्य लेखक जयंत पवार यांनी दाखवलं आहे; जे लाजवाब आहे. या कथेचा रहस्यकथाकार निवेदक म्हणजे एकेकाळचा मराठीतला लोकप्रिय गुन्हेगारी कथाकार श्रीकांत सिनकर होय, हे वाचकाला कळतं. ‘अरुण’ म्हणजे अरुण काळे आणि ‘भुजंग’ म्हणजे भुजंग मेश्राम हे विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात दमदार कविता लिहून अकाली मृत्यू पावलेले कवी. कथेत, हातातल्या कवितेच्या वह्यांसकट धावत्या रेल्वेतून स्वत:ला झोकून देऊन अस्तित्वाची दुखरी नस संपवून टाकणारा ‘राजापुरे’ म्हणजे नव्वदच्या दशकात रेल्वेखालची अपघात की आत्महत्या अशी स्वत:च्या मृत्यूची मीमांसा संदिग्ध ठेवून लहान वयातच मरण पावलेला विवेक मोहन राजापुरे. आणि नशेच्या तारेत संज्ञाप्रवाही विचार प्रकट करत समुद्राच्या पाण्यात नाहीसा होणारा ‘मन्या’ म्हणजे साठोत्तरी पिढीतला मनस्वी कलंदरपणे स्वत:चं आयुष्य उधळून टाकलेला कवी मनोहर ओक.
मानवी अस्तित्व आणि दु:ख यांचं नातं काय आहे, हा सनातन प्रश्न या कथेच्या मुळाशी आहे. कथेतले कवी सातत्याने या प्रश्नाविषयी बोलताहेत. रहस्यकथाकार असलेल्या निवेदकासाठी अर्थातच हा प्रश्न फारसा आस्थेचा नाही. आधी झुमरू बारमध्ये, नंतर ब्लू विंटरमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी वावरणाऱ्या बारबालेचं खरं नाव काय? तिची आयडेंटिटी काय? तिचं रक्षण करणारा बबलू तिचा नक्की कोण? आणि शेवटी तिचा खून कोणी केला? हे प्रश्न या रहस्यकथाकार असलेल्या निवेदकासाठी महत्त्वाचे असणं स्वाभाविक आहे. या प्रश्नांचा तो पाठपुरावा करतो. भुजंग, अरुण हे त्याचे कविमित्र – जीवनातल्या गंभीर प्रश्नांवर कविता लिहिणारे, चर्चा करणारे- या रहस्यकथाकाराला तापदायक वाटत असले, तरी मित्र म्हणून बारमध्ये रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी गप्पा मारताना, त्यांच्यासोबत भटकताना तो त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या गुंताळ्यात गुरफटला जातो.
भुजंग आणि अरुण हेही दोघं त्याच बारबालेच्या रहस्याचा शोध घेत आहेत; पण दोघांचे उद्देश पुन्हा वेगळे आहेत. गावाकडून मुंबईत पळून आलेल्या एका प्रिय मुलीच्या शोधात अरुण आहे. तीच ही बारबाला असावी असं त्याला वाटतं. आणि आदिम जाणिवेच्या कविता लिहिणारा भुजंग तिच्याकडे स्वत:तल्या आदिम प्रेरणांचं भक्ष्य म्हणून पाहतो. ती बारमध्ये नाचणारी मुलगी या सर्वांसाठीच एक रहस्य बनलेली आहे. या कथेत मानवी जीवनातल्या अनाकलनीयतेचं ती प्रतीक आहे. सबंध कथेत ती दिसत, वावरत राहते. परंतु तिचं बोलणं, व्यक्त होणं याला लेखकाने कथेत कुठेही जागा दिलेली नाही. तिला संदिग्ध ठेवलं आहे. भोवतीची पात्रं तिच्या आयडेंटिटीची चाचपणी करताना, तिच्या खरेपणाचा शोध घेताना केवळ दिसतात.
आपल्याला वाचक म्हणून हे माहीत आहे की, भुजंग मेश्राम आणि अरुण काळे हे दोघं मराठी साहित्याच्या वंचित-विद्रोही परंपरेतले कवी होते. जयंत पवार यांनी त्यांच्या कवितांमधल्या जाणिवांचा, जीवनदृष्टीचा अतिशय कलात्मक उपयोग ‘छटाकभर रात्र…’ या कथेत अस्तित्व आणि दु:ख याविषयीच्या डिस्कोर्समध्ये करून घेतला आहे. विशेषत: शोषणाविषयीची त्यांची चर्चा यासंदर्भात वाचण्यासारखी आहे. रहस्यकथाकार निवेदकाचा मित्र अरुण बारबालेच्या शोषित जीवनाकडे बुद्धाच्या करुणामयी नजरेने पाहतो. भुजंगच्या मते मात्र, ती बारबाला ‘बडे बाप का बेटा’ असलेल्या विराट ढोलकियाची गुलामी करताना त्या ढोलकियालाही वापरून घेते. एकप्रकारे ती आपल्या शोषकाचं शोषण केल्याचं समाधान मिळवते. शोषिताने शोषकाला असं वापरून घेणं, काही काळासाठी का होईना शोषक बनणं हा त्याच्यासाठी प्रतिरोधाचा एक मार्ग असतो, असं भुजंग म्हणतो. या पात्रांच्या द्वारे जयंत पवार यांनी साठोत्तरी मराठी साहित्यात आढळणाऱ्या जीवनदृष्टीचे विविध पदर या कथेत एकत्र आणून परस्परांसमोर उभे केले आहेत.
दु:खामुळे अस्तित्वाची जाणीव अधिक ठसठसते, की अस्तित्वाच्या जाणिवेमुळे दु:खाचा छळ सोसावा लागतो, आणि याचा साहित्यनिर्मितीशी काय संबंध असतो – हा प्रश्न या कथेत सर्वत्र भरून राहिला आहे. राजापुरे म्हणतो, अस्तित्वाला दु:खाची नाळ जोडलेली आहे, तीच तोडून टाकलेली बरी. आणि असं म्हणून तो धावत्या रेल्वेखाली काळोखात झेपावतो. मन्या सार्वत्रिक सत्य सांगितल्याच्या थाटात म्हणतो, तुम्ही-आम्ही, आपण सर्व विश्वाच्या विक्राळ पसाऱ्यासमोर अतिक्षुद्र आहोत. त्यामुळे असल्या प्रश्नांची उत्तरं शोधणंच मूर्खपणाचं आहे. भुजंग अत्यंत बेफिकीरपणे जगून स्वत:चं शरीर तोळामासा करतो. एका बेसावध क्षणी निवेदकाला अज्ञात अशा रहस्यमय रीतीने भुजंग आणि अरुण दोघंही मरतात. त्यांचाही खून झालाय, की मृत्यू हे निवेदकाला अनाकलनीय राहतं.
या शहरातून कवीच कसे एकेक करून नाहीसे होत चाललेत? असा प्रश्न कथेच्या अखेरीस रहस्यकथाकाराला पडतो. इथे कवी हे समाजाच्या संवेदनशीलतेचं, समाजातल्या जागरूक जागल्यांचं प्रतीक म्हणून अधोरेखित झाले आहेत. ही संवेदनशीलता, जीवनभान हे जीवनाविषयीच्या अनाकलनीय प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक आहेत, असं या कथेच्या लेखकाला सुचवायचं आहे. म्हणजे एकीकडे जीवनाविषयीच्या अनाकलनीय प्रश्नांची उत्तरं शोधणं अवघड होत चाललंय, आणि दुसरीकडे त्यांचा शोध घेऊ शकणारी समाजाची संवेदनशक्तीच हरवून जात आहे, या भीतिदायक वस्तुस्थितीकडे त्याने लक्ष वेधलं आहे.


इथे एक गोष्ट स्पष्ट होते : मानवी जीवनात सत्य शोधणं अशक्य होऊन बसलं आहे, सत्याचा शोध अखेर संदिग्धतेच्या प्रदेशात दिशाहीन अवस्थेत संपतो, असा आशय व्यक्त करून ‘छटाकभर रात्र…’चा लेखक थांबलेला नाही; तर पुढे जाऊन असं का होतं आहे, याचा शोध त्याने घेतला आहे. कथेतल्या एका वस्तुस्थितीकडे त्याने निर्देश केला आहे : कवींचं नाहीसं होणं.
रहस्यकथाकार कथा कशासाठी लिहितो? वाचकांचं मनोरंजन करण्यासाठी. त्यांना रहस्याचा भेद झाल्याचा आनंद देण्यासाठी. पण या कथेतल्या रहस्यकथाकार निवेदकाला रहस्याचा भेद तर करता येत नाहीच; पण त्याला न झेपणारे प्रश्न त्याच्यावर एकामागून एक येऊन आदळू लागतात. राजापुरेने रेल्वेतून उडी मारली, मन्या समुद्र चिरत नाहीसा झाला आणि अखेरीस भुजंग आणि अरुण यांचाही मृत्यू झाला; या प्रकाराने भयंकर अस्वस्थ होऊन तो म्हणतो, कशासाठी दोघं भांडले? कशाच्या मागे लागले? कशासाठी लिहीत राहिले? शब्दांचा जन्म देत राहिले? प्रत्येकजण एकेक रहस्य शोधत असतो की काय? आणि नष्ट होतो? जयंत पवार इथे दाखवतायत की, या कवींसारखे लोक आपलं आयुष्य पणाला लावून, उधळून टाकून आपल्या लिखाणावाटे अस्तित्वाविषयीच्या, सामाजिक शोषणाविषयीच्या असाध्य व्याधींची मुळं खणून काढण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्या व्यवस्थेमुळे अशा कवींचाच बळी जाणार असेल, आणि आपण त्यांच्या नाहीसं होण्याविषयी जराही आस्था, चिंता दाखवणार नसू, तर आपल्याला जीवनाविषयीचं कुठलं सत्य गवसणार आहे? जीवनाविषयीच्या कुठल्याही प्रश्नाचं रहस्य उलगडणं आपल्याला अशक्य होऊन बसेल. कवींचं नाहीसं होणं म्हणजे समाजाने स्वत:ची संवेदनशीलता हरवून बसणं.

कथा संपताना जाणवतं की, जयंत पवारांनी वाचकांना (म्हणजे आपल्याला) या रहस्यकथेच्या निवेदकाच्या पंक्तीत नेऊन बसवलं आहे. निवेदकाला कथेतलं वास्तव अनाकलनीय, झेपेनासं झालं आहे, तशीच एकंदर जीवनाविषयी आज आपली अवस्था आहे. रहस्यकथेच्या रूढ, लोकप्रिय आकृतिबंधाला झेपत नाहीत, असे प्रश्न लेखकाने या रहस्यकथेत हेतुपूर्वक उपस्थित केले आहेत. त्यातून लेखकाला सुचवायचं आहे की, आपली अवस्था या कथेसारखी उथळ, बधिर झाली आहे. कथेचा घाटसुद्धा आशय व्यक्त करतो, लेखकाचं जीवनभान व्यक्त करतो, ते अशा प्रकारे.
आणि हे करत असताना लेखक आपल्याला आपण काय गमावून बसतो आहोत, तेही दाखवतो आहे. मनोहर ओक, विवेक मोहन राजापुरे यांची अस्तित्वाचा तळ शोधू पाहणारी आधुनिकवादी चिंतनशीलता, भुजंगच्या कवितेतला विद्रोह, अरुण काळेच्या कवितेतली बुद्धाची करुणामय दृष्टी, यांचं जसं मराठी साहित्यातून विघटन होतं आहे, तसंच समाजमनातूनही ही दृष्टी, विचार, प्रेरणा नाहीशा होत आहेत. एका अर्थाने या कथेने साठच्या दशकापासून निर्माण झालेल्या मराठी साहित्याची समीक्षा केली आहे, तर दुसरीकडे आपल्या समाजाचा चिकित्सक वैचारिक वारसा कोणता याचं निदान केलं आहे, आणि तो गमावत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या कथेने एवढी उत्तुंग झेप घेणं अद्वितीय आहे.

– नीतीन रिंढे

  • मला आवडलेल्या काही निवडक कथा
    • वरणभात लोन्चा कोन नाय कोन्चा / लेखक- जयंत पवार.
    • बकऱ्याची बॉडी / लेखक- समर खडस.
    • गुरुत्वाकर्षणाचे अध्यात्म / लेखक- राहुल बनसोडे.
    • निळ्या दाताची दंतकथा / लेखक- प्रणव सखदेव.
    • बाळूच्या अवस्थांतराची डायरी / लेखक- किरण गुरव.
    • एक अनाथ, एक डिटेक्टिव्ह आणि काही प्रेमभंग / लेखक- हृषीकेश गुप्ते.

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल नोव्हेंबर २०२०


गेल्या वीस वर्षांतील मला आवडलेली कथा लेखमालिकेतील इतर लेख


Deepa deshmukh
लेखिका व उत्तम वाचक दीपा देशमुख यांचा लेख

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा : दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी
(लेखक- बालाजी सुतार.)

कल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी… अनेक यशस्वी `बिझनेस बाजीगरांनी’ दाखविलेले जिद्द, मेहनत, ध्यास…

लेख वाचा…


Kiran Yele
आघाडीचे लोकप्रिय कथाकार किरण येले यांचा लेख

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा : तीन लेखक, तीन कथा (जयंत पवार, भारत सासणे, राजन खान)

कल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी… अनेक यशस्वी `बिझनेस बाजीगरांनी’ दाखविलेले जिद्द, मेहनत, ध्यास…

लेख वाचा…


रोहन-मोहर’ मुद्रेतील सर्जनशील साहित्य

मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट


सतीश तांबे


‘‘दूर कुठेतरी एका कोपऱ्यात अभिजनांचा टिचभर तुकडा आणि दुसरीकडे हा बहुजनांचा अक्राळविक्राळ प्रदेश. मी त्याच्या मध्यावर कुठेतरी उभा… अगदी एकटा. न घर का, न घाट का!’’

– ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ कथेतून

गेली ३५हून अधिक वर्षं ज्येष्ठ लेखक सतीश तांबे निष्ठेने कथालेखन करून ‘कथेचा चिंचोळा अवकाश’ सातत्याने विशाल करत आहेत. मुठीत काजवा लपवलेला असावा, तशी त्यांच्या कथेत मर्मदृष्टी दडलेली असते आणि जेव्हा ती वाचकाला सन्मुख होते, तेव्हा वाचक चकित होऊन अंतर्मुख होतो.

या संग्रहातली ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ ही कथा मराठी साहित्याची सांस्कृतिक चिकित्सा करते. तर ‘यत्र-तत्र-सावत्र’ ही कथा जमिनीच्या रूपकातून केलेलं मानवी अवस्थेवरचं करुण भाष्य ठरते. ‘नाकबळी’सारखी मिश्कील वाटणारी कथा गंभीरपणे स्त्रीपुरुष संबंधांचा वेध घेते. तर ‘संशयकल्लोळात राशोमान’ ही कथा सत्य म्हणजे काय, या प्रश्नाचा रहस्य कथेच्या अंगाने वेध घेते. ‘रावण आडनावाच्या पांडवपुत्राच्या नावाची जन्मकथा’ ही कथा म्हणजे जणू कल्पित कसं रचावं याचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या आपल्या महाकाव्यांना वाहिलेली आदरांजलीच



250.00 Add to cart
Featured

नाइन्टीन नाइन्टी


सचिन कुंडलकर


आघाडीचा चित्रपट-दिग्दर्शक, संवेदनशील लेखक

सचिन कुंडलकर…

या पुस्तकातल्या ललित लेखांमधून देतोय, जगाकडे पाहण्याचा

एक वेगळा दृष्टिकोन… नाइन्टीन नाइन्टी !



340.00 Add to cart

वा! म्हणताना

डॉ. आशुतोष जावडेकर


‘‘अनेकदा जे समीक्षकीय लेखन समोर येतं ते तांत्रिक, कोरडं आणि संज्ञांच्या जंजाळात अडकलेलं असं असतं. शास्त्रीय लेखन हे नेहमीच तांत्रिक असतं. ते ती विद्याशाखा सोडून पटकन सगळ्यांना कळेल किंवा कळावं अशी अपेक्षाही काहीशी अवास्तव असते. भाषाशास्त्रीय समीक्षा ही तशी असते. त्यात काही मुळात चूक आहे असं नाही. चुकतं हे की, अशी समीक्षा लिहिणं आणि वाचणं हे अभ्यासाचं सोडून साहित्य-व्यासंग मिरवण्याचं ठिकाण बनतं. मग उगाच अस्तित्ववाद वगैरे शब्द गप्पांमध्ये घुसले-घुसवले जातात. त्या शब्दांचा किंवा संकल्पनांचा काही दोष नसतो. ते शब्द आढ्यतेने वापरणाऱ्या लेखकांमुळे सर्वसामान्य वाचकांपासून अपरिचित राहतात. प्रत्येक भाषेत मोजके पण चांगले, उमदे समीक्षक असतात ज्यांची भाषा संज्ञायुक्त असली तरी शब्दबंबाळ नसते. ती वाचकाला परकं करत नाही, खुजं ठरवत नाही… `वा!’ म्हणताना हे पुस्तक या धारेवर तर आहेच, पण त्यापुढे जाऊन मी म्हणेन की, माहितीच्या विस्फोटाच्या काळात मला वाचक हा नुसता पॅसिव्ह भागीदार नव्हे, तर सह-सर्जकही वाटतो. समीक्षालेखन करताना तुम्ही वाचक हे मित्र-सुहृद बनून माझ्या डोळ्यांपुढे येत असता…’

– डॉ. आशुतोष जावडेकर

साहित्याचा मनापासून आस्वाद घेणारा आणि तो घेताना तुम्हालाही ‘वा!’ अशी दाद द्यायला लावणारा समीक्षा-लेखसंग्रह `वा!’ म्हणताना…


250.00 Add to cart

साक्षीभावाने बघताना

उलरिकं द्रेस्नरच्या निवडक कविता


उरलीकं ड्रेसनर
अनुवाद : अरुणा ढेरे


‘पोएट टू पोएट’ या अभिनव संकल्पनेतून सुप्रसिद्ध प्रतिभावान जर्मन कवयित्री उलरिकं द्रेस्नर हिच्या निवडक जर्मन कवितांचं अरुणा ढेरे व जयश्री हरि जोशी यांनी साकारलेलं अनुसर्जन…

वेगवेगळ्या देशांतले भूप्रदेश तिथल्या सांस्कृतिक संदर्भांसकट उलरिकं यांच्या काव्यात्म अनुभवाचा भाग झालेले आहेत. त्यामुळे मराठी कवयित्रींच्या अनुभवविश्वापेक्षा तिचं अगदी निराळं आणि समृद्ध असं अनुभवाचं जग तिच्या कवितांमधून समोर येतं.

सांस्कृतिक संदर्भांपासून पूर्ण मुक्त अशा स्त्रीशरीराच्या अनुभवापासून थेट मानवजातीच्या उत्क्रांतीच्या इतिहासापर्यंत आणि स्त्रीपुरुष संबंधातल्या ताण्याबाण्यापासून बर्लिनच्या भूत-वर्तमानापर्यंत तिच्या कवितेचा विस्तृत पैस आहे…

– अरुणा ढेरे

ही कविता ध्वनीचे बोट धरून दृश्यप्रतिमांची उकल करते. उलरिकंला शब्दांचे खेळ करायला आवडतात. नवीन शब्दांचे सर्जन करण्यात तिचा हातखंडा आहे.

दृश्य रूप हे तिच्या कवितेचे विशेष लक्षण आहे. उलरिकंची कविता माणसा-माणसांतील समीकरणं आणि लालसा, त्यांच्या भावनांचे खेळ, आकांक्षाचे ओझे हे जगाच्या पाठीवर सारखेच असते हे दाखवून देणारी.

– जयश्री हरि जोशी


250.00 Add to cart

निळ्या दाताची दंतकथा आणि इतर कथा


प्रणव सखदेव


माझ्या बापाने तोंड उघडलं
काही क्षण गेले असतील नसतील .
मग पहिल्यांदा त्या पत्रकाराला माझं –
या निळ्याभोर दंतराजाचं दर्शन झालं.
माझा बाप विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देत होता.
पण पत्रकारांचं सगळं लक्ष केंद्रित झालं होतं,
ते माझ्यावर – शहाणपणाच्या निळ्याभोर दंतराजावर!
माझा बाप बोलणं थांबत म्हणाला, काय झालं?
पत्रकार म्हणाला, ”तुम्हाला एक दात आहे, निळाभोर!”

बापाच्या मनात तो आवाज घुमला – ‘दंतरुपी शहाणपणा!’
तो उठणार, तोच धपकन खाली पडला आणि मेला!
आणि माझी रवानगी झाली त्या पत्रकाराच्या हिरडीत!

मानवाची फरफट आता सुरु होणार होती.
कारण माझी हि कहाणी कुणालाच ठाऊक नव्हती.
खरंतर शहाणपणाचाच शाप झाला होता!’


225.00 Add to cart

गाइड


आर. के. नारायण
अनुवाद : उल्का राउत 


आर. के. नारायण हे जगभरात मान्यताप्राप्त असे इंग्रजी साहित्यिक.
त्यांच्या ‘द गाइड’ या इंग्रजी कादंबरीला १९६०मध्ये ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला आणि एक श्रेष्ठ पौर्वात्य साहित्यकृती म्हणून ती जगभर बहुचर्चित ठरली. १९६५मध्ये याच कादंबरीवर आधारित विजय आनंद दिग्दर्शित ‘गाइड’ हा कलात्मक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कादंबरीचा व्यापक आशय व त्यातील राजू गाइड, नृत्यांगना रोझी, तिचा पती मार्को आदी या मातीतल्या व्यक्तिरेखा सर्वतोमुखी झाल्या.
आज पाच दशकं उलटून गेली तरी अनेक प्रश्न चर्चेत राहिले.
एका सामान्य भोगवादी राजू गाइडचं आध्यात्मिक ‘स्वामी’मध्ये रूपांतर होऊ शकतं?
एका कलासक्त विवाहित स्त्रीने पतीला सोडून नृत्यकलेचा ध्यास घेणं, राजूसारख्या परपुरुषासोबत राहणं नैतिकतेच्या चौकटीत बसतं?
मूळ कथेत व चित्रपट कथेत काय फरक होता? तो योग्य होता का?
यांसारख्या अनेक प्रश्नांचा उलगडा ही कादंबरी वाचल्याशिवाय होणं अशक्यच.
सर्जनशीलतेचा ध्यास, ज्ञान-संशोधनाचा ध्यास, भोगवाद व अध्यात्म अशा अनेक गोष्टींचं एकात्म चिंतन करायला लावणार्‍या मूळ इंग्रजी कादंबरीचा उल्का राऊत यांनी सिध्द केलेला हा अनुवाद. कल्पनारम्यता आणि अध्यात्म यांचा अभूतपूर्व मेळ घालणारी, अत्यंत रोचक व तत्त्वज्ञानात्मक डूब असलेली ही कादंबरी मराठी वाचकांसाठी आजही एक आगळी आनंदपर्वणी ठरते- गाइड!


200.00 Read more

अक्षरनिष्ठांची मांदियाळी

ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध


अरुण टिकेकर


ग्रंथलेखन आणि पत्रकारिता यांचा वारसा लाभलेल्या तिसर्‍या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे अरुण टिकेकर प्राध्यापक, वाङ्मयतज्ज्ञ, संदर्भ-विभाग प्रमुख, संशोधन-विभाग प्रमुख, साहाय्यक संपादक अशा पदांवर अनुभव घेत सप्टेंबर १९९१ मध्ये दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. दशकाहून अधिक वर्षं त्या पदांकर ते कार्यरत राहिले. इंग्रजी वाङ्मयशाखेचे विद्यार्थी असलेल्या टिकेकरांनी बहुशाखीय अभ्यासाचा तसंच संशोधनाचा पाठपुरावा केला. वाङ्मयेतिहासाबरोबर स्थानीय इतिहास, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या इतिहासलेखनाच्या नवप्रवाहांत रुची निर्माण झाल्यानं त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनास उपयुक्त ठरतील अशा इंग्रजी आणि मराठी अशा ग्रंथांचा शोध घेतला. त्यातून झालेल्या वाचन-बोधातून त्यांचे ग्रंथ-जीवन साकारले.


190.00 Add to cart

हाकामारी


हृषीकेश गुप्ते


ती तीनदा हाका मारते

आणि जो ओ देईल त्याला घेऊन निघून जाते!

हो, खरंच हाकामारी असते! खरंच असते!

त्या काळ्याकुट्ट रात्री…

त्याला हाक मारणारी नक्की कोण होती?

संध्या? निशा? की आणखी कोणी?

नेमकं काय घडलं होतं त्या रात्री?

या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधता येतील?

की आयुष्यभर ते त्याला टोकरत राहतील?

गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी – हाकामारी!


120.00 Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *