424 | 978-93-86493-99-6 | Va! Mhanatana… | वा! म्हणताना | Dr. Ashutosh Javadekar | डॉ. आशुतोष जावडेकर | ‘‘अनेकदा जे समीक्षकीय लेखन समोर येतं ते तांत्रिक, कोरडं आणि संज्ञांच्या जंजाळात अडकलेलं असं असतं. शास्त्रीय लेखन हे नेहमीच तांत्रिक असतं. ते ती विद्याशाखा सोडून पटकन सगळ्यांना कळेल किंवा कळावं अशी अपेक्षाही काहीशी अवास्तव असते. भाषाशास्त्रीय समीक्षा ही तशी असते. त्यात काही मुळात चूक आहे असं नाही. चुकतं हे की, अशी समीक्षा लिहिणं आणि वाचणं हे अभ्यासाचं सोडून साहित्य-व्यासंग मिरवण्याचं ठिकाण बनतं. मग उगाच अस्तित्ववाद वगैरे शब्द गप्पांमध्ये घुसले-घुसवले जातात. त्या शब्दांचा किंवा संकल्पनांचा काही दोष नसतो. ते शब्द आढ्यतेने वापरणाऱ्या लेखकांमुळे सर्वसामान्य वाचकांपासून अपरिचित राहतात. प्रत्येक भाषेत मोजके पण चांगले, उमदे समीक्षक असतात ज्यांची भाषा संज्ञायुक्त असली तरी शब्दबंबाळ नसते. ती वाचकाला परकं करत नाही, खुजं ठरवत नाही… `वा!’ म्हणताना हे पुस्तक या धारेवर तर आहेच, पण त्यापुढे जाऊन मी म्हणेन की, माहितीच्या विस्फोटाच्या काळात मला वाचक हा नुसता पॅसिव्ह भागीदार नव्हे, तर सह-सर्जकही वाटतो. समीक्षालेखन करताना तुम्ही वाचक हे मित्र-सुहृद बनून माझ्या डोळ्यांपुढे येत असता…’
– डॉ. आशुतोष जावडेकर साहित्याचा मनापासून आस्वाद घेणारा आणि तो घेताना तुम्हालाही ‘वा!’ अशी दाद द्यायला लावणारा समीक्षा-लेखसंग्रह `वा!’ म्हणताना… |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 192 | 22 | 14 | 1.2 | 200 | मोहर | Literature | ललित | 250 | VaMhantana | VaMhantanaBC.jpg |
असाही पाकिस्तान
अरविंद गोखले
साहित्य, संस्कृती व कलाक्षेत्रातील आगळावेगळा पाकिस्तान…
पाकिस्तानसारखा शेजारी समजायला संवेदना हवी आणि जिज्ञासाही. सांस्कृतिक भान हवं आणि राजकीय जाणही. पाकिस्तानला जाऊन, विविध क्षेत्रांमध्ये फिरून घेतलेला अनुभव हवा आणि अभ्यासही हवा. प्रत्यक्ष भेटी-गाठींमधून वेध घेण्याची दृष्टी हवी आणि उच्चपदस्थ वर्तुळातील लोकांबरोबर चर्चाही व्हायला हवी. पाकिस्तानी साहित्याची ओळख हवी आणि भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक साम्यस्थळांबद्दल आस्था हवी.
अरविंद गोखलेंकडे या सर्व गोष्टींबरोबर आहे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव. त्यातून कसदार झालेली लेखनशैली.
पाकिस्तानच्या रस्त्यांवरून केलेली भटकंती- कधी संशयाच्या छायेत तर कधी अनोळखी माणसांनी केलेल्या आदरातिथ्याच्या मायेत. अनेकांच्या परिचयातून समजलेला पाकिस्तान आणि कितीही वाचन-चिंतन केलं तरी गूढ राहिलेला पाकिस्तान. एकाच वेळेस मित्र असूनही शत्रूच्या रूपात भासणारा आणि तरीही नेहमी अनाकलनीय कारणांसाठी आकर्षित करणारा – असा आहे गोखलेंचा पाकिस्तान अर्थात् ‘असाही पाकिस्तान!’
– कुमार केतकर यांच्या प्रस्तावनेतून
Reviews
There are no reviews yet.