266 | 978-93-82591-61-0 | Ratnancha Zaad | रतनांचं झाड | Padmaja Phatak (Majet) | पद्मजा फाटक (मजेत) | ताराबाई मोडक यांच्या चरित्रलेखनापासून ते समाजशास्त्रीय, वैज्ञानिक संशोधनपर लेखनाकडून कथालेखन व अनुभवपर लेखन- अशी वळणं घेत पद्मजा फाटक (मजेत) यांच्या ‘रत्नांचं झाड’ या अनोख्या ललित संग्रहाकडे आपण पोहोचतो. या संग्रहात एकूण चौदा लेखांची वीण अतिशय सुंदरपणे गुंफली आहे. हा संग्रह म्हणजे केवळ तरल भावना आणि शब्दसौंदर्याने नटलेल्या लेखांचा संग्रह नव्हे; तर यामधील प्रत्येक लेखात विषयविविधता, मार्मिक भाष्य, अभिजात व कसदार भाषाशैली, मधूनच डोकावणारी तल्लख विनोदबुध्दी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनाकडे बघण्याचा प्रगल्भ दृष्टिकोन अशा सर्वच गोष्टी अनुभवता येतात. त्यामुळे प्रत्येक लेखाचा विषय व धाटणी जरी वेगळी असली तरी त्यात दिलेले अनुभव, संवेदना आणि सहजपणे मांडलेला वैचारिक व चिंतनशील दृष्टिकोन हे या लिखाणाचे समान धागे ठरतात. विविध रत्नांनी डवरलेलं हे झाड वाचकाला निश्चितच एक व्यापक जीवनानुभूती आणि एक वेगळं समाधान देईल! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 208 | 21.6 | 14 | 1 | 220 | This book is a collection of 14 personal essays covering variety of interesting topics by late Padmaja Phatak. This book has a great significance because it is her last book. She passed away few days ago because of prolonged illness. The essays in the book provide a broad insight about life. | मोहर | Literature | ललित | 200 | Ratnanchazad_RGB | RatnaanchZaad_BackBC.jpg |
सहेल्या इथल्या-तिथल्या
चार पावलं बरोबर चाललं की मैत्री होत नाही . एकमेकांच्या आयुष्यात चौकसपणे न डोकावता , सहजस्फूर्तपणे जे जाणवतं त्यात मैत्रीची बीजं असतात . न विचारता बोलायला , न सांगता ऐकायला कधी सुरुवात होते , एकमेकानां समजून घेताना मैत्री केव्हा जुळते कळतच नाही . दीर्घकाळ सहवासात राहता येतच अस नाही . परंतु सहवासाचे ते क्षण जेव्हा स्मृतीत घर करून राहतात , तेव्हा जीवाभावाची मैत्री जडते . लेखिकेच्या या ‘ सहेल्या तशा सामान्यातील असामान्य . आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर जेव्हा चौकट विस्कटते , तेव्हा चौकटीबाहेरचे निर्णय घेण्याचे धाडस त्या दाखवतात , त्यातील वेगळेपण पेलून आयुष्य जगतात . हे वेगळेपण पेलणं त्यांना सोपं जातं की त्याची खंत वाटते , की त्यातून निर्भेळ आनंद मिळतो ? या सगळ्या सहेल्यांच्या जीवनाने घेतलेले वेगवेगळे आकार विलोभनीय वाटतात . मोडतोड न करता , चौकटीत न बसणाऱ्या या सहेल्या इथल्या – तिथल्या
Reviews
There are no reviews yet.