355 | 978-93-86493-38-5 | Deed-Damadi : A-Rajakiya | दीड दमडी : अ-राजकीय | Shrikant Bojewar | श्रीकांत बोजेवार | मनमोहन सिंग यांच्या काळातला ‘कोळसा-घोटाळा’ असो, की मोदींच्या जनधन-योजना, स्वच्छता मोहिमा, परदेशवाऱ्या असोत, किंवा संघाची खिल्ली उडवणाऱ्या शरद पवार यांची भाजपशी अधूनमधून केलेली सलगी असो… गणेशोत्सवाचं बदलणारं स्वरूप असो की संजय दत्तला कारावासात मिळणाऱ्या सवलती असोत… तंबी दुराई त्याचा तिरकस नजरेचा चष्मा लावणारचं ! मग त्याचा तल्लख मेंदू कामाला लागणार आणि त्या चष्म्यातून अशा प्रसंगांतील विसंगती हुडवूâन काढणार. त्या विसंगतींवर बुद्धिनिष्ठ विनोदाचं आवरण चढवून आपल्यापर्यंत त्या ‘दीड-दमडी’तून पोचवणार ! या दीड-दमडीत कल्पनाविलासाचं माध्यम विविधप्रकारे वापरलं जातं… काल्पनिक प्रसंग निर्माण करून त्यात विनोदनिर्मितीची अजोड ताकद असलेल्या संवादांची चपखल पेरणी होते, विविध भाषा, विविध बोली दावणीला बांधल्या जातात, तर कधी काव्य-अभंग-ओवी-वग असे साहित्यप्रकार ढंगदारपणे पेश होतात, तर कधी ‘पत्र-व्यवहारा’तून तिरकस बाण सोडले जातात. तंबी दुराईचं ‘मोनोटनी’शी वावडं असल्यामुळे तो विविध प्रयोग करतो…एकाचएक शैलीत अडकत नाही. राजकारण, समाजकारण, साहित्य-संस्कृती क्षेत्रांत घडणाऱ्या प्रसंगांतील विसंगतींना उघडं पाडत नकळतपणे उपरोधिक भाष्य करायचं आणि तेही उच्च दर्जाची विनोदनिर्मिती साधून… ही या तंबी दुराईची खासियत ! हे लिखाण हसवत हसवत अंतर्मुख कधी करतं, विचारप्रवृत्त कधी करतं, नव्या जाणीवा कधी करून देतं हे कळतही नाही आणि म्हणूनच ही आहे रंजन करणारी, प्रबोधन करणारी आणि त्यासोबत बौद्धिक आनंद देणारी… अर्थात श्रीमंत करणारी दीड-दमडी! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 166 | 21.6 | 13.9 | 1 | 210 | Collection of articles of a well read column by well known Tambi Durai. This part consists of non-political sarcastic articles. | मोहर | Literature | ललित | 175 | DidDamdiArajkiya | DeedDamadi_ArajkiyaBC.jpg |
मनःपूर्वक खुशवंत
जीवन, मरण आणि त्या दरम्यान…
खुशवंत सिंग
अनुवाद : अभिजित थिटे
* `माझी एकच इच्छा आहे की, मला जेव्हा मृत्यू येईल, तेव्हा तो अगदी सहजतेने यावा. आपण जसं गाढ झोपून जातो ना, तसाच…’
* `मला वाटतं, कामुक विचार करणं, त्याची कल्पना करणं हेही अगदी स्वाभाविक आहे, त्यात गैर काही नाही.’
* `शेवटी जाण्याची वेळ झाली की खेद, दु:ख, कोणावरही राग न ठेवता जावं.’
निधनापूर्वी, वयाच्या ९५व्या वर्षी खुशवंत सिंग यांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकात त्यांनी सहजसोप्या आणि रोखठोक शैलीत त्यांचं खासगी आयुष्य, विवाह, प्रेम, सेक्स आणि त्यांचं लेखन व संपादनाचं काम यांविषयी ‘बिनधास्तपणे’ लिहिलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात ते प्रथमच त्यांचं यश आणि अपयश, क्षमता आणि मर्यादा यांबद्दल खुलेपणाने सांगतात.
आनंद, श्रध्दा, मृत्यू आणि धर्म यांसारख्या विषयांबाबत बोलताना ते चिंतनात्मक होतात; तर जातीयवाद, भारताचं राजकारण, दहशतवाद यांबद्दल बोलताना ते थेट आणि रोखठोक होतात. तसंच इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, लालकृष्ण अडवाणी अशा त्यांच्या स्नेह्यांबद्दलही ते कुठलीही भीडभाड न बाळगता लिहितात.
हे ललितलेखन करताना खुशवंत सिंग यांनी आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे वेगवेगळे कंगोरेही नोंदवले आहेत. त्यामुळेच मनापासून लिहिलेलं मन:पूर्वक खुशवंत वाचकांना नक्कीच भावेल…!
Reviews
There are no reviews yet.