423 | 978-93-86493-98-9 | Sakshibhavane Baghtana | साक्षीभावाने | उलरिकं द्रेस्नरच्या निवडक कविता | Urlike Dresner | Aruna Dhere | उरलीकं ड्रेसनर | अरुणा ढेरे | Jayshree Hari Joshi | जयश्री हरि जोशी | पोएट टू पोएट’ या अभिनव संकल्पनेतून सुप्रसिद्ध प्रतिभावान जर्मन कवयित्री उलरिकं द्रेस्नर हिच्या निवडक जर्मन कवितांचं अरुणा ढेरे व जयश्री हरि जोशी यांनी साकारलेलं अनुसर्जन…
… वेगवेगळ्या देशांतले भूप्रदेश तिथल्या सांस्कृतिक संदर्भांसकट उलरिकं यांच्या काव्यात्म अनुभवाचा भाग झालेले आहेत. त्यामुळे मराठी कवयित्रींच्या अनुभवविश्वापेक्षा तिचं अगदी निराळं आणि समृद्ध असं अनुभवाचं जग तिच्या कवितांमधून समोर येतं. सांस्कृतिक संदर्भांपासून पूर्ण मुक्त अशा स्त्रीशरीराच्या अनुभवापासून थेट मानवजातीच्या उत्क्रांतीच्या इतिहासापर्यंत आणि स्त्री पुरुष संबंधातल्या ताण्याबाण्यापासून बर्लिनच्या भूत-वर्तमानापर्यंत तिच्या कवितेचा विस्तृत पैस आहे… – अरुणा ढेरे हि कविता ध्वनीचे बोट धरून दृश्यप्रतिमांची उकल करते. उलरिकंला शब्दांचे खेळ करायला आवडतात. नवीन शब्दांचे सर्जन करण्यात तिचा हातखंडा आहे. दृश्य रूप हे तिच्या कवितेचे विशेष लक्षण आहे. उलरिकंची कविता माणसा-माणसांतील समीकरणं आणि लालसा, त्यांच्या भावनांचे खेळ, आकांक्षाचे ओझे हे जगाच्या पाठीवर सारखेच असते हे दाखवून देणारी. – जयश्री हरि जोशी |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 175 | 22 | 14 | 0.7 | 200 | मोहर | Literature | ललित | 250 | SakshibhavaaneCover | SakshibhavaaneCoverBC.jpg |
बाग एक जगणं
बाग फुलवणं म्हणजे यात्रिंकपणे माती खणून रोप लावणं नव्हे. बाग गॅलरीतली असो वा अंगणातली, प्रत्येक रोपाशी, फुलाशी, वेलीशी भावनिक नातं कसं जुळू शकतं हे या पुस्तकात दिसतं. पानाफुलांशी, लहान मोहक पक्षीसृष्टीशी, गुलाबाच्या कलमांशी आणि कॅक्टससारख्या कातेरी झाडाशीदेखील लेखिकेचा मूक संवाद सुरू असतो.
लँडस्केप करताना एखद्या कलाकाराप्रमाणे लेखिका कल्पनेत चित्र रंगवते. मग लँडस्केप ही तिची प्रयोगशाळाच बनुन जाते!
नैनिताल असो की जपान, देशविदेशातील बागांचा अनुभव घेतानाही लेखिकेच्या भावविश्वात घरची बाग असतेच.
बाग फुलवताना झाडाच्या स्वभावावरून, प्रतिसादावरून जीवनाच्या विविध पैलूंकडे बघण्याची व्यापक दृष्टी लेखिकेला लाभत जाते. जोडीदाराबरोबरचं सहजीवन, माणसाचं पर्यावरणाशी असलेलं नातं जीवनाच्या मोठ्या कॅनव्हासवर बघताना बागेबरोबरचं हे जगणं अधिकाधिक समृध्द वाटू लागतं.
अतिशय संवेदनशीलतेने लिहीलेलं हे अनुभवकथन मनोवेधक तर आहेच, पण जाताजाता झाडारोपांच्या, फुलापानांच्या खासियती आणि निगराणी यांचा परिचय करून देणारंही ठरतं.
बागेशी जडलेल्या अनुबंधाचा मुक्त आविष्कार म्हणजे…
बाग एक जगणं…!
Reviews
There are no reviews yet.