अरुणा ढेरे

भारतीय संस्कृती , प्राचीन साहित्य इत्यादींचे व्यासंग असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे या कन्या होत. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ साली पुणे येथे झाला. बालपणापासून साहित्याचे आणि समीक्षेची वैचारिक पार्श्वभूमी त्यांना लाभली . लहानपणापासूनच वडिलांचा व्यासंगी श्वास लाभल्याने त्यानी समाजशास्त्र , मानसशास्त्र इत्यादी साहित्याशी निगडित शास्त्रांचा आवश्यक तो अभ्यास केला. तसेच वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत जैन, बौद्ध, ख्रिस्ती धर्मग्रंथ यांच्याशीही ओळख करून घेतली . दंतकथा, मिथके यांचेही महत्त्व अभ्यासले.
१९८३ ते १९८८ या काळात, पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्रात अध्यापक - निर्माती म्हणून डॉ . अरुणा ढेरे यांनी काम केलं. १९८९ ते १९९ १ या काळात राज्य शिक्षणशास्त्र संस्थेत साहित्य विभागप्रमुख म्हणून कार्यरत आणि 'पसाय' या मासिकाची संपादिका म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्या पूर्णवेळ लेखन आणि संशोधनकार्य करत आहेत.
कवयित्री कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्यविषयक, सामाजिक इतिहासपर, किशोरांसाठी व कुमारांसाठी लेखन असे सर्व वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले आहेत. त्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.

लेखकाची पुस्तकं

साक्षीभावाने बघताना

उलरिकं द्रेस्नरच्या निवडक कविता


उरलीकं ड्रेसनर
अनुवाद : अरुणा ढेरे


‘पोएट टू पोएट’ या अभिनव संकल्पनेतून सुप्रसिद्ध प्रतिभावान जर्मन कवयित्री उलरिकं द्रेस्नर हिच्या निवडक जर्मन कवितांचं अरुणा ढेरे व जयश्री हरि जोशी यांनी साकारलेलं अनुसर्जन…

वेगवेगळ्या देशांतले भूप्रदेश तिथल्या सांस्कृतिक संदर्भांसकट उलरिकं यांच्या काव्यात्म अनुभवाचा भाग झालेले आहेत. त्यामुळे मराठी कवयित्रींच्या अनुभवविश्वापेक्षा तिचं अगदी निराळं आणि समृद्ध असं अनुभवाचं जग तिच्या कवितांमधून समोर येतं.

सांस्कृतिक संदर्भांपासून पूर्ण मुक्त अशा स्त्रीशरीराच्या अनुभवापासून थेट मानवजातीच्या उत्क्रांतीच्या इतिहासापर्यंत आणि स्त्रीपुरुष संबंधातल्या ताण्याबाण्यापासून बर्लिनच्या भूत-वर्तमानापर्यंत तिच्या कवितेचा विस्तृत पैस आहे…

– अरुणा ढेरे

ही कविता ध्वनीचे बोट धरून दृश्यप्रतिमांची उकल करते. उलरिकंला शब्दांचे खेळ करायला आवडतात. नवीन शब्दांचे सर्जन करण्यात तिचा हातखंडा आहे.

दृश्य रूप हे तिच्या कवितेचे विशेष लक्षण आहे. उलरिकंची कविता माणसा-माणसांतील समीकरणं आणि लालसा, त्यांच्या भावनांचे खेळ, आकांक्षाचे ओझे हे जगाच्या पाठीवर सारखेच असते हे दाखवून देणारी.

– जयश्री हरि जोशी


250.00 Add to cart