The startup business Guide


Don’t Be a Job Seeker, Be a Job Creator


[taxonomy_list name=”product_author” include=”4222″]


Have you ever thought of starting a new age business and taking it to greater heights?

Well, if you are the one, you have picked up the right book!

The Startup Business Guide is a book which wil answer all your queries, give you information about all that is needed to ideate, implement and grow a startup business.

The SALIENT FEATURES of the book:

✓ Building and Validating a Business Idea

✓ Developing a Business Plan Building the Right Team

✓ Understanding the Technology Aspects

✓ Scalability of the Startup ✓ Five Factors of a Successful Startup

Author Dr. Suresh Haware with his vast experience, guides you through the startup scene in India and Maharashtra. He also explains various Central and State Government initiatives for promotion of the Startup Businesses.


The Startup Business Guide is your true guide in your journey,
from a job seeker to be a job creator!

300.00 Add to cart

गमक यशाचे

सामन्यत्वाकडून असामन्यत्वाकडून


[taxonomy_list name=”product_author” include=”339″]


ही आहे एक गोष्ट तुमच्या – आमच्यासारख्याच एका माणसाची . प्रश्न पडलेले असतात यशस्वी तर व्हायचंय , पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची ? खरंच , यश नशिबावर अवलंबून असतं का ? यशाचा मार्ग काही निवडक लोकांसाठीच असतो का ? …. पण एकदा त्याला बॉसरूपी मार्गदर्शक भेटतो आणि त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते ! तो मार्गदर्शक त्याला प्रसिद्ध व्यक्तींचे दाखले देतो , समजावून सांगतो की यश प्राप्त करण्याचे कोणतेही शॉर्टकट्स नसतात , यश हे निढळाचा घाम गाळून , भीतीवर मात करून आणि आलेल्या संधीचं सोनं करून मिळवायचं असतं . स्वप्नांचा , इच्छा – आकांक्षांचा पाठलाग करून त्यांना पूर्णत्वाला न्यायचं असतं …. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या असामान्यत्वाची जाणीव करून देईल ; यशाच्या अनेक शक्यतांनी भरलेली नवी क्षितिजं खुली करून देईल ; अर्थात , तुम्हाला असामान्य होण्याची , काहीतरी करून दाखवण्याची आणि यशोशिखर गाठण्याची आस असेल ; ध्यास असेल , तरच …. !


140.00 Add to cart

बॉर्न टु विन

जिंकण्यासाठी जन्म आपुला


[taxonomy_list name=”product_author” include=”594,595″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”375″]


व्यवसायात यश मिळवायचं आहे?
कार्यक्षेत्रात अग्रस्थान पटकवायचं आहे?
कौटुंबिक आयुष्यात समाधान आणि सुख हवं आहे?
मग असं समजा की, या साऱ्याची गुरुकिल्ली तुम्हाला मिळालीच… अर्थात बॉर्न टु विन!
लाईफ चेंजर अशी ख्याती असणारे प्रेरक वक्ते झिग झिगलर यांनी या पुस्तकात यशाचा जणू मूलमंत्रच दिला आहे. आपल्या व्यक्तिमत्वात लपलेले अनेक गुण हे पुस्तक दाखवून देतं.
जिंकण्यासाठी वृत्ती कशी विकसित करावी? आणि वैयक्तिक विकासासाठी तिचा उपयोग कसा करावा? स्वत:च्या वर्तणुकीत बदल करून व्यावसायिक आणि वैयक्तिक नातेसंबंध अधिक निरोगी कसे बनवावे? प्रभावी संवादाचं तंत्र अवगत करून प्रत्येकाला कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकारे कशा निभावता येतील? या सर्वाचं मार्गदर्शन झिगलर अनेक उदाहरणं देत करतात. सोबत आकृत्या, तक्ते, टेबल्स यांचा आधारही ते देतात.
आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर वाचलंच पाहिजे असं पुस्तक…बॉर्न टु विन !


Zig Ziglar’s Born to Win is a key to succeed in life. This book talks about the four decades of life-changing tools and practices into one inspiring, easy-to-use format for people who want to grow and improve the whole spectrum of their lives now!It also says that “You were born to win, but to be the winner you were born to be you must plan to win and prepare to win. Only then can you legitimately expect to win.”Born to Win guides the readers through this plan-prepare-expect strategy. You will learn that when you have the hope that things can change, and a plan to make that change possible, you can take action.



225.00 Add to cart

तुमचा सच्चा साथीदार

व्यवसाय किंवा नोकरी-धंद्यातील प्रगतीसाठी…


[taxonomy_list name=”product_author” include=”506″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”421″]


चांगला उद्योजक / व्यावसायिक / नोकरदार होण्यासाठी
तुम्ही ‘जागरूकपणे’ प्रयत्न करायला तयार आहात?

सुप्रसिद्ध लेखक, ‘माइंडट्री’ कंपनीचे संस्थापक सुब्रोतो बागची यांनी
‘द प्रोफेशनल’ (मराठी आवृत्ती : मैत्री व्यावसायिकतेशी) हे पुस्तक लिहिलं आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. या पुस्तकात त्यांनी व्यावसायिकतेबद्दल त्यांच्या अनुभवांआधारे भाष्य केलं होतं, तर ‘तुमचा सच्चा साथीदार’मध्ये त्यांनी व्यावसाययिकांमध्ये आवश्यक असणार्‍या‍ गुणांचा विकास व्हावा, यासाठी एका वर्कबुकचीच निर्मिती केली आहे.

या पुस्तकात त्यांनी चांगला व्यावसायिक होण्यासाठी आवश्यक असलेल्या २५ गुणांबद्दल थोडक्यात, पण मौलिक माहिती दिली आहे. तसंच हे गुण आपल्या अंगी कसे बाणवावेत, ते अधिकाधिक विकसित कसे करावेत, हे आपलं आपल्यालाच समजावं यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रश्नही विचारले आहेत. त्यांची उत्तरं देण्यासाठी पुस्तकात मोकळ्या जागा देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी आपल्याला सामोरे जावे लागणारे, आपल्या क्षमतांचा कस लावू पाहणारे वेगवेगळे घटना-प्रसंगही देण्यात आले आहेत. त्या घटना-प्रसंगांत तुम्ही कसं वागाल, काय कृती कराल हे पुस्तकात लिहायला सांगितलं आहे. कधीकधी आधी दिलेल्या उत्तरांचं पुनरावलोकन करायलाही सांगितलं आहे.

‘प्रत्यक्ष स्वाध्याय’ करायला लावून स्वत:च्या आत डोकवायला लावणारं हे आगळंवेगळं पुस्तक सगळ्या व्यवासायिकांना, उद्योजकांना आणि नोकरदारांना मौलिक मार्गदर्शन तर करेलच, शिवाय व्यावसायिक जीवनातला ‘तुमचा सच्चा साथीदार’ही होईल !


195.00 Add to cart

व्यवसायातील इंप्रेसिव्ह मॅनर्स

व्यवहारात आपली छाप पाडण्यासाठी वागण्या-बोलण्याच्या प्रभावी पध्दती – सेल्स, मार्केटिंग, एच.आर., इंटरव्ह्यू, बिझनेस, कॉर्पोरेट, मिटिंग्ज, कॉकटेल्स, डिनर


[taxonomy_list name=”product_author” include=”572″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”784″]


सेल्स, मार्केटिंग किंवा बिझनेस… तुम्ही कोणत्याही क्षेत्रांत कार्यरत असलात तरी प्रभावीपणे संवाद साधता येणं हे व्यावसायिक यशासाठी अत्यावश्यक असतं. तुमचा आवाज, शब्दांची निवड, तुमची वेषभूषा, देहबोली या सर्वांचा समोरच्यावर परिणाम होत असतो. तुमच्या केवळ एका हस्तांदोलनातून किंवा अगदी दहा मिनिटांच्या भेटीतूनही तुम्हाला व्यवसायातल्या सुवर्णसंधी मिळू शकतात!
तुमच्या कामाच्या ठिकाणी वागण्या-बोलण्यातून विशेष ठसा उमटवण्यासाठी आवश्यक अशा टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.
उदाहरणार्थ…
हस्तांदोलन कसं करावं
बिझनेसकार्डची देवाणघेवाण कशी करावी
आपल्या ग्राहकाच्या स्मरणात व संपर्कात कसं राहावं
सहकारी, ग्राहक व बॉस यांच्याबरोबर कशाप्रकारचं वर्तन ठेवावं…
मिटिंगमध्ये किंवा बिझनेसपार्टीमध्ये काय व कसं बोलावं
क़ॉन्फरन्समध्ये किंवा बिझनेस इव्हेंट्सला जाताना वेषभूषा, केशरचना, अ‍ॅक्सेसरीज, पादत्राणं कशी असावीत
टेक्नॉलॉजीच्या साधनांद्वारे (इ-मेल, टेलि व व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) संवाद कसा साधावा, इ.इ.
आपलं करिअर ‘प्रभावित’ करणार्‍या अशा सर्व कळीच्या मुद्दयांवर मार्गदर्शन करणारं पुस्तक… व्यावसायिक इंप्रेसिव्ह मॅनर्स!


250.00 Add to cart

माझा मोटीव्हेटर मित्र

आयुष्यात नेहमी साथ व स्फूर्ती देणारा आपला वैयक्तिक मोटिव्हेटर मार्गदर्शक


[taxonomy_list name=”product_author” include=”340″]


यशोप्राप्तीचे ५० मैत्रीपूर्ण कानमंत्र

यशस्वी होण्याची पहिली पायरी असते एखादी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त होणं! त्यानंतरच आपल्या प्रयत्नांना मेहनतीची जोड देऊन आपलं ठरवलेलं उद्दिष्ट गाठता येऊ शकतं. आणि म्हणूनच यशोप्राप्तीच्या मार्गात आवश्यकता असते ती, उद्युक्त करणार्‍या, प्रेरणा देणार्‍या एखाद्या मार्गदर्शकाची!
व्यक्तिमत्त्व विकास व व्यावसायिक क्षेत्रातील विख्यात प्रशिक्षक आणि ‘बॉर्न टू विन’चे संस्थापक व संचालक अतुल राजोळी यांनी अत्यंत सहजसोप्या, हलक्याफुलक्या व मैत्रीपूर्ण शैलीत यशोप्राप्तीचे ५० कानमंत्र या पुस्तकात दिले आहेत. या पुस्तकातलं कोणतंही पान उघडून वाचायला घेतल्यास त्यातून सकारात्मक विचार मिळतो. त्यामुळे हे कानमंत्र आपल्या आयुष्यात प्रभावी बदल घडवण्यासाठी, आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक स्वप्नं साध्य करण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
यशोप्राप्तीच्या मार्गात प्रत्येक क्षणी साथ व प्रेरणा देणारा आणि तुमच्या सुप्त महत्त्वाकांक्षांना प्रत्यक्षात आणण्यासाठी उद्युक्त करणारा –
माझा मोटिव्हेटर मित्र!

अप्रतिम पुस्तक! या पुस्तकातलं कोणतंही पान कधीही उघडून वाचावं, त्यातून तुम्हाला नक्कीच लाभदायक विचार मिळेल.
– मधुकर तळवलकर, चेअरमन, तळवलकर्स बेटर व्हॅल्यू लिमिटेड

या पुस्तकामुळे तुम्हाला यशस्वी होण्यासाठी नेमकं काय करायचं याचं उत्तम मार्गदर्शन मिळेल.
– रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक – पितांबरी

ज्या वेळेला तुम्ही संकटात सापडाल, आपण हरलो, थकलो, संपलो असं वाटेल, त्या वेळी हे पुस्तक वाचा. तुम्हाला खात्रीने सकारात्मक मार्ग सापडेल!
– डॉ. उदय निरगुडकर, मुख्य संपादक – झी २४ तास


200.00 Add to cart

इम्प्रेसिव्ह इंग्लिश


[taxonomy_list name=”product_author” include=”338″]


व्याकरणदृष्टया बरोबर असलेले इंग्रजी अनेकांना आत्मसात असते. परंतु सुयोग्य शब्दप्रयोग, इंग्रजीचे पैलू दाखविणारी वाक्यरचना, वाक्प्रचार इ. आपल्या लिहिण्या-बोलण्यात डोकावल्यास ते इंग्रजी, प्रभावी ठरणारे असेल. आवश्यकता असेल तेव्हा ‘प्रभावी इंग्रजी’चा सहजपणे वापर करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची सोपी रचना करण्यात आली आहे. पुस्तकाची उपयुक्तता

  • नोकरीसाठी इन्टरव्ह्यू देताना आपले वेगळेपण सिध्द होईल.
  • नोकरीत बढतीची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍यांसाठी.
  • व्यावसायिकांना प्रभावी संभाषण व पत्रव्यवहारासाठी.
  • परभाषिक समाजात वावरताना व स्वत:च्या व्यक्तिगत विकासासाठी
  • इंग्रजी बोलू-लिहू इच्छिणार्‍यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी.
  • चांगले इंग्रजी अंगवळणी पडण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी.
  • भाषेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी.
  • कोणत्याही भाषणात, संभाषणात व लेखनात सर्वांना उपयुक्त.

90.00 Add to cart

उद्योग संच

यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली


[taxonomy_list name=”product_author” include=”507″]


कल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी…

उद्योग तुमचा…पैसा दुसऱ्याचा

उद्योगाची उभारणी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग,रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ… नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणाऱ्या सर्व तरुणांसाठी अनुभवाचे बोल…

 

उद्योग करावा ऐसा…

अनेक यशस्वी `बिझनेस बाजीगरांनी’ दाखविलेले जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे गुण तरुणांमध्ये रुजवण्यासाठी हावरे यांनी या बिझनेस बाजीगरांशी संवाद साधून तयार केलेलं पुस्तक…

 

स्टार्टअप मंत्र

तरुणाईच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मिळालेली एक नवी दिशा म्हणजे स्टार्टअप. एखाद्या संकल्पनेवरून प्रत्यक्ष उद्योग कसा उभारावा याचे अनुभवसिद्ध धडे देणारे…‘स्टार्टअप मंत्र’!


725.00 Add to cart

माझं कुटुंब, माझी गुंतवणूक

स्वप्न साकार करण्यासाठी पैशाचं ‘स्मार्ट’ नियोजन


[taxonomy_list name=”product_author” include=”590″]


आयुष्यात प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्नं असतात, इच्छा-आकांक्षा असतात. कोणाला घर विकत घ्यायचं असतं, कोणाला चारचाकी हवी असते; तर कोणाला उच्च शिक्षण घ्यायचं असतं. आणि ही स्वप्नं-आकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आर्थिक नियोजन!

गुंतवणूक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रा. वीरेंद्र ताटके यांनी या पुस्तकाच्या सुरुवातीला आर्थिक नियोजनाचा मूलभूत मंत्र दिला आहे…

एकूण उत्पन्न – गुंतवणूक = खर्च

अशा प्रकारे ताटके माहिती देता देता आपल्याला आर्थिकदृष्ट्या ‘साक्षर’ करतात, आर्थिक नियोजनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन देतात.

बँकामधली विविध प्रकारांतली गुंतवणूक, पोस्टातली गुंतवणूक, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, रिअल इस्टेट, सोनं इ. गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांचे फायदे-तोटे उदाहरणांसह ताटके सांगतात. तसंच आयुष्यातले टप्पे कोणते आणि कुठली गुंतवणूक कधी करावी याविषयी मार्गदर्शन करतात.

मुलांचं शिक्षण, आजारपण, घराची खरेदी, स्वत:ची हौस-मौज यांसारख्या कुंटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन कष्टाने कमावलेला आपला पैसा गुंतवण्याचे फायदेशीर मार्ग हे पुस्तक दाखवतं. म्हणूनच हे आहे… माझं कुटुंब, माझी गुंतवणूक !



175.00 Add to cart

उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा

व्यवसाय करण्यासाठी पैसा नव्हे, वृत्ती हवी!


[taxonomy_list name=”product_author” include=”507″]


आपल्या समाजात उद्योजकांविषयी एक प्रकारचं कुतूहल आणि अनेक प्रकारचे समज-गैरसमज असतात. उद्योगाशी निगडित अशा अनेक समजुतींचा तसंच तरुणांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणार्‍या घटनांचा ऊहापोह या पुस्तकात लेखकाने अतिशय रंजकपणे केला आहे.
केवळ पैशाचंच पाठबळ असल्यास यशस्वीपणे उद्योग करता येतो या जनमानसात सर्वसाधारणपणे असलेल्या समजुतीलाच हावरे यांनी छेद दिला आहे. भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो. मात्र व्यवसाय करण्यासाठी मुख्य भांडवल तुमच्यापाशी आवर्जून हवं असतं ते दुर्दम्य इच्छाशक्तीचं, आत्मविश्वासाचं व व्यावसायिक वृत्तीचं! हा मूलभूत मंत्र आत्मसात करण्यासाठी आणि पुढे प्रत्यक्षात व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी लागणार्‍या घटकांची चर्चा ते विस्तृतपणे पुस्तकातून करतात. उद्योगाची उभारणी कशी करावी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग, रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ कशी करावी असे महत्त्वाचे विषय त्यांनी यात हाताळले आहेत.

जो स्वत:च्या अनुभवातून शिकतो, तो हुशार माणूस समजला जातो पण जो इतरांच्या अनुभवातून शिकतो तो खरा चाणाक्ष माणूस. त्यामुळे नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणार्‍या तरुणांसाठी हे अनुभवाचे बोल अत्यंत उपयोगी पडतील.
‘उद्योजक हा राष्ट्राची संपत्ती निर्माण करणारा मुख्य घटक असतो’ असं मत हावरे आत्मविश्वासपूर्वक व्यक्त करतात. अनेक वर्षं यशस्वीपणे बांधकाम क्षेत्रातील उद्योगधुरा सांभाळणार्‍या हावरे यांचे अनुभवाचे बोल नवउद्योजकांसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरतील


195.00 Add to cart

मैत्री व्यावसायिकतेशी

‘प्रोफेशनल’ वृत्ती जोपासून विकास साधण्यासाठी अनुभवाचे बोल


[taxonomy_list name=”product_author” include=”506″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”562″]


सुप्रसिद्ध व्यावसायिक व MindTree या यशस्वी कंपनीचे प्रवर्तक सुब्रोतो बागची यांच्या गाजलेल्या ‘The PROFESSIONAL’ या पुस्तकाची मराठी आवृत्ती म्हणजे ‘मैत्री व्यावसायिकतेशी’! सुब्रोतो बागची यांच्या अंतर्मनाचा आविष्कार आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांवर आधारित त्यांचे विचार या पुस्तकात अंतर्भूत आहेत. केवळ व्यवसाय करणे आणि तो व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून करणे यात फरक आहे. यशस्वी होण्याच्या वृत्तीबरोबरच व्यावसायिक वृत्ती अंगी बाणावी लागते. व्यावसायिकता म्हणजे त्यात विशिष्ट पद्धती रूढ करणं आलं, सचोटी आली, भविष्याचा वेध घेणं आलं आणि त्यात विकास साधणंही आलं. तसंच उत्तम नियोजन करणं आणि कामाची शिस्त पाळणंही आलं. त्याचप्रमाणे काही मूल्य जोपासणही आलं. व्यावसायिकता म्हणजे केवळ प्रचंड नफा मिळवणं नव्हे, तर उच्च नीतिमूल्यांची जोपासना करून उत्तम नियोजनातून तो मिळविणं. सुब्रोतो बागची या पुस्तकात व्यावसायिकता कशी जोपासावी, हे कधी सूचकपणे तर कधी अनुभवांच्या आधारे सांगतात. सर्व व्यावसायिकांना, उद्योजकांना किंवा तो करू इच्छिणार्‍यांना, तसेच महत्त्वाकांक्षी नोकरदारांनाही हे पुस्तक मौलिक मार्गदर्शन करणारं ठरेल.


250.00 Add to cart

तुम्हीही व्हा धडाडीचे उद्योजक

प्रोफेशनल’ वृत्ती जोपासून विकास साधण्यासाठी अनुभवाचे बोल


[taxonomy_list name=”product_author” include=”506″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”775″]


उद्योजकतेचा विकास साधणे हा एक जागतिक प्राधान्यक्रमाचा विषय आहे. नावीन्य, कार्यक्षमता, उच्च कोटीचं कर्तृत्व हे आज यशस्वी उद्योजकासाठी परवलीचे शब्द ठरले आहेत. काहीतरी उद्योग करणं वेगळं आणि तो धडाडीने व कार्यकुशलतेने करणं वेगळं. यासाठी तुमच्यातील प्रेरणा महत्त्वाच्या ठरतात. हे पुस्तक तुम्हाला प्रेरणांचा स्रोत दाखवतं, तुमच्यातील प्रेरणांना जागं करतं आणि त्यांना दिशा दर्शवतं. उद्योगात किंवा व्यवसायात उच्च कार्यक्षमता कशी आणावी, त्यासाठी लागणारी कौशल्यं कोणती, धडाडीच्या वृत्तीचं महत्त्व किती हे सर्व या पुस्तकात अतिशय समर्पकपणे सांगितलं आहे. पुस्तकाचे लेखक सुब्रोतो बागची यांनी MindTree ही त्यांची कंपनी वयाच्या ४२व्या वर्षी सुरू केली. शून्यापासून सुरू केलेली ही कंपनी सहा वर्षांत त्यांनी उच्च स्थानावर पोचवली, ती धडाडी व कार्यक्षमता यांच्या बळावर! त्या अनुभवांतून साकार झालेलं बागची यांचं हे पुस्तक लहान व्यावसायिकांपासून मोठया उद्योजकांपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक ठरतं!


250.00 Add to cart

नावीन्यपूर्ण बदल घडवताना

११ भारतीय उद्योजकांनी अशक्य कोटीतल्या गोष्टी शक्य करून दाखवल्या… त्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रेरणादायी प्रवास…


[taxonomy_list name=”product_author” include=”566″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”776″]


दुसर्‍यांच्या उत्पादनाची हुबेहूब नक्कल करणं किंवा त्यात थोडे बदल करणं अशा मानसिकतेतून भारतीय उद्योजक आता बाहेर पडले आहेत. स्वत:ची नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणणार्‍या भारतीय उद्योजकांचा उद्योग-क्षितिजावर उदय होऊ लागला आहे. इतकंच नव्हे, तर जागतिक बाजारपेठा काबीज करण्यासाठी नावीन्यपूर्ण बदल घडवतानाही ते दिसत आहेत. भारतीय कंपन्या केवळ जागतिक मापदंडांची पूर्तता करत नाहीत, तर त्या आज स्वत:चे मापदंड निर्माण करू लागल्या आहेत. आज ‘इनोव्हेशन’ हा भारतीय उद्योगाचा परवलीचा शब्द ठरू पाहात आहे. अशक्य कोटीतील वाटाव्या अशा गोष्टी शक्य करून दाखवणार्‍या ११ भारतीय कंपन्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रवास या पुस्तकात तपशिलात दिला आहे. या उपक्रमांनी नावीन्यपूर्ण बदल घडवले आणि उद्योगजगतातील संदर्भ बदलून टाकले आहेत… त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख देणारे हे नावीन्यपूर्ण पुस्तक सर्वांना निश्चितच रोचक वाटेल, प्रेरणादायी वाटेल… ‘‘नावीन्यपूर्ण बदलांमागील वैचारिक प्रक्रिया या पुस्तकात अधोरेखित केली आहे हेच या पुस्तकाचं वेगळेपण आहे. लेखनपद्धतही अभिनव असल्यामुळे ते मनाला अधिक भिडतं. हे लिखाण प्रेरक असून या आगळ्या वाटा अनेकांना अनुकरणीय वाटतील.’’ – रतन टाटा


325.00 Add to cart

सल्ले लाख मोलाचे

५५ नामवंतांचे जीवन बदलून टाकणारे मौलिक सल्ले


[taxonomy_list name=”product_author” include=”781″]


आयुष्यात अनेक माणसं भेटत असतात आणि त्यांच्याकडून कळत-नकळत मोलाचे सल्ले मिळत असतात. बरेचदा आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं, पण काही जण हे सल्ले किंवा उपदेश आवर्जून लक्षात ठेवून आचरणात आणतात, म्हणूनच ते यशस्वी आणि नामवंत होतात!
हे जाणूनच विज्ञान-तंत्रज्ञान, बँकिंग, अर्थ, मनोरंजन, जाहिरात, चित्रपट, वैद्यक, साहित्य आणि उद्योग-व्यवसाय यांसारख्या विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या ५५ नामवंतांना उपयुक्त ठरलेल्या बहुमोल सल्ल्यांचं आणि उपदेशांचं हे संकलन…
नामवंतांना उपयुक्त ठरलेल्या बहुमोल सल्ल्यांचं आणि उपदेशांचं हे संकलन…
…नातेसंबंध सुधारण्यासाठी, व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी आणि कार्यक्षेत्र निवडण्यासाठी हे सल्ले तुमच्यासाठी लाखमोलाचे ठरतील.
यातलं एखादं पान तुम्हाला तुमच्या समस्येकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देऊन मनोबलही वाढवेल… आणि पहा तुमचंही जीवन बदलून जाईल!



75.00 Add to cart

का चिंता करिशी

चिंतामुक्तीसाठीचा हमखास मार्ग


डॉ.राजेंद्र बर्वे


सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे तणाव, भीती, नैराश्य, चिंता, काळजी या समस्या घराघरात जाऊन पोचल्या आहेत.

आपल्या आयुष्याचा मोठा भाग अशा चिंतातुर भावनांनी व्यापलेला असला तरी, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ध्यायला हवी ती काळजी घेत नाही आणि समस्या वाढल्यावर मात्र हताश होऊन जातो.

ताणतणाव, मानसिक आजार याकडे डोळसपणे बघितल्यास अनेक समस्या वेळेत टाळता येऊ शकतात.

डॉ. राजेंद्र बर्वे गेली अनेक वर्ष मानसतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. चिंता आणि काळजी अशा विकारांवर मात करण्यासाठी त्यांनी अतिशय सहज सोप्या भाषेत आणि अभ्यासपूर्ण केलेलं मार्गदर्शन म्हणजेच हे पुस्तक.

या पुस्तकात मार्गदर्शन करताना डॉ. बर्वे स्वाध्याय, सराव आणि केस स्टडीज् या माध्यमांचाही वापर करतात तसंच वाचकाला पूर्णपणे वाचनप्रक्रियेत सामावून घेतात.

त्यामुळे वाचक ‘केवळ वाचलं आणि सोडून दिलं’ असं न करता पुस्तकात दिलेल्या कृतिसत्राद्वारे मनापासून सहभागी होतो आणि आपल्या संत्रस्त मनस्थितीतून सकारात्मकपणे बाहेर पडतो.

हे पुस्तक वाचा, सराव करा आणि मग तुम्ही स्वतःलाच विचाराल…
का चिंता करिशी ?

 

200.00 Add to cart

सभेत कसे बोलावे


[taxonomy_list name=”product_author” include=”451″]


महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यात श्री. माधव गडकरी यांची भाषणे गाजत आहेत. शिक्षण-संस्था, खासगी-संस्था, राजकीय संघटना आणि इतर संघटनांकडून माधव गडकरी यांना भाषणासाठी सतत बोलावण्यात येते. वयाच्या २१ व्या वर्षापासून श्री. गडकरी हे भाषण करीत आले आहेत. त्यामुळे भाषण-शास्त्राचा त्यांचा दीर्घानुभव आहे. या दीर्घानुभवाच्या साहाय्याने ‘सभेत कसे बोलावे?’
हे पुस्तक सर्वांना उपयोगी पडेल असे म्हटल्यास वावगे होणार नाही. विविध प्रसंगी कसे बोलावे हे अनेक नामवंतांची भाषणे या पुस्तकात देऊन त्यांनी पटविले आहे. भाषण करताना येणार्‍या अडचणी, त्यातील दोष यांचे त्यांनी उत्तम तऱ्हेने विवेचन केलेले आहे. थोडक्यात म्हणजे शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना, त्याचप्रमाणे वेगवेगळया वर्तुळात कार्य करणार्‍या व्यक्तींना व सभेत समाजसेवकांना समयोचित कसे बोलावे हे श्री. माधव गडकरी यांनी आपल्या प्रतिभाशाली लेखणीतून या पुस्तकात सांगितले आहे. त्यादृष्टीने हे पुस्तक भाषणे करणार्‍यांना, ठरविणाऱ्यांना व करू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल याची खात्री वाटते.


100.00 Add to cart
1 2