शेअर बाजार समजून घेताना
डॉ. अनिल लांबा हे विख्यात चार्टर्ड अकाउंटंट असून लेखक, कॉर्पोरेट ट्रेनर म्हणूनही सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी वाणिज्य व कायदा या विषयात पदवी संपादन केली असून कर विषयात डॉक्टरेटही मिळवली आहे. ते गेली अनेक वर्षं जगभरात अर्थविषयक प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेत असून भारत, अमेरिका, युरोप, मध्य पूर्वेकडील देश आणि अति पूर्वेकडील देश येथील २००० पेक्षा अधिक मोठ्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या त्यांच्याकडून अर्थविषयिक सल्ला घेत असतात. पुण्यातील `लॅमकॉन स्कूल ऑफ मॅनेजमेंट'चे ते संस्थापक संचालक आहेत.
आपल्या पुस्तकांमधून त्यांनी अर्थविषयक बाबींची अत्यंत सोप्या व सहज शैलीत वाचकांना ओळख करून दिली आहे, तसंच या संकल्पनांमधलं मर्मही उलगडून दाखवलं आहे. त्यामुळे त्यांची पुस्तकं वाचकप्रिय झाली आहेत.
अनुवाद:
कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकौटंट' असणारे वीरेंद्र ताटके फायनान्स आणि गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कॉरिट क्षेत्रात वरिष्ठ पदावर तसंच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. गेली पंधरा वर्षं ते विविध वृत्तपत्रांसाठी अर्थ आणि गुंतवणुकीविषयी सातत्याने लेखन करत आहेत. त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून अर्थविषयक कार्यक्रमही सादर केले आहेत. त्याचप्रमाणे वित्त व्यवस्थापन, शेअरबाजार, म्युच्युअल फंड या विषयांवर पुस्तकंही लिहिली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध होत असतात. म्युच्युअल फंड या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली असून सध्या ते एका नामवंत एमबीए महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
चार्टर्ड अकाउंटंट, विख्यात लेखक आणि अर्थविषयक सल्लागार अनिल लांबा यांनी या पुस्तकात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गोष्टींचं सहज-सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे.
या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?…
१. शेअर्सची खरेदी-विक्री कशी आणि कधी करायची?
२. रेशो अॅनालिसिस म्हणजे काय?
३. कंपन्यांचा ताळेबंद (Balance sheet) कसा पाहायचा?
४. ट्रेडिंग करताना काय काळजी घ्यायची?
५. जास्तीत जास्त परतावा (Returns) कसा मिळवायचा?
६. ईपीएस (Earning per share) म्हणजे काय?
याशिवाय शेअर बाजारातल्या संकल्पनांची उपयुक्त माहिती आणि बरंच काही…
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक… फ्लर्टिंग विथ स्टॉक्स!