456 | 978-93-89458-36-7 | Flirting With Stocks | फ्लर्टिंग विथ स्टॉक | शेअर बाजार समजून घेताना | Dr. Anil Lamba | डॉ. अनिल लांबा | Virendra Tatake | विरेंद्र ताटके | चार्टर्ड अकाउंटंट, विख्यात लेखक आणि अर्थविषयक सल्लागार अनिल लांबा यांनी या पुस्तकात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गोष्टींचं सहज-सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे.
या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?… १. शेअर्सची खरेदी-विक्री कशी आणि कधी करायची? २. रेशो अॅनालिसिस म्हणजे काय? ३. कंपन्यांचा ताळेबंद (Balance sheet) कसा पाहायचा? ४. ट्रेिंडग करताना काय काळजी घ्यायची? ५. जास्तीत जास्त परतावा (Returns) कसा मिळवायचा? ६. ईपीएस (Earning per share) म्हणजे काय? याशिवाय शेअर बाजारातल्या संकल्पनांची उपयुक्त माहिती आणि बरंच काही… शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक… फ्लर्टींग विथ स्टॉक! |
हार्डबाउंड | book | Rohan Prakashan | Marathi | 170 | Business | व्यवसाय | Informative | माहितीपर | 360 | FlirtingWithStocksCover.jpg | FlirtingStocksBC.jpg |
केवळ आयटीतच
भारतातील एका ‘बूमिंग’उद्योगाचा विलक्षण प्रवास
आयटी किंवा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बीपीओ किंवा कॉल सेंटर हे शब्द आज आपल्या परिचयाचे झाले आहेत. मात्र आयटी म्हणजे नक्की काय? भारतात या क्षेत्राची कशी सुरुवात झाली? किंवा येथे नक्की कशा स्वरूपाचं काम असतं याची मात्र आपल्याला तितकीशी कल्पना नसते. अतुल कहाते हे आयटी उद्योगात अनेक वर्षं उच्च पदावर कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून आणि निरीक्षणातून भारतातील आयटीचा उगम, वाढ-विस्तार व एकूणच या क्षेत्राची वाटचाल सांगणारं हे पुस्तक लिहिलं आहे ते आयटीबद्दलचं सर्वसाधारण कुतूहल शमवण्यासाठी!
आयटी उद्योगाने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन ओळख, आत्मविश्वास दिला. येथील गलेलठ्ठ पगारांमुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना जन्मात बघितली नसतील अशी स्वप्नं साकार करण्याची ताकद मिळाली! नोकरीनिमित्त अनेक भारतीय मोठया प्रमाणात परदेशात जाऊ शकले. लहान गावा-शहरांमधली मुलं-मुली सिंगापूरपासून कॅलिफोर्नियापर्यंत वरचेवर जाऊ लागली. या उद्योगामुळे प्रकर्षाने तरुण वर्गात सुबत्ता दिसू लागली…
मात्र याचबरोबर त्याचे काही सामाजिक व पर्यावरणीय दुष्परिणामही दिसू लागले आहेत. उदा. जीवनशैलीतले बदल, घटस्फोटांचं वाढतं प्रमाण, वाहनांच्या संख्येत व प्रदूषणात झालेली मोठी वाढ आणि दैनंदिन जीवनामध्ये भाजीपाल्यापासून ते घरांच्या किमतींपर्यंत सगळया गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाणं…
अशा या ‘बूमिंग’ आयटी उद्योगाचा इतिहास, प्रवास व विस्तार उलगडून दाखवणारं पुस्तक…
केवळ ‘आयटी’तच…!
Reviews
There are no reviews yet.