120.00

सुसंवाद सहकार्‍यांशी

नोकरीत बढतीसाठी व यशस्वी व्यवसायासाठी


एम. के. रुस्तुमजी हे टेल्को कंपनीचे अत्यंत वरिष्ठ व्यवस्थापक होते. व्यवस्थापनशास्त्रावर त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांना जगभर प्रचंड मागणी आहे. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, स्पेन, जपान, ब्राझिल, झेकोस्लाव्हाकिया व इस्राइल या देशांमध्ये त्यांची पुस्तकं लोकप्रिय झाली आहेत. त्यांच्या पश्चातही अजूनही त्यांची पुस्तकं विक्रीचे नवेनवे विक्रम करत आहेत. कारण व्यवस्थापन क्षेत्राचा अनुभव असलेल्या अनुभवी माणसांनी क्वचित व्यवस्थापनावरील पुस्तकं लिहिली. 'उद्योग व्यवसायातील मानवीसंबंध' या विषयांवर 'फर्स्ट ड्यूक ऑफ एडिनबर्ग्स कॉन्फरन्स’मध्ये रुस्तुमजींनी सहभाग घेतला होता. त्यानंतर भारत सरकारने त्यांची 'नवल टाटा कमिटी ऑन शेअरिंग द गेन्स ऑफ प्रॉडक्टिव्हिटी' या समितीवर मालकांचे प्रतिनिधी म्हणून खास नेमणूक केलेली होती. त्याशिवाय अत्यंत महत्त्वाच्या अशा व्यवस्थापन क्षेत्रातील संस्थांमध्ये त्यांचा सल्लागार म्हणून सहभाग होता.
सी. नॉर्थकोट पार्किन्सन यांनी लिहिलेली पुस्तकं जगप्रसिद्ध असून ती प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत. सेंट पीटर स्कूल, यॉर्क व इम्यॅन्युअल कॉलेज, केंब्रिज इथून शिक्षण पूर्ण केल्यावर ते त्याच कॉलेजचे 'फेलो' झाले. तेव्हा त्यांचे वय अवघे २४ होते. इलिऑनिस, लिव्हरपूल, हॉर्वर्ड आणि मलाया या विश्वविद्यालयांमधून त्यांनी अध्यापन केलेलं असून त्यांची अनेक पुस्तके जगभर अक्षरश: लाखांमध्ये खपलेली आहेत.

अनुवाद : 


या मनोहारी पुस्तकात केलेलं मार्गदर्शन, सिध्दीप्रेरणा, सुसंवाद, सौजन्य आणि सहभाग या चतु:सूत्रीचं बारीकसारीक गोष्टीत कसं अवलंबन करावं याचे खर्‍याखुर्‍या उदाहरणांसकट केलेलं चित्रण सर्वांना अंतर्मुख करावयास लावतं. ‘मानवी संबंध व परिणामकारक व्यवस्थापन’ ह्या किचकट विषयाचं गुपित ह्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर खुमासदार चित्रांनी अन अत्यंत उपयुक्त सूचनांनी अगदी सहजपणे उकलले आहे,सोपं करून सांगितले आहे. व्यावसायिकांसाठी व सर्वसामान्य माणसांसाठीही अशा पुस्तकाची गरज आहे.


Translation of “Business is People” a bestseller. Guides an individual to better relations with associates.


 

Reading Time: 1 Minutes (124 words)

2 978-81-86184-02-8 Susanvad Sahakaryanshi सुसंवाद सहकार्‍यांशी नोकरीत बढतीसाठी व यशस्वी व्यवसायासाठी M. K. Rustamji C. Northcote Parkinson एम.के.रूस्तमजी सी. नॉर्थकोट पार्किन्सन Avinash Bhome अविनाश भोमे या मनोहारी पुस्तकात केलेलं मार्गदर्शन, सिध्दीप्रेरणा, सुसंवाद, सौजन्य आणि सहभाग या चतु:सूत्रीचं बारीकसारीक गोष्टीत कसं अवलंबन करावं याचे खर्‍याखुर्‍या उदाहरणांसकट केलेलं चित्रण सर्वांना अंतर्मुख करावयास लावतं.
”मानवी संबंध व परिणामकारक व्यवस्थापन” ह्या किचकट विषयाचं गुपित ह्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर खुमासदार चित्रांनी अन अत्यंत उपयुक्त सूचनांनी अगदी सहजपणे उकलले आहे,सोपं करून सांगितले आहे.
व्यावसायिकांसाठी व सर्वसामान्य माणसांसाठीही अशा पुस्तकाची गरज आहे.
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 144 21.6 14 0.8 140
Translation of “Business is People” a bestseller. Guides an individual to better relations with associates
Self – Help व्यक्तिमत्व विकास Business व्यवसाय 120 Susanvad Sahakaryanshi.jpg SusavadSahakaryanshiBc.jpg
Weight 140 g
Dimensions 21.6 × 14 × 0.8 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.