वा! म्हणताना

संगीत, साहित्य, वैद्यकीय क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये लीलया मुशाफिरी करणारं तरुण व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. आशुतोष जावडेकर यांची ख्याती आहे. त्यांनी दंतवैद्यकाची पदवी घेतलेली असली तरी त्यासोबतच त्यांनी इंग्रजी साहित्यात प्रथम क्रमांकासह एम.ए केलं आहे. डिस्कोर्स समीक्षा व स्थलांतर वाङ्मय हे प्रधान अभ्यासविषय असून त्यावरील त्यांचा इंग्रजी शोधनिबंध प्रसिद्ध आहे. संगीतविषयक पुस्तकांबरोबर त्यांनी कादंबरीलेखन केलं असून या पुस्तकांना महत्त्वाचे पुरस्कार लाभले आहेत. याशिवाय त्यांनी संगीतकार व गायक म्हणून तीन संगीत व्हिडिओंची निर्मिती केली आहे. मुंबई विद्यापीठ, मदुरा कॉलेज (मदुराई), आयआयएएस (सिमला) व शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) इत्यादी ठिकाणी इंग्रजीमध्ये साहित्य विषयावर प्रमुख.

‘‘अनेकदा जे समीक्षकीय लेखन समोर येतं ते तांत्रिक, कोरडं आणि संज्ञांच्या जंजाळात अडकलेलं असं असतं. शास्त्रीय लेखन हे नेहमीच तांत्रिक असतं. ते ती विद्याशाखा सोडून पटकन सगळ्यांना कळेल किंवा कळावं अशी अपेक्षाही काहीशी अवास्तव असते. भाषाशास्त्रीय समीक्षा ही तशी असते. त्यात काही मुळात चूक आहे असं नाही. चुकतं हे की, अशी समीक्षा लिहिणं आणि वाचणं हे अभ्यासाचं सोडून साहित्य-व्यासंग मिरवण्याचं ठिकाण बनतं. मग उगाच अस्तित्ववाद वगैरे शब्द गप्पांमध्ये घुसले-घुसवले जातात. त्या शब्दांचा किंवा संकल्पनांचा काही दोष नसतो. ते शब्द आढ्यतेने वापरणाऱ्या लेखकांमुळे सर्वसामान्य वाचकांपासून अपरिचित राहतात. प्रत्येक भाषेत मोजके पण चांगले, उमदे समीक्षक असतात ज्यांची भाषा संज्ञायुक्त असली तरी शब्दबंबाळ नसते. ती वाचकाला परकं करत नाही, खुजं ठरवत नाही… `वा!’ म्हणताना हे पुस्तक या धारेवर तर आहेच, पण त्यापुढे जाऊन मी म्हणेन की, माहितीच्या विस्फोटाच्या काळात मला वाचक हा नुसता पॅसिव्ह भागीदार नव्हे, तर सह-सर्जकही वाटतो. समीक्षालेखन करताना तुम्ही वाचक हे मित्र-सुहृद बनून माझ्या डोळ्यांपुढे येत असता…’

– डॉ. आशुतोष जावडेकर

साहित्याचा मनापासून आस्वाद घेणारा आणि तो घेताना तुम्हालाही ‘वा!’ अशी दाद द्यायला लावणारा समीक्षा-लेखसंग्रह `वा!’ म्हणताना…


250.00 Add to cart

रहें ना रहें हम

चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ बहाल करणा-या संगीतकारांची वैशिष्टयं आणि त्यांच्या अजरामर गाण्यातील सौंदर्यस्थळं…


पं. गजाननबुवा जोशी, पं. एस.के. अभ्यंकर, पं. मधुकर जोशी, डॉ. आशा पारसनीस जोशी यांच्याकडे प्रा. डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण झालं असून त्यांनी मानसशास्त्र या विषयात पदवी (विशेष प्रावीण्यासहित) प्राप्त केली आहे. त्यानंतर संगीत विषयात एम.ए. करून त्या विद्यापीठात प्रथम आल्या. त्यांनी ‘हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार’ या विषयात एस.एन.डी.टी. विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त केली असून हिंदी चित्रपट गीतांची वैशिष्ट्यं सांगत, त्यांतील बारकावे उलगडून दाखवत गायनाचे सादर केलेले वैशिष्ट्यपूर्ण असे हजारो जाहीर कार्यक्रम त्यांनी केले आहेत. हिंदी चित्रपट गीतांवरचं त्यांचं लेखन केवळ गाण्याच्या चाली, शब्द एवढ्यापुरतं मर्यादित नसतं. तर त्यातलं ऑक्रेस्ट्रायझेशन, त्यातली वाद्यं, त्यांची वैशिष्ट्यं तसंच ते गाणं रचणाऱ्या संगीतकारांची वैशिष्ट्यं हे त्या नेमकेपणाने उलगडून सांगतात आणि त्याकडे पाहण्याचा एक सखोल दृष्टिकोन देतात. त्या संगीताबरोबरच विविध विषयावरील पुस्तकांचं वाचन करत असल्यामुळे त्याचे संदर्भ त्यांच्या लेखनात लीलया येतात. सध्या त्या मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीचा अर्थात चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ…

या कालखंडावर आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरणारे संगीतकार कोणते?
प्रत्येक संगीतकाराचा बाज वेगळा कसा? त्याची वैशिष्ट्यं कोणती?
त्यांची अजरामर गाणी कोणती?
त्या गाण्यांच्या चालींची, ऑर्केस्ट्रेशनची वैशिष्ट्यं कोणती?
त्यातील हरकतींचं, केलेल्या प्रयोगांचं महत्त्व काय?
त्यांतील कोणत्या जागा म्हणजे त्या गाण्यांची सौंदर्यस्थळं म्हणता येतील?
एकंदर सांगायचं तर, ही गाणी आपल्यावर
४०-५०-६० वर्षं कसं काय गारूड करू शकतात
हे नेमकेपणे सांगून, रसिकतेने केलेलं विश्लेषण म्हणजेच…
हिंदी चित्रपट संगीताच्या मर्मज्ञ
मृदुला दाढे-जोशी लिखित एक आस्वादात्मक पुस्तक
रहें ना रहें हम…



350.00 Add to cart

यांनी केलं विनोदविश्व समृद्ध

मराठी विनोदी साहित्यावर आस्वादात्मक दृष्टिक्षेप 


प्रदीप कुलकर्णी यांनी वरंगळ येथील रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजातून १९७४ साली धातुशास्त्रात इंजिनिअरिंगची पदवीमध्ये विशेष प्रावीण्यासह मिळवल्यानंतर, पुढची दहा वर्षं ‘मुकंद स्टील' या कंपनीत काम केले आहे. त्यानंतर १९८४ साली त्यांनी सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि पुढील २४ वर्षं या क्षेत्रातील विविध नामवंत कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केलं आहे. कामाच्या निमित्ताने त्यांना जगभर प्रवास करण्याची, तसेच अनेक देशांत काम करण्याची संधी मिळाली आहे. साहित्य, संगीत, विनोद आणि विज्ञान यांची त्यांना लहानपणापासून आवड असून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चि. वि. जोशी, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, गंगाधर गाडगीळ, दत्तू बांदेकर, मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले या बारा विनोदवीरांची मैफल जमवून विनोदी लेखनाच्या वाचनाचा आस्वाद घेता घेता आपली जाण समृद्ध करणारं व त्यात भर टाकणारं पुस्तक…


240.00 Read more