गॅजेट्सच्या दुनियेत! – लेखमालिकेविषयी….

गॅजेट्सच्या दुनियेत! सध्या आपलं आयुष्य तंत्रज्ञानान वेढलेलं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंख्य वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण तंत्रज्ञानाचा वापर करतो. एआय, व्हीआर, रोबोटिक्स यांचा वापर वाढला तर त्याचा फायदा ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल हा अंदाज गेल्या काही वर्षात अनेक तंत्रज्ञांनी वर्तवला होता. याच तंत्रज्ञांनावर आधारित काही कल्पनेच्या पलिकडची हटके गॅजेटस आपण जाणून घेणार आहोत, 'गॅजेट्सच्या [...]

गॅजेट्सच्या दुनियेत! – चष्मा लावा गाणी ऐका..

रस्त्यावर चालताना, बाईकवर अथवा गाडी चालवताना मंद आवाजात गाणी ऐकायला अनेकांना आवडतं. मोठ्या आवाजात गाणी लावली तर बऱ्याच वेळा इतर लोकांना त्याचा त्रास होतो. यावर हेडफोनचा पर्याय असतो, मात्र त्याने काहीवेळा कानाला त्रास होऊ शकतो. आपण डोळ्यांवर लावणाऱ्या चष्म्यातून किंवा गॉगल्समधूनच जर आपल्याला ऐकू यायला लागलं तर? अशाच काही स्मार्ट सनग्लासेसचा सध्या ट्रेंड सुरु आहे. [...]

गॅजेट्सच्या दुनियेत! – ‘स्मार्ट’ बेड

शांत झोप हवी असेल, तर आपला बेडसुद्धा तितकाच चांगला असावा लागतो. कधीतरी आपल्या झोपण्याच्या अंथरुणात बदल झाला किंवा काही गडबड झाली तर त्याचा परिणाम आपल्या झोपेवरसुद्धा लगेच होतो. उत्तम आरोग्यासाठी आपली झोपसुद्धा चांगली असणं आवश्यक आहे. यासाठीच सध्या स्मार्ट बेडचा ट्रेंड मार्केटमध्ये रुजू होत आहे…. हो, तुम्ही बरोबर वाचलंत! स्मार्टफोन आणि इतर स्मार्ट डिव्हायसेसच्या यादीमध्ये [...]

गॅजेट्सच्या दुनियेत! – ‘स्मार्ट’ बर्ड फिडर

हल्ली बऱ्याच लोकांना आपल्या खिडकीमध्ये पक्ष्यांना काहीतरी खाऊ घालायला आवडतं. घराच्या बाहेर येणारे पक्षी बघून सगळ्यांनाच आनंद होतो. पोपट, खार, चिमण्या यांचा किलबिलाट ऐकला, की वेळसुद्धा छान जातो. समजा घराजवळ येणारे हे पक्षी काही न करता टिपण्याची आपल्याला संधी जर मिळाली तर? 'बर्ड बडी स्मार्ट फिडर'मुळे ही संधी आता सहज उपलब्ध होत आहे. घराच्या खिडकीत [...]

गॅजेट्सच्या दुनियेत! – ‘स्मार्ट’ बॅट

भारतातलं क्रिकेटप्रेम काही नवीन नाही, आत्ताच पार पडलेल्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आपण हे क्रिकेटप्रेम अनुभवलं, आपल्याकडे घराघरात क्रिकेटचे चाहते बघायला मिळतात. इथल्या गल्ल्यांमध्ये अनेक सचिन आणि धोनी तयार होत असतात, सगळ्यांनाच मोठ्या स्टेडियमचा मार्ग गवसतो असं नाही… पण घरातल्या घरात जर प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव आला तर? भर मैदानातला अनुभव आता घरात टीव्हीसमोर खेळून घेता येणार [...]

गॅजेट्सच्या दुनियेत! – ‘स्मार्ट’ रोबो

घराच्या साफसफाईसाठी नेहमी आपण कामवाल्या मावशी शोधत असतो. सणासुदीच्या दिवसात तर घराची साफसफाई करण्यासाठी तासनतास स्वच्छता करावी लागते. घराची साफसफाई आपोआपच झाली तर? कल्पना शक्य वाटत नाही ना? मात्र हे शक्य आहे नव्याने मार्केटमध्ये आलेल्या रोबो क्लिनर्समुळे. स्वयंचलित तंत्रज्ञानाने संपूर्ण घराची साफसफाई अगदी काही मिनिटांत करणे यामुळे शक्य होणार आहे. घराची स्वच्छता करण्यासाठी आपण बऱ्याचदा [...]

नॉट शंभर, तरी एक नंबर – ९८ > १००

सचिन तेंडुलकर या नावासह क्रिकेटमधल्या विक्रमांची चर्चा होते. शतकांची चर्चा होते आणि नर्व्हस नाईन्टीजची सुद्धा चर्चा होते. सचिन नव्वदीत बाद झाला त्या खेळी लक्षात राहू नयेत असं प्रत्येकच भारतीय चाहत्याला वाटतं. मात्र आपला लाडका सच्चू नव्वदीत बाद झाला होता, अशी एक खेळी आहे, जी कधीच विस्मरणात जात नाही. पाकिस्तानचा सलामीवीर सईद अन्वरच्या शतकामधली हवा काढून [...]

नॉट शंभर, तरी एक नंबर – शतकाआधी अन् शतकानंतर!

वन-डे क्रिकेट फॉरमॅटमध्ये पहिल्यांदाच ४०० हून अधिक धावा होतात काय आणि एक इतिहास रचला गेलेला असताना, पुढच्या काही तासांत त्याहून १ चेंडू कमी खेळून ४ धावा अधिक करत दुसरा संघ सामना खिशात घालतो काय… एव्हाना तुम्हाला कळलंच असेल, मी कुठल्या सामन्याबद्दल बोलतोय. कारण, निस्सीम क्रिकेट भक्त किंवा क्रिकेटवेडे असणाऱ्यांना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा तो सामना [...]

नॉट शंभर, तरी एक नंबर – खेळी कल्पितापलीकडची!

वीरेंद्र सेहवाग म्हणजेच आपल्या लाडक्या वीरूविषयी बोलायचं तर त्याच्या बेधडक, बिनधास्त वृत्तीची सगळ्यात आधी चर्चा होते. त्याने ठोकलेल्या २ आणि हुकलेल्या एका त्रिशतकाशिवाय ही चर्चा थांबू शकत नाही, हे वेगळं सांगायला नकोच! या बिनधास्तपणामुळेच वीरू काहीवेळा शतकापासून कोसो दूर राहिलाय. वीरूच्या अशाच एका खेळीची ही गोष्ट! त्याचं शतक हुकलं, पण तरीही त्याच्या खेळीचं महत्त्व कुठल्याही [...]

नॉट शंभर, तरी एक नंबर – सुपर्ब नाईन्टीज!

भारतानं दुसऱ्यांदा विश्वचषक उचलला तो १२ वर्षांपूर्वी… अंतिम सामन्यात लंकेकडून महेला जयवर्धने शतकवीर ठरला. भारताकडून मात्र एकही शतक झळकलं नाही. दोन मॅच विनिंग इनिंग मात्र पाहायला मिळाल्या. सचिन-सेहवाग लवकर बाद झाल्यावर गंभीरनं सावरलेला डाव आणि मग युवीच्या साथीनं माहीनं दिलेला फिनिशिंग टच; दोन्ही खेळींचं महत्त्व तेवढंच आहे. माझं वैयक्तिक मत विचाराल, तर सामनावीर गंभीर असायला [...]
1 2 27