अयोध्या ते वाराणसी
भाजपच्या प्रवासाची आँखों देखी हकीगत
प्रकाश आकोलकर
भाजपच्या वाटचालीचा समग्रपणे मागोवा घेणारं मराठीतलं महत्वाचं पुस्तक… अयोध्या ते वाराणसी !
भाजपच्या प्रवासाची आँखों देखी हकीगत
प्रकाश आकोलकर
भाजपच्या वाटचालीचा समग्रपणे मागोवा घेणारं मराठीतलं महत्वाचं पुस्तक… अयोध्या ते वाराणसी !
नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंनी भारतीय व पाकिस्तानी सैन्यासोबत केलेल्या सहप्रवासाची कहाणी
हॅपीमॉन जेकब
अनुवाद:मिलिंद चंपानेरकर
हॅपीमॉन जेकब यांनी २०१८मध्ये भारत पाकिस्तान या दोन देशांमधील ‘ताबा नियंत्रण रेषे’च्या अर्थात ‘एलओसी’च्या दोन्ही बाजूंनी प्रवास केला. भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यदलासोबत त्यांनी केलेला सहप्रवास, दोन्हीकडील अनेक निवृत्त व सेवेतील लष्करी अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चा, आणि सीमाभागातील ‘शस्त्रसंधी उल्लंघन’-ग्रस्त लोकांशी साधलेला संवाद यांबद्दलचे तपशील हॅपीमॉन यांनी या पुस्तकातून दिले आहेत.
दोन देशांमध्ये लोकसहभागाने शांतता प्रस्थापित व्हावी हा हॅपीमॉन यांचा मूळ उद्देश आहे. पूर्वग्रहांचे अडथळे पार करून दोन्ही देशांच्या लष्करासह सर्व प्रकारच्या लोकांशी संवाद साधण्याचं अवघड असं काम गेली कित्येक वर्षं ते करत आहेत, त्याचप्रमाणे अनेक ‘ट्रॅक टू’ संवादांतील सहभागाद्वारे शांतता प्रयत्नाच्या प्रक्रियेत सातत्याने सहभागी राहिले आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकिर्त अभ्यासक आहेत.
दीर्घ अनुभव आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन यांतून नवी अंतर्दृष्टी देणारं पुस्तक द एलओसी.
३ बहुमोल पुस्तकांचा संच
यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्राच्या लोकप्रिय सुपुत्राचा परिचय, त्यांनी केलेल्या राजकीय क्षेत्रातील योगदानाची माहिती आजच्या पिढीला विशेषत: तरुणांना व्हावी या दृष्टीने यशवंतरावांच्याच लेखणीतून साकार झालेली तीन पुस्तकं- ‘कृष्णाकांठ’, ‘भूमिका’ व ‘ॠणानुबंध’ रोहन प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित करण्यात आली आहेत.
कृष्णाकांठ म्हणजे यशवंतरावांचा बालपणापासून त्यांच्या राजकीय जडणघडणीपर्यंतचा लक्षवेधक प्रवास! त्यांचं बालपण, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग, पहिला तुरुंगवास, त्यांचं वकिलीचं शिक्षण, वेणूताईंबरोबरची विवाहगाठ आणि राजकारणातील त्यांचा प्रवेश अशा रोमांचक आणि प्रेरणादायी अनुभवांचा पट यशवंतराव त्यांच्या सहज-सुंदर शैलीतून कृष्णाकांठद्वारे उलगडतात.
‘भूमिका’ हे पुस्तक म्हणजे यशवंतरावांच्या कारकिर्दीचं पुढचं पर्व म्हणता येईल. यशवंतरावांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीचे विचार या पुस्तकातील विविध लेखांतून वाचायला मिळतात.
यशवंतरावांचा चिंतनाचा प्रमुख विषय जरी राजकारण हा असला तरी गतकाळाकडे वळून बघताना वैयक्तिक जीवनातील काही आठवणी, व्यक्ती व प्रसंग त्यांच्या मनात घर करून राहिले होते. काही जवळची माणसं, स्थळं, भावना व विचार यांच्याशी यशवंतरावांचा एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्या साऱ्याचं ओघवतं शब्दांकन म्हणजे ‘ऋणानुबंध’ हे पुस्तक!
एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष
डॉ. तरु जिंदल
अनुवाद : रमा हर्डीकर-सखदेव
प्रसूती कक्षाच्या आत बसलेली कुत्री, शेजारीच पसरलेला बायो-मेडिकल कचऱ्याचा ढीग, दुर्गंधी पसरवणारं स्वच्छतागृह, बाळंत स्त्रियांना टाके घालणाऱ्या तिथल्याच झाडूवाल्या, स्टाफरुममध्ये एकमेकींच्या हातांना मेंदी लावणाऱ्या लेडी डॉक्टर्स…
हे दृश्य होतं बिहारमधल्या मोतिहारी जिल्हा रुग्णालयातलं आणि दृश्य बघत होती यात बदल घडवू पाहणारी प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. तरु जिंदल !
भ्रष्ट व्यवस्था, निष्क्रिय डॉक्टर्स, कुपोषणासारख्या समस्या अशा अनेक आघाड्यांवर लढत देऊन अविश्वसनीय बदल घडवून आणणाऱ्या एका तरुण डॉक्टरची प्रेरणादायी संघर्षकथा… हां, ये मुमकिन है ।
परित्यक्ता आंदोलनाचा वेध आणि स्त्री-पुरुष समतेचा शोध
अॅड. निशा शिवूरकर
नवर्याने सोडलेल्या बायकांचा प्रश्न आपल्या समाजात खूप जुना आहे. अगदी पुराणकाळापासून सीता, अहिल्या यांसारख्या परित्यक्तांची उदाहरणं आपल्या परिचयाची आहेत. आजही आपल्या समाजात परित्यक्तांसाठी `टाकलेली’, `सोडलेली’, `बैठीली’ असे अत्यंत अपमानकारक शब्द सहजपणे वापरले जातात.
घटस्फोट न देता-घेता इच्छेविरुद्ध हाकललेली विवाहित स्त्री म्हणजे `परित्यक्ता’. `ज्याची-त्याची वैयक्तिक किंवा कौटुंबिक बाब’ असं म्हणून टाळला जाणारा हा प्रश्न वास्तविक एक गंभीर सामाजिक समस्या आहे. अलीकडील काळात हा प्रश्न ऐरणीवर आणला तो समता आंदोलनाने. या आंदोलनाच्या माध्यमातून स्त्रियांच्या समस्यांसाठी दिलेल्या लढ्यांचा विविधांगी आढावा या पुस्तकात घेतला आहे. त्याशिवाय परित्यक्तांच्या बोलक्या कहाण्या, परित्यक्ता होण्यामागची कारणं, स्त्री-पुरुष समानतेसाठी आवश्यक असे पोषक विचार आणि रचनात्मक व संघर्षात्मक कार्यामधून टिपलेल्या नोंदी या सर्वाचा लेखाजोखा या पुस्तकात वाचायला मिळेल.
पुस्तकाच्या लेखिका अॅड. निशा शिवूरकर या हाडाच्या कार्यकर्त्या असून त्यांनी या प्रश्नावर गेली अनेक वर्षं अनेक स्तरांवर झपाटल्यागत काम केलं आहे. या प्रश्नाची धग जवळून पाहिल्यामुळे त्यांच्या लिखाणात व्यापक असा सहानुभाव आहे. माणूस म्हणून आपल्या जाणिवा रुंदावणारं हे पुस्तक शिवूरकरांनी ओघवत्या आणि थेट शैलीमध्ये लिहिलं आहे.
सामाजिक भान देणारा एक अभ्यासपूर्ण दस्तऐवज… अर्थात लढा `टाकलेल्या’ स्त्रियांचा
पारधी समाजातली मी… माझी ही ज्वलंत जिंदगानी
सुनिता भोसले
प्रशांत रुपवते
‘विंचवाचं तेल’ म्हणजे ‘गुन्हेगारी जमाती’विरुद्ध वापरलं जाणारं जहाल अस्त्र. बाहेर याला ‘सूर्यनारायण तेल’ म्हणूनही ओळखतात. पोलीस खातं आरोपीने केलेले, न केलेले गुन्हे कबूल करावेत यासाठी ‘थर्ड डिग्री’मध्ये या तेलाचा वापर करतं.
आरोपीच्या लिंगाला हे तेल लावलं जातं. त्यामुळे लिंगाला सूज येते आणि प्रचंड दाह होतो. तुमची सृजनताच मारून टाकायची… उद्ध्वस्त करायची…
पोलीस डिपार्टमेंटचं हे विंचवाचं तेल या समाजव्यवस्थेने… या संस्कृतीने साऱ्या बहुजन समष्टींसाठी विशेषत: दलित भटक्या-विमुक्तांविरुद्ध नाना रूपात वापरलंय… तर याच समष्टीतील ही पोर… सुनीता भोसले… पारधी या ‘गुन्हेगार’ असा शिक्का बसलेल्या जमातीत तिचा जन्म झाला. पारधी असल्याचे भोग तिलाही सुटले नाहीत. पण पोर बहाद्दर… तिने या ‘विंचवावर’ जालीम उपाय शोधला… तो म्हणजे भारतीय संविधानाचा! जयभीमच्या नाऱ्याचा!
समस्त पारधी समष्टीत भिनलेलं विष उतरवण्याचा प्रयत्न वयाच्या अकराव्या वर्षापासून करणाऱ्या या कार्यकर्तीची ही ज्वलंत जिंदगानी… विंचवाचं तेल !
मी अनुभवलेलं एक अभूतपूर्व स्वप्न
आर. आरवमुदन
सहलेखक :गीता आरवमुदन
अनुवाद :प्रणव सखदेव
डॉ. विक्रम साराभाई यांनी ६०च्या दशकात काही तरुण इंजिनिअर्सना आणि शास्त्रज्ञांना आपल्या चमूत घेऊन एक बीज रोवलं होतं. त्यात रामभद्रन आरवमुदन हा पंचविशीचा तरुणही होता. त्यांच्यापुढे आव्हान ठेवलं होतं ते एक रॉकेट लाँचिंग केंद्र उभारण्याचं. आणि या तरुणांनी हे आव्हान स्वीकारून अशक्य वाटणारं हे काम शक्य करून दाखवलं होतं. न केवळ भारतीयांसाठी, तर जगासाठीही ते एक आश्चर्य होतं… आणि मग द्रष्टे शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचं स्वप्न साकारू लागलं – ‘भारतीय अंतराळ संशोधन केंद्रा’चं अर्थात ‘इस्रो’चं!
या पुस्तकात आरवमुदन ‘इस्रो’ कशी घडत गेली याचे तपशील देऊन त्यासाठी हातभार लागलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या कहाण्याही सांगतात. तसंच ‘इस्रो’ने राबवलेले प्रकल्प कसे साकारत गेले, त्यासाठी किती प्रयत्न करावे लागले, किती कष्ट घ्यावे लागले, किती अपयशं झेलावी लागली याची रोचक माहितीही ते देतात. रॉकेट लॉंचिंग स्टेशन ते ‘चांद्रयान’ आणि ‘मंगलयान’ यांसारखे गुंतागुंतीचे प्रकल्प राबवणाऱ्या ‘इस्रो’चा हा वटवृक्ष कसा उभारत गेला याचं रंजक कथन पुस्तकातून आपल्यापुढे येतं.
स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून या संस्थेसाठ़ी आपलं तन-मन-धन अर्पिणाऱ्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितलेली ही ‘मेड इन इंडिया’ कहाणी…इस्रो : झेप नव्या क्षितिजाकडे !
माझा प्रवास…
[taxonomy_list name=”product_author” include=”579″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”493″]
सत्यनारायण गंगाराम पित्रोदा… ओडिशा राज्यातल्या तितिलगड या छोट्याशा गावातला हा तरुण ‘स्वप्नभूमी’ अमेरिकेत गेला काय आणि झपाट्याने विस्तारत जाणार्या तंत्रज्ञानाच्या अवकाशात त्याच्या हाती सोनं लागलं काय! सत्यनारायणचा ‘सॅम’ झाला आणि जागतिक पेटंट्सच्या मालकीमुळे कोट्याधीश बनला…
पण गांधीवादी विचारांचा पगडा असलेल्या सॅमना मात्र आपलं ज्ञान आणि गाठीशी असलेला अनुभव आपल्या मायभूमीसाठी वापरावा अशी आस लागली. आणि म्हणून ते भारतामध्ये परतले, तेच एक ‘महाध्येय’ घेऊन… भारतात ‘टेलिकॉम-क्रांती’ घडवण्याचं ! तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचंही त्यांना समर्थ पाठबळ लाभलं… आणि मग केवळ एक रुपया वेतनावर अविरत कष्ट करणारे सॅम आणि देशाच्या कानाकोपर्यात दिसणारे ‘एसटीडी/पीसीओ बूथ’ म्हणजे एक अतूट समीकरणच होऊन गेलं…!
राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर मात्र सॅम यांचं जगच हादरलं. भ्रष्टाचाराचे आरोप, त्यातच आलेला हृदयविकाराचा झटका आणि आर्थिक कफल्लकता यांमुळे ते खोल गर्तेत बुडाले, पण तरी निराश न होता फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून उसळून वर आले…!
भारतीय टेलिकॉम-क्रांतीचं महास्वप्न प्रत्यक्षात आणणार्या सॅम पित्रोदा यांची ही प्रेरक आत्मकथा !
किशोरांसाठी मार्गदर्शक असा ३ पुस्तकांचा सप्रेम भेट संच
ए.पी.जे. अब्दुल कलाम
अनुवाद : प्रणव सखदेव
डॉ. कलामांनी जे विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं त्याचं तपशीलवार विवेचन या तीनही पुस्तकात वाचायला मिळेल. कलामांच्या विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत खास करून तरूण पिढीपर्यंत व्हावा म्हणून त्यांना वाहिलेली ही शब्दांजली…
अनोख्या देशांची, `हटके’ पर्यटनस्थळांची दिलखुलास मुशाफिरी..
जयप्रकाश प्रधान
जयप्रकाश प्रधान यांनी तब्बल ७३ देश पालथे घातले आहेत. या पुस्तकातून ते वाचकांना अद्भुत दुनियेची, वैशिष्ट्यपूर्ण अशा जरा हटके स्थळांची सफर घडवतात, आगळ्या-वेगळ्या अनुभवांची प्रचीती देतात. नेहमीच्याच पर्यटनस्थळांच्या प्रवासवर्णनापेक्षा ऑफबीट पर्यटनाचा रोमांचकारी आनंद देणारी ३ पुस्तकं…
ऑफबीट भटकंती सप्रेम भेट संच !
अनोख्या देशांची, `हटके’ पर्यटनस्थळांची दिलखुलास मुशाफिरी..
[taxonomy_list name=”product_author” include=”366″]
१) ऑफबीट भटकंती भाग -1 = रु.२५०
२) ऑफबीट भटकंती भाग -२ = रु.२५०
३) ऑफबीट भटकंती भाग -३ = रु.२५०
४) एन्ड ऑफ द वल्ड भटकंती = रु. २५०
५) जेपीज भटकंती टिप्स = १६० रु
रु. १,१६० चा संच ८९९ मध्ये (टपाल खर्चासह) घरपोच.
कुशल लष्करी डावपेच आणि अपरिमित शौर्य यांची ओळख करुन देणारी दोन पुस्तकं…
रचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद
अनुवाद : भगवान दातार
रचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद
भारताला आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आजवर १९४७, १९६२, १९६५, १९७१, १९९९ अशी अनेक युद्धं लढावी लागली.
या लढायांत असंख्य लष्करी अधिकारी, जवानांनी आपलं असीम शौर्य सिद्ध केलं. देशासाठी बजावलेल्या या कामगिरीसाठी त्यांतील अनेकांना आजवर विविध सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.
अशा काही निवडक सैनिकांच्या वीरतेच्या कहाण्यांची ही २ पुस्तकं…
युद्धभूमीवरील डावपेच व प्रत्यक्ष लढायांच्या तपशिलांसह !
१० ठिकाणांचे हटके अनुभवकथन
श्रीनाथ पेरूर
अनुवाद : उल्का राऊत
‘कन्डक्टेड टुर्स’मधून प्रवास करणं म्हणजे भोज्जास हात लावून येणं…असा एक सर्वसाधारण समज ! या पुस्तकाचा लेखक
श्रीनाथ पेरुर याने अशा प्रकारच्या टुर्सचं अंतरंग समजून घेण्यासाठी देश-विदेशातल्या विविध छटा असणाऱ्या १० ठिकाणांची भ्रमंती केली. वेगळा दृष्टीकोन ठेवल्यामुळे लेखक त्या भ्रमंतीत अनपेक्षितपणे रमला. त्याच भ्रमंतीचं नवी दृष्टी देणारं, हे खुसखुशीतपणे रंगवलेलं अनुभवकथन वाचायलाच हवं!
या भ्रमंतीतील काही ठिकाणं अगदी नेहमीचीच होती तर काही वेगळ्या वाटेवरची ! अशा या वैविध्यपूर्ण ठिकाणांमध्ये दक्षिण भारतातली मंदिरं, सात दिवसात आटोपलेली युरोप टूर, कबीर संगीत गाणाऱ्या कलाकारांसोबतची यात्रा, थरच्या वाळवंटातील उंटावरची थरारक राइड, हजारो भाविकांसोबत अनुभवलेली वारी, उझबेकिस्तानमधील सेक्स टुरिझमचा बाजार अशा हटके ठिकाणांचा समावेश आहे.
साहस, वासना, कुतूहल आणि अगदी ईश्वरभक्तीपर्यंतचा अनुभव कधी उपरोधिक, तर कधी खट्याळ शैलीत वाचायला मिळतो. लेखकाच्या निरिक्षणक्षमतेमुळे हे सगळे अनुभव आपल्यापर्यंत जिवंतपणे पोहोचतात.
‘कन्डक्टेड टुर्स’ची वेगळी अनुभूती देणारं, थोडं अंतर्मुख करणारं प्रवासवर्णन… अर्थात ‘मदुराई ते उझबेकिस्तान !’
पृथ्वीच्या दक्षिण व उत्तर टोकावरच्या थरारक सफरी…
जयप्रकाश प्रधान
शेल्फमध्ये ठेवलेला पृथ्वीचा ग्लोब बघत असताना पृथ्वीच्या दोन्ही टोकांवरचे प्रदेश विशेष लक्ष वेधून घेतात. ते म्हणजे, दक्षिणेकडचा अंटार्क्टिका तर उत्तरेकडचा आर्टिक. एक बर्फ सोडला तर या देशांमध्ये बघण्यासारखं काय बरं असेल असा प्रश्न मनात येतो. तब्बल ७८ देशांची ऑफबीट भटकंती करणारं प्रधान दाम्पत्य या प्रदेशांचीही मुशाफिरी करून आलं आहे. जगाच्या दोन ध्रुवांवरच्या अशा स्थळांची वैशिष्ट्यं टिपून तेथील निसर्गाचं आणि लोकजीवनाचं जिवंत चित्रण ते या पुस्तकातून करून देतात.
पृथ्वीच्या दक्षिण टोकावरील शेवटचं गाव ‘प्युर्टो विल्यम्स’, खलाशांचं कबरस्तान ‘केप हॉर्न’, ९८% बर्फानेच वेढलेलं ‘अंटार्क्टिका’, अवघ्या तीन हजार लोकवस्तीचं ‘फॉकलंड आयलंड’, तर उत्तर टोकावरील ‘आर्टिक सर्कल’, ‘नॉर्दन लाईट्स’चं मनोहारी दर्शन, हिमनगांची जागतिक राजधानी ‘ग्रीनलँड’ आणि लँड ऑफ फायर अँड आईस ‘आइसलँड’… पृथ्वीवरच्या अशा दोन टोकांवरील वेगळ्या दुनियेची सफर प्रधान या पुस्तकातून घडवून आणतात.
थरारक सफरींचा अविस्मरणीय अनुभव देणारं कथन…एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती !
सुनियोजित व सुखकर भटकंतीसाठी अनुभवाचे बोल
जयप्रकाश प्रधान
जयंती प्रधान
प्रवासाचं वेड कुणाचं आयुष्य कसं बदलून टाकू शकतं याचं उत्तम उदाहरण द्यायचं तर जेपीज्अर्थात जयप्रकाश व जयंती प्रधान दाम्पत्याचं! १९९८मध्ये या दाम्पत्याने युरोपची पहिली सहल केली आणि त्यानंतर झपाटल्यासारखे ते एका मागोमाग एक देश पालथे घालू लागले. आजपर्यंत त्यांनी तब्बल ७८ देशांची सैर केली आहे. या ऑफबीट भटकंतीमधून ‘जेपीज्‘कडे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव जमा झाले. या अनुभवांमधूनच पर्यटनाबद्दलची एक व्यापक दृष्टी निर्माण झाली. सहल प्लॅन करताना कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे त्यांना उत्तमरीत्या समजून आलं. त्यातूनच नियोजनाच्या उपयुक्त टिप्सचं हे पुस्तक साकार झालं आहे.
या टिप्समुळे सहल आनंददायी आणि निर्विघ्न होईल. एक सुजाण पर्यटक म्हणून आपला दृष्टीकोन विकसित होईल. तसंच परदेशात आपण कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या टाळाव्यात याबाबत केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण आपल्या देशाची प्रतिमाही चांगली ठेऊ शकतो.
अर्जुन वाजपेयी
अनुवाद: सुमती कानिटकर
दोन महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर २२ मे २०१० रोजी सोळा वर्षांचा अर्जुन वाजपेयी जगाच्या सर्वोच्च शिखरावर उभा होता! त्यावेळेस एव्हरेस्ट सर करणारा तो सर्वात तरुण (नॉन-शेरपा) गिर्यारोहक ठरला होता. अनेक वर्षं जोपासलेलं असं अशक्यप्राय स्वप्न अर्जुनने त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने पूर्ण केलं होतं…
हे अनुभवकथन थेट अर्जुनच्याच शब्दात असल्यामुळे ते वाचताना वाचकही त्याच्याबरोबर एव्हरेस्ट मोहिमेवर निघतो, त्याच्याबरोबर ते सर्व कठीण टप्पे पार करतो आणि अक्षरश: एका धाडसी गिर्यारोहकाचं आयुष्यच जगतो!
केवळ गिर्यारोहणात रस असणाऱ्यांसाठीच नव्हे तर सर्व तरुणांसाठी हे पुस्तक म्हणजे कठोर परिश्रम, चिकाटी आणि धाडस याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. एक अतिशय सामान्य असा सोळा वर्षांचा गिर्यारोहक अशक्यप्राय स्वप्न धाडसाने आणि जिद्दीने कसं पूर्ण करतो याचं चित्तथरारक अनुभवकथन… ‘सोळाव्या वर्षीच माउन्ट एव्हरेस्ट फत्ते!’