बाग एक जगणं


सरोज देशपांडे


बाग फुलवणं म्हणजे यात्रिंकपणे माती खणून रोप लावणं नव्हे. बाग गॅलरीतली असो वा अंगणातली, प्रत्येक रोपाशी, फुलाशी, वेलीशी भावनिक नातं कसं जुळू शकतं हे या पुस्तकात दिसतं. पानाफुलांशी, लहान मोहक पक्षीसृष्टीशी, गुलाबाच्या कलमांशी आणि कॅक्टससारख्या कातेरी झाडाशीदेखील लेखिकेचा मूक संवाद सुरू असतो.
लँडस्केप करताना एखद्या कलाकाराप्रमाणे लेखिका कल्पनेत चित्र रंगवते. मग लँडस्केप ही तिची प्रयोगशाळाच बनुन जाते!
नैनिताल असो की जपान, देशविदेशातील बागांचा अनुभव घेतानाही लेखिकेच्या भावविश्वात घरची बाग असतेच.
बाग फुलवताना झाडाच्या स्वभावावरून, प्रतिसादावरून जीवनाच्या विविध पैलूंकडे बघण्याची व्यापक दृष्टी लेखिकेला लाभत जाते. जोडीदाराबरोबरचं सहजीवन, माणसाचं पर्यावरणाशी असलेलं नातं जीवनाच्या मोठ्या कॅनव्हासवर बघताना बागेबरोबरचं हे जगणं अधिकाधिक समृध्द वाटू लागतं.
अतिशय संवेदनशीलतेने लिहीलेलं हे अनुभवकथन मनोवेधक तर आहेच, पण जाताजाता झाडारोपांच्या, फुलापानांच्या खासियती आणि निगराणी यांचा परिचय करून देणारंही ठरतं.
बागेशी जडलेल्या अनुबंधाचा मुक्त आविष्कार म्हणजे…
बाग एक जगणं…!


225.00 Read more

मन उलगडताना

मनातल्या गुंतागुंतीवर मनोविकारांवर टाकलेला प्रकाश


[taxonomy_list name=”product_author” include=”392″]


मन असे कसे, कांद्याचे पापुद्रे जसे!’
कोण्या अज्ञात कवीच्या या ओळी मनाचं यथार्थ वर्णन करतात. मात्र थांग न लागणार्‍या मनाची मानसशास्त्रीय संकल्पना आणि पद्धती यांच्याद्वारे चिकित्सा केल्यास अनेक मनोव्यापारांचा वेध घेता येतो. ३५ वर्षांहून अधिक काळ मानसतज्ज्ञ आणि समुपदेशक म्हणून काम करणार्‍या डॉ. विजया फडणीस यांनी या लेखसंग्रहातून मनुष्यस्वभाव, मनोविकार, मानसोपचाराच्या विविध पद्धती आदींचा वेध घेतला आहे. विशेष म्हणजे फ्रॉइडचे स्वप्नाचे सिद्धान्त, रिअ‍ॅलिटी थेरपी आदी मानसशास्त्रीय संकल्पना किंवा डिप्रेशनसारखे मनोविकार आदी गोष्टी विशद करताना त्यांनी आपल्या लेखांना अनुभवांची जोड दिली आहे. त्यामुळे हे लेख माहितीपूर्ण, तसंच मर्मदृष्टी देणारे व रंजक झाले आहेत. या लेखांमधून फडणीस यांनी विविध मानसोपचारतंत्राचा वापर कसा करावा, हेही साध्या-सोप्या शब्दांत सांगितलं आहे. त्यामुळे वाचकांबरोबरच मानसशास्त्राचे विद्यार्थी व शिक्षक यांनाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.
स्वभावाचे विविध नमुने मांडणारा, सकारात्मक वास्तववादी दृष्टिकोन देणारा मौलिक लेखसंग्रह… मनं उलगडताना !



275.00 Add to cart

मन:स्वास्थ्य संच

निरोगी मानसिक आरोग्याचा कानमंत्र देणार्‍या ४ पुस्तकांचा संच


[taxonomy_list name=”product_author” include=”392″]


मुलांना घडवताना
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समंजस मार्गदर्शन

मनं उलगडताना
मनातल्या गुंतागुंतीवर मनोविकारांवर टाकलेला प्रकाश

सुखाने जगण्यासाठी
सकारात्मक दृष्टी देणारं मौलिक मार्गदर्शन

गोष्टी मनाच्या
आनंदी जीवनासाठी मनाचे व्यवस्थापन



900.00 Add to cart

मुक्काम पोस्ट शहापूर!


शोभा भालेकर


ही कथा केवळ एका गावाची नाही!

ती आहे, रम्य आणि सुखद आठवणींची…

लहानशा गावात सहज मिसळून गेलेल्या एका कुटुंबाची ही कथा कुटुंबातल्या मुलीच्या आठवणींतून उलगडत जाते. जात, धर्म, पंथ या गोष्टींचा जाच होऊ न देता सुखं-दुःखं, मान-अपमान, सण-उत्सव, भांडण-तंटे अशा सगळ्या गोष्टी एकत्र येऊन वाटून घेत माणुसकी आणि आपलेपणा जिता-जागता ठेवणाऱ्या गावातल्या आयुष्याच्या या आठवणी निरलस वृत्तीचं दर्शन वाचकाला घडवतात. द्वेष आणि मत्सराचे वारे न लागलेल्या काळात, तांत्रिक सुविधांचा सुकाळ नसताना छोट्याशा गावातली माणसं एकमेकांना कशी धरून राहत होती, एकमेकांच्या चुकांसह किती सहजपणे एकमेकांना स्वीकारत होती, याची ही गोष्ट!

सादगी, निर्लेप वृत्ती आणि जिव्हाळा या गोष्टींच्या आधारावर सकस आणि सुंदर जीवन जगलेल्या गावाच्या पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटणाऱ्या या आठवणी! मुक्काम पोस्ट शहापूर!



125.00 Add to cart

इंदिरा गांधी, आणीबाणी… भारतीय लोकशाही


[taxonomy_list name=”product_author” include=”408″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


महत्त्वपूर्ण राजकीय घटना-घडामोडींनी, निर्णयांनी आणि व्यक्तित्वांनी १९७० चे दशक व्यापून टाकले होते. या सर्वांचा या पुस्तकात एका अंतस्थाने अतिशय तारतम्याने आढावा घेतला आहे. तसेच भारतातील लोकशाहीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले आहे. आणीबाणी लागू करतानाची परिस्थिती, उच्च पातळीवरील निर्णयप्रक्रिया, पडद्यामागील गुप्त हालचाली, संजय गांधी व चौकडीच्या कारवाया आणि इंदिरा गांधींची याबाबतची भूमिका, जयप्रकाश नारायण यांच्याशी गोपनीय वाटाघाटी, तसेच या दशकातील बांगला देशाची निर्मिती, सिमला करार, सिक्कीमचे विलिनीकरण इ. अभूतपूर्व घटनांमागील तपशील रंजक तितकाच उद्‌बोधक! पुस्तकाचे लेखक पी.एन.धर हे इंदिराजींचे सल्लागार व यावेळचे पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख होते. इतिहासाच्या पानात दडलेले सत्य सांगणारे, इंदिराजींच्या राजकीय जीवनाचे बरे-वाईट पैलू उलगडणारे आणि आतापर्यंत अज्ञात असलेली माहिती उघड करत परिस्थितीचा सर्वंकश परामर्श घेणारे महत्त्वपूर्ण पुस्तक.


395.00 Add to cart

मनःपूर्वक खुशवंत

जीवन, मरण आणि त्या दरम्यान…


खुशवंत सिंग
अनुवाद : अभिजित थिटे


* `माझी एकच इच्छा आहे की, मला जेव्हा मृत्यू येईल, तेव्हा तो अगदी सहजतेने यावा. आपण जसं गाढ झोपून जातो ना, तसाच…’

* `मला वाटतं, कामुक विचार करणं, त्याची कल्पना करणं हेही अगदी स्वाभाविक आहे, त्यात गैर काही नाही.’

* `शेवटी जाण्याची वेळ झाली की खेद, दु:ख, कोणावरही राग न ठेवता जावं.’

निधनापूर्वी, वयाच्या ९५व्या वर्षी खुशवंत सिंग यांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकात त्यांनी सहजसोप्या आणि रोखठोक शैलीत त्यांचं खासगी आयुष्य, विवाह, प्रेम, सेक्स आणि त्यांचं लेखन व संपादनाचं काम यांविषयी ‘बिनधास्तपणे’ लिहिलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात ते प्रथमच त्यांचं यश आणि अपयश, क्षमता आणि मर्यादा यांबद्दल खुलेपणाने सांगतात.
आनंद, श्रध्दा, मृत्यू आणि धर्म यांसारख्या विषयांबाबत बोलताना ते चिंतनात्मक होतात; तर जातीयवाद, भारताचं राजकारण, दहशतवाद यांबद्दल बोलताना ते थेट आणि रोखठोक होतात. तसंच इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, लालकृष्ण अडवाणी अशा त्यांच्या स्नेह्यांबद्दलही ते कुठलीही भीडभाड न बाळगता लिहितात.
हे ललितलेखन करताना खुशवंत सिंग यांनी आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे वेगवेगळे कंगोरेही नोंदवले आहेत. त्यामुळेच मनापासून लिहिलेलं मन:पूर्वक खुशवंत वाचकांना नक्कीच भावेल…!


225.00 Add to cart

सह्याद्रीचे वारे


[taxonomy_list name=”product_author” include=”456″]


माझा गेल्या तीस वर्षांचा जो अनुभव आहे त्यावरून मी असे पाहिले आहे की, कुठल्याही राजकीय पक्षामध्ये थोडेच लोक असतात. बहुसंख्य जनता ही पक्षाच्या बाहेर असते, असे माझे स्वत:चे मत आहे. आणखी ती जनता काही अमक्याच एका पक्षाशी बांधली गेलेली असते असेही नाही. आपला मार्ग युक्त आहे आणि चांगला आहे, हे या जनतेला पटविण्याची जबाबदारी त्या त्या पक्षावर असते. जो पक्ष हे करतो तो राजकारणामध्ये यशस्वी होतो असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि हाच अनुभव याच्यापुढेही राहणार आहे असे मी मानतो.”

-यशवंतराव चव्हाण


300.00 Add to cart

हितगुजातून उलगडलेली वहिदा रेहमान

एका प्रतिभासंपन्न अभिनेत्रीचा चित्रपट व जीवनप्रवास तिच्याच शब्दांत


नसरीन मुन्नी कबीर
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर


प्रतिभा, आगळं सौंदर्य आणि व्यक्तिरेखा समजून घेऊन त्यात जीव ओतण्याची असामान्य क्षमता व बुध्दिमत्ता या बळावर वहिदा रेहमानने चित्रपटसृष्टीत आपलं विशेष स्थान निर्माण केलं. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात (१९५५-७५) गुरू दत्त, विजय आनंद ते सत्यजित राय यांसारख्या महान दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून तिने आव्हानात्मक भूमिका साकार केल्या आणि एकप्रकारे ती पर्यायी स्त्री-प्रतिमांसाठी अवकाश निर्माण करणारी अभिनेत्री ठरली. ‘प्यासा’, ‘गाइड’, ‘अभिजान’, ‘मुझे जीने दो’, ‘तीसरी कसम’, ‘खामोशी’ आदी चित्रपटांतील तिच्या सघन-सजीव व्यक्तिरेखा अविस्मरणीय व कायमस्वरूपी ठसा उमटवणार्‍या ठरल्या… आजकालच्या ‘रंग दे बसंती’ किंवा ‘दिल्ली-६’ पर्यंत तो ठसा कायम आहे.
‘आज फिर जीने की तमन्ना है’ म्हणत पडद्यावर स्त्री-स्वातंत्र्याचा उद्धोष करणारी ही अभिनेत्री पडद्यामागील जीवनाबाबत नेहमीच मितभाषी राहिली. लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्रीला तिच्या भूमिकांबाबत, तिच्या व्यक्तित्वाबाबत आणि तिच्या जीवनप्रवासाबाबत बोलतं केलं आणि त्या बहुस्पर्शी संवादावर आधारित ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ वहिदा रेहमान’ हे इंग्रजी पुस्तक साकार केलं. त्याच इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी सिध्द केलेला हा मराठी अनुवाद- वहिदा रेहमान…हितगुजातून उलगडलेली!


295.00 Read more

भारत : समाज आणि राजकारण

यशवंतराव चव्हाण यांचे प्रगट चिंतन


[taxonomy_list name=”product_author” include=”379″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”1076″]


आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करून देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी तीन खंडांमधून आत्मचरित्र लिहिण्याचे ठरवले होते. प्रत्यक्षात त्यातील एकच खंड प्रकाशित होऊ शकला. प्रा. जयंत लेले यांच्या प्रदीर्घ मुलाखतसत्रांतून आकारास आलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे एका अर्थाने यशवंतरावांनी लेले यांना सांगितलेले आत्मचरित्र म्हणावे लागते. ‘‘हा मी स्वत:शी करत असलेला संवाद आहे” असे स्वत: यशवंतरावच म्हणतात यात सारे काही आले. यशवंतरावांचे राज्य व राष्ट्र या दोन्ही पातळ्यांवरचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक दृष्टिकोन आणि व्यवहार यांचा हा सखोल अभ्यास आहे. विशेष म्हणजे हा अभ्यास जागतिक पातळीवरील स्थित्यंतरांच्या संदर्भात करण्यात आलेला असल्याने तो एकमेवच मानावा लागतो. आपण मनापासून स्वीकारलेली स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे एकीकडे व प्रत्यक्ष राजकीय व्यवहार दुसरीकडे. तर प्रसंगी स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांमधील द्वंद्वावर मात करण्याची यशवंतरावांची धडपड लेले यांनी हळुवारपणे उकलली आहे. चव्हाण साहेबांची राजकीय भूमिका व शैली यांच्यासाठी त्यांनी केलेला सैद्धांतिक व्यवहारवाद हा शब्दप्रयोग अत्यंत समर्पक म्हणावा लागेल.

स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान झालेली यशवंतरावांची वैचारिक वाटचाल, स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई राज्याच्या व द्वैभाषिकाच्या कायदेमंडळात घडलेला प्रशासक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अविचलपणे राष्ट्रीय व प्रादेशिक हितसंबंधांचा मेळ घालणारा मुत्सद्दी, चिनी आक्रमणामुळे अचानकपणे अंगावर आलेली जबाबदारी पेलणारा खंबीर नेता व विचारवंत असे अनेक पैलू या ग्रंथातून उलगडतात. महाराष्ट्र आणि भारत या दोन्ही स्तरांवरील सहकारी व स्पर्धक यांच्याशी आपल्या मानवी पातळीवरील संबंधांविषयी इतक्या स्पष्टपणे यशवंतराव कधीच बोलले नव्हते. या सर्व गोष्टींचा उपयोग राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत वावरणाऱ्यांना तर होईलच पण महाराष्ट्राने यशवंतरावांचा कृतज्ञतापूर्वक अभिमान का बाळगायचा हे देखील समजेल.


750.00 Add to cart

लंडननामा

जडणघडण पहिल्या ‘ग्लोबल सिटी’ची


सुलक्षणा महाजन


लंडनमध्ये व्यापार -उद्योग वाढले. ऐश्‍वर्याला गगन ठेंगणं झालं आणि त्याबरोबर गुन्हेगारीही फोफावली. खून, मारामार्‍या, रोगराई, दारिद्र्य सर्व काही एकत्र नांदू लागलं. बघता बघता लंडन बकाल होत गेलं. मात्र नंतर दूरदृष्टीच्या व्यक्तींनी व संस्थांनी याच लंडनचा कायापालट केला आणि ते बनलं एक सर्वांगसुंदर महानगर…
पहिलं ‘जागतिक महानगर’!
मानवी सर्जनशीलता, बुध्दी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान म्हणजेच आजचं लंडन. लंडनचा हा प्रवास थोडाथोडका नव्हे, तर २००० वर्षांचा आहे. या पहिल्या ‘ग्लोबल सिटी’ च्या जडणघडणीची, चढ-उतारांची सुरस कथा म्हणजेच…
‘लंडननामा!’



350.00 Add to cart

अमावास्येचा पूर्णचंद्र

अर्थात ग्रहण भ्रमण


श्रीकांत लागू


अमावस्येचा पूर्णचंद्र म्हणजे देशा-विदेशातील विविध छटांमधील ग्रहणं बघण्यासाठी केलेली मनसोक्त भटकंती ! पुस्तकाचे लेखक श्रीकांत लागू यांनी पहिलं सूर्यग्रहण बघितलं होतं- वयाच्या आठव्या – नवव्या वर्षी. त्या वेळी निर्माण झालेल्या कुतूहलापोटी पुढील आयुष्यात लागूंनी अक्षरशः झपाटल्याप्रमाणे अनेक ठिकाणी जाऊन ग्रहणं अनुभवली. त्यांच्या दृष्टीने ग्रहण म्हणजे आकाशात घडणारं अद्भुत नाट्य. ते पाहून डोळ्याचं पारणं फिटतं पण मन मात्र भरत नाही. हुबळी, डायमंड हार्बर, कच्छ, झांबिया, द. आफ्रिका, टर्की, चीन, रामेश्वरम् अशा देश- देशातील अनेक ठिकाणी त्यांनी खग्रास सूर्यग्रहणाचा जणू पाठलागच केला! ते स्वत : खगोलशास्त्रज्ञ नाहीत किंवा अंतराळशास्त्रज्ञही नाहीत. तरीही एखाद्या निरागस पण जिज्ञासू वृत्तीच्या मुलाप्रमाणे ते ग्रहणाचं रोमांचपूर्ण वर्णन करतात. ग्रहणाच्या पहिल्या स्पर्शापासून ते ग्रहण सुटेपर्यंतच्या काळाचं वर्णन वाचताना वाचकाला स्वत: ग्रहण अनुभवत असल्याचा आनंद देऊन जातात. लागू देश-विदेशात भरपूर फिरले, मात्र नेहमीच्या पठडीतील पर्यटनासाठी म्हणून ते फिरले नाहीत. त्यांची भटकंती झाली ती कधी जलतरणस्पर्धेच्या निमित्ताने तर कधी नाट्यप्रयोगांसाठी, कधी कैलास-मानससरोवराची प्रदक्षिणा करायला, कधी एव्हरेस्ट बेसकँप सर करण्यासाठी तर कधी अद्भुत शांततेने आणि केवळ बर्फाने आच्छादलेला सातवा खंड – ‘अंटार्टिका’ अनुभवण्यासाठी मात्र या पुस्तकातील भटकंती आहे ती फक्त आणि फक्त ग्रहणं बघण्यासाठीची…



125.00 Add to cart

शौर्यगाथा

युद्धभूमीवर अतुलनीय पराक्रम गाजवणार्‍या वीरांच्या शौर्यगाथा


रचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद
अनुवाद : भगवान दातार 


या कथा आहेत वीर जवानांच्या…या कथा आहेत त्यांच्या धाडसाच्या, निश्चयाच्या, जिद्दीच्या आणि वचनपूर्तीच्या ! सैनिक प्राणपणाने लढत असतो, तो देशाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी ! या पुस्तकातल्या कथा `सैनिक नावाचं रसायन’ कोणत्या मुशीतून घडतं, याची झलक तर आपल्याला देतातच पण त्याचबरोबर निश्चय आणि कटिबद्धता यांची प्रेरक कहाणीसुद्धा सांगतात.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सत्तेच्या बाजूने लढलेली युद्ध असोत किंवा स्वातंत्र्योत्तर काळात पाकिस्तान आणि चीनबरोबर आमने-सामने लढलेली युद्ध असोत… त्याचप्रमाणे प्रचंड उंचीवर लढलेलं कारगील युद्ध असो किंवा शांतता काळातले संघर्ष असोत… प्रत्येक लढाईत, प्रत्येक प्रसंगी वीरजवान जीवावर उदार होऊन लढल्यामुळेच भारताची सुरक्षा अबाधित राहिली. या सर्व युद्धांत दाखवलेल्या असामान्य शौर्यासाठी अनेक लष्करी अधिकारी व जवानांना आजवर विविध सन्मानाने गौरवण्यात आले आहे. त्यापैकी काही वीरांच्या शौर्याची, त्यांच्या नेमक्या कर्तृत्वाची ओळख या पुस्तकात तपशीलांसह व रोचकपणे करून दिली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, या आहेत असीम धैर्य आणि पराकोटीचं शौर्य दाखवणार्‍या वीरांच्या शौर्यगाथा !



250.00 Add to cart

सुखाने जगण्यासाठी

सकारात्मक दृष्टी देणारं मौलिक मार्गदर्शन


[taxonomy_list name=”product_author” include=”392″]


आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव, धावपळ आणि घाईगडबडही कधी नव्हे इतकी वाढली आहे. अशावेळी आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीचं नीट आकलन करून त्यातून मार्ग काढणारेच यशस्वी आणि पर्यायाने सुखी होतात. मात्र त्यासाठी आवश्यक असतं – निरोगी मन:स्वास्थ्य आणि मनोनियंत्रण !
हे जाणूनच विख्यात मानसतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. विजया फडणीस यांनी या लेखसंग्रहात आपलं मन निरोगी राखण्याचे मौलिक मंत्र उदाहरणांसह सांगितले आहेत. तसंच विचार आणि भावना यांवर नियंत्रण ठेवून आपली वर्तणूक कशी ठेवावी याबद्दल अत्यंत
मौलिक अशा सूचना केल्या आहेत, तर काही ठिकाणी त्यासाठी आवश्यक अशा युक्त्या-कॢप्त्याही सांगितल्या आहेत. त्यांनी या लेखांमधून मानसशास्त्रीय संकल्पना अत्यंत सोप्या शब्दांत समजावून सांगितल्यामुळे वाचकांना आगळी अंतर्दृष्टीही मिळते.
स्वभावातीत त्रासदायक गोष्टी टाळून स्वविकास साधण्यासाठी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी उपयुक्त असा लेखसंग्रह… सुखाने जगण्यासाठी !


175.00 Add to cart

सुरुवात एका सुरुवातीची

वेडीबाभळीपासून वीजनिर्मितीचा यशस्वी प्रयोग… या प्रयोगाची चित्तवेधक कथा!


प्रफुल्ल कदम


तसं पाहिलं तर हे पुस्तक नाही, एक प्रयोग आहे. या प्रयोगासाठी प्रयोगशाळा कशी सिद्ध केली गेली याचं ते आत्मचरित्रात्मक निवेदन आहे. बहुतेक आत्मचरित्रांमध्ये ‘आत्म’ म्हणजे ‘मी’ महत्त्वाची भूमिका बजावत असतो. परंतु प्रफुल्ल कदम यांच्या आत्मचरित्रात मुख्य भूमिका आहे ‘वेडीबाभळीची’. त्या नायिकेचा म्हणजे वेडयाबाभळीचा परिसर आहे ग्रामीण महाराष्ट्राचा. मात्र प्रयोग आहे जागतिक स्तरावर परिणाम घडविणारा. या आत्मचरित्राला उद्दिष्ट आहे ऊर्जाक्रांतीचे – जी जलक्रांती व कृषीक्रांती समवेतच साध्य होऊ शकते… …पूर्णपणे प्रतिकूल वातावरणातही प्रयोग करण्यासाठी लागते दुर्दम्य जिद्द. जिद्दीला भांडवल लागत नाही. उद्दिष्ट निश्चित असेल, विचार पक्का असेल आणि जिद्द असेल तर सर्व अडचणींवर मात करता येते. अगदी नकारात्मक विचार करणार्‍यांचा विरोधही मोडून काढता येतो आणि मतलबी मंडळींचे खेळही थोपविता येतात. खरं म्हणजे महाराष्ट्रात हजारो तरुण असे आहेत की ज्यांना काहीतरी करायचं आहे, परंतु दिशा नाही, कार्यक्रम नाही वा मार्गदर्शन नाही. त्यांना हे पुस्तक एक ‘गाईड’ ठरेल. -कुमार केतकर


120.00 Add to cart
1 3 4