168 | 978-93-80361-20-8 | Londonnama | लंडननामा | जडणघडण पहिल्या ‘ग्लोबल सिटी’ची | Sulakshana Mahajan | सुलक्षणा महाजन | लंडनमध्ये व्यापार -उद्योग वाढले. ऐश्वर्याला गगन ठेंगणं झालं आणि त्याबरोबर गुन्हेगारीही फोफावली. खून, मारामार्या, रोगराई, दारिद्र्य सर्व काही एकत्र नांदू लागलं. बघता बघता लंडन बकाल होत गेलं. मात्र नंतर दूरदृष्टीच्या व्यक्तींनी व संस्थांनी याच लंडनचा कायापालट केला आणि ते बनलं एक सर्वांगसुंदर महानगर… पहिलं ‘जागतिक महानगर’! मानवी सर्जनशीलता, बुध्दी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान म्हणजेच आजचं लंडन. लंडनचा हा प्रवास थोडाथोडका नव्हे, तर २००० वर्षांचा आहे. या पहिल्या ‘ग्लोबल सिटी’ च्या जडणघडणीची, चढ-उतारांची सुरस कथा म्हणजेच… ‘लंडननामा!’ |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 250 | 21.6 | 14 | 1.8 | 600 |
Evolution of First Global City London
|
Travel | प्रवास | Informative | माहितीपर | 295 | Londan_nama.jpg | LONDONNAMA_CoverBC.jpg |
१२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती
‘मानसोल्लास’ या जगातील पहिल्या ज्ञानकोशातील पाककृतींविषयी रंजकमाहिती व तिचा शास्त्रीय मागोवा
डॉ. वर्षा जोशी, डॉ. हेमा क्षीरसागर
भारतीय पाकविद्येला हजारो वर्षांची परंपरा, इतिहास आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतवर्ष अत्यंत प्रगत स्थितीत होता. त्यातून अमूल्य अशी ग्रंथसंपदाही निर्माण झाली. बाराव्या शतकात राजा सोमेश्वराने संस्कृतमध्ये लिहिलेला आणि जगातला पहिला ज्ञानकोश म्हणून गणला गेलेला ‘अभिलषितार्थचिंतामणी’ अर्थात् मानसोल्लास हा या ग्रंथसंपदेपैकी एक अमूल्य ठेवा आहे. बाराव्या शतकापर्यंत भारतात अन्न आणि पाणी यांचा कशा प्रकारे विचार केला जात होता आणि अन्न शिजविण्याच्या कोणत्या पध्दती रुढ होत्या तसेच कोणत्या पाककृती केल्या जात असत याबाबत सविस्तर माहिती देऊन त्या वेळचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनही डॉ.वर्षा जोशी आणि डॉ.हेमा क्षीरसागर यांनी या पुस्तकात सांगितला आहे.
आपल्या खाद्यपरंपरेचे महत्त्व आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सांगणारे, आपल्या जुन्या ग्रंथातील ज्ञान सर्वांपर्यंत पोचवणारे पुस्तक… ‘बाराव्या शतकातील खाद्यसंस्कृती’
Reviews
There are no reviews yet.