271 | 978-93-82591-70-2 | Offbeat Bhatkanti 2 | ऑफबीट भटकंती २ | पुन्हा एकदा अनोख्या देशांची दिलखुलास मुशाफिरी | Jayprakash Pradhan | जयप्रकाश प्रधान | प्रधान दांपत्याने आतापर्यंत ६६ देश पालथे घातले आहेत. नेहमीच्या गर्दीच्या पर्यटनस्थळांपेक्षा थोडी ऑफबीट ठिकाणं पाहण्याकडे त्यांचा कल असतो. या पुस्तकात अशाच काही वैशिष्टयपूर्ण हटके पर्यटनस्थळांच्या सहलीच्या रोमांचकारी अनुभवांचं वर्णन ओघवत्या शैलीत केलं आहे. तिथे कसं व कधी जावं ही माहितीही दिली आहे. विविध खंडांतील आणखी काही अनोख्या देशांची मुशाफिरी घडवणारं आणि आगळयावेगळया प्रवासअनुभवाची प्रचीती देणारं पुस्तक… ऑफबीट भटकंती-२! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 228 | 21.9 | 14.1 | 1.8 | 310 |
This is the secend part of Offbeat Bhatkanti. Mr. & Mrs. Pradhan have travelled many offbeat places in many countries. They have visited 67 countries so far. In this book he has given his experiences from the offbeat journeys he has made in America. He has visited many interesting national monumements, national parks. He along with his wife and some friends hired a private caravan and travelled through the backroads of America. He has also written about his travel experiences in Brazil, Peru, Chille and many exciting places in Europe and South Africa.
He has also given important information about these places e.g. how to visit these places, which is the correct season to visit these places. And he has also provided maps in the book. |
Travel | प्रवास | 250 | OffbeatBhatkanti-2_RGB | OffbeatBhatkanti-2_BackBC.jpg |
पर्यटन एक संजीवनी
अनुभव देश-विदेशातील भन्नाट भटकंतीचा…
डॉ. लिली जोशी
वैद्यकीय व्यवसाय करत असतानाच डॉ. लिली जोशी यांनी विलक्षण आंतरिक ओढीने प्रवासाचा छंद अनेक वर्षं जपला आहे. मात्र हा प्रवास म्हणजे ठरावीक पध्दतीने, ठरावीक ठिकाणीच केलेला प्रवास नव्हे. थोडी ‘हटके’ ठिकाणं पाहण्याकडे त्यांचा कल असतो. उदाहरणच द्यायचं झाल्यास गाडीने केलेली स्कॉटलंडमधली भटकंती, रेडवूडच्या जंगलातली सफारी, महाकाय व्हिक्टोरिया फॉल्सला दिलेली भेट… आणि ग्रीस व इजिप्तसारख्या लोकप्रिय तरीही वैशिष्टयपूर्ण ठिकाणी केलेलं पर्यटन… पुस्तकात असलेली अशी विविधता वाचकाला वेगळी अनुभूती देत खिळवून ठेवते.
मात्र हे पुस्तक म्हणजे केवळ प्रवासवर्णन नक्कीच नाही. पुस्तकातील ‘गुगल’ किंवा ‘हार्वर्ड स्कूल’सारख्या व्यावसायिक स्थळांच्या भेटीतील अनुभव, चीन किंवा दक्षिण आफ्रिकेच्या सहलीमधल्या अनुभवांची वर्णनं त्या त्या देशातील आर्थिक व सामाजिक पैलूंवरही प्रकाश टाकतात. याचबरोबर काला पत्थर, अन्नपूर्णा बेसकँप, योसेमिटी इ. ट्रेकमधले थरारक अनुभव अंगावर अक्षरश: काटा उभा करतात. या अनुभवांबरोबरच लेखिकेने एक डॉक्टर म्हणून पर्यटनासाठी लागणाऱ्या फिटनेसबाबतही पुस्तकात चर्चा केली आहे.
पर्यटनातील अनुभव आपलं आयुष्य अनेक प्रकारे समृध्द करतात. नवनवीन भटकंती रोजच्या आयुष्यातला तोचतोचपणा नाहीसा करून नवा जोम, नवा उत्साह निर्माण करते. थोडक्यात काय तर, पर्यटन म्हणजे आयुष्यातला तेजस्वी सूर्यप्रकाश, चेतना देणारी संजीवनी… अर्थात् पर्यटन एक संजीवनी!
Reviews
There are no reviews yet.