ऑफबीट क्रूझ सफर – १
Sale₹300.00 ₹350.00
डायरी कॅरेबियन स्वर्गसमान बेटांवरील ३१ दिवसांच्या भटकंतीची…
१७ वेस्ट इंडीज बेटं
२१०० सहप्रवासी
७८१४ नॉटिकल माइल्सगेल्या २८ वर्षांपासून जयंती आणि जयप्रकाश प्रधान देश-विदेशात भटकंती करत आहेत. आपली भटकंती
‘ऑफबीट’ राहील याबाबत आग्रही राहून ते तब्बल १०७ देश फिरले.
भटकंतीच्या एका टप्प्यावर त्यांनी क्रूझ सफरीचा अनुभव घेतला आणि अशा सफरीच्या ते प्रेमातच पडले. मग ५-१५ दिवसांच्या क्रूझ सफरी करता करता त्यांनी पुढील क्रूझ निवडली ती ३१ दिवसांची.
सफरीत पाहिलेली कॅरेबियन बेटं ही अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण… हॉलंडची छोटी प्रतिकृती ‘कुरासावा’, स्नॉर्कलिंग-डायव्हिंगचे पॅराडाइज ‘बोनेर’, क्रिकेटची पंढरी ‘अँटिग्वा अँड बर्बुडा’, अमेरिकेचे व्हेनिस-‘फोर्ट लॉडरडेल’, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बॅरियर रीफ ‘बेलिझ’, भारताशी अनोखे नाते असणारा ‘जमैका’… अशा कितीतरी सुंदर बेटांची सफर जयप्रकाश आपल्याला घडवून आणतात… सफरीत लिहिलेल्या रोजनिशीच्या अर्थात ‘डायरी’च्या माध्यमातून !
३१ दिवसांच्या धावत्या रंजक चित्रणाची ‘डायरी’… ऑफबीट क्रूझ सफर : १
















Reviews
There are no reviews yet.