Reading Time: 2 Minutes (217 words)
359 | 978-93-86493-44-6 | Madurai Te Uzbekistan | मदुराई ते उझबेकिस्तान | १० ठिकाणांचे हटके अनुभवकथन | Srinath Perur | श्रीनाथ पेरूर | Ulka Raut | उल्का राऊत | ‘कन्डक्टेड टुर्स’मधून प्रवास करणं म्हणजे भोज्जास हात लावून येणं…असा एक सर्वसाधारण समज ! या पुस्तकाचा लेखक श्रीनाथ पेरुर याने अशा प्रकारच्या टुर्सचं अंतरंग समजून घेण्यासाठी देश-विदेशातल्या विविध छटा असणाऱ्या १० ठिकाणांची भ्रमंती केली. वेगळा दृष्टीकोन ठेवल्यामुळे लेखक त्या भ्रमंतीत अनपेक्षितपणे रमला. त्याच भ्रमंतीचं नवी दृष्टी देणारं, हे खुसखुशीतपणे रंगवलेलं अनुभवकथन वाचायलाच हवं! या भ्रमंतीतील काही ठिकाणं अगदी नेहमीचीच होती तर काही वेगळ्या वाटेवरची ! अशा या वैविध्यपूर्ण ठिकाणांमध्ये दक्षिण भारतातली मंदिरं, सात दिवसात आटोपलेली युरोप टूर, कबीर संगीत गाणाNया कलाकारांसोबतची यात्रा, थरच्या वाळवंटातील उंटावरची थरारक राइड, हजारो भाविकांसोबत अनुभवलेली वारी, उझबेकिस्तानमधील सेक्स टुरिझमचा बाजार अशा हटके ठिकाणांचा समावेश आहे. साहस, वासना, कुतूहल आणि अगदी ईश्वरभक्तीपर्यंतचा अनुभव कधी उपरोधिक, तर कधी खट्याळ शैलीत वाचायला मिळतो. लेखकाच्या निरिक्षणक्षमतेमुळे हे सगळे अनुभव आपल्यापर्यंत जिवंतपणे पोहोचतात. ‘कन्डक्टेड टुर्स’ची वेगळी अनुभूती देणारं, थोडं अंतर्मुख करणारं प्रवासवर्णन… अर्थात ‘मदुराई ते उझबेकिस्तान !’ |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 996 | 21.5 | 14 | 1 | 230 |
An unique travelogue covering various aspects of human life. The Author has traveled to Madhurai to understand Temple Tourism, to Uzbekistan to understand Sex Tourism, etc. The book is a translation of the original English book ‘If Its Monday It Must Be Madhurai
|
Travel | प्रवास | 240 | MaduraiTeUsbekistan | MadhuraiBC.jpg |
Reviews
There are no reviews yet.