978-93-92374-92-0 | Maza Brand Aazadi | माझा brand आझादी | एकाहरियाणवी मुलीच्या आझाद सफरी | अनुराधा बेनिवाल | उज्ज्वला बर्वे | परंपरांची ओझी वाहणाऱ्या हरयाणा प्रदेशातली एक मुलगी…अनुराधा. एका क्षणी तिचं मन ‘आज़ादी’ मिळवण्याचा अनुभव घेण्यासाठी बंड करून उठतं आणि ती स्वतःतला एकांत सोबत घेऊन बाहेरच्या जगात प्रवासासाठी निघते… हा प्रवास ती करते, ते ज्ञानप्राप्तीसाठी नव्हे की डोक्यात माहितीची खोगीरभरती करण्यासाठी! तिच्या भ्रमंतीमागे कोणताही विशिष्ट उद्देश नाही. बस, आपल्या आतल्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाता जाता मिळतात का, यासाठीचा हा शोध होऊन जातो. या प्रवासादरम्यान आपल्या आत दडलेल्या अनेक ‘स्थळांना’ ती भेट देत जाते. आपली संस्कृती, समाज आणि आध्यात्मिकता याबाबत स्वतःला प्रश्न विचारत राहते. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे “कोणतीही भारतीय मुलगी ‘चांगली शहाणी मुलगी’ ही साचेबंद चौकट तोडू शकेल का?”
प्रश्नांच्या शृंखलेची उत्तरं शोधत आयुष्याचे आनंदी पैलू अनुभवत ती प्रवास करते…. ‘व्यक्तिगत स्पेस’ची अनुभूती घेते, जी या देशात तिने कधी अनुभवली नसते. बाहेरच्या देशांत हे फिरून हे अनुभव उत्सवासारखे ती साजरे करते. तेच हे अनुभव…. तुम्हालाही आपल्या सभोवतालच्या ‘हिपोक्रसी ला सामोरं जाण्यासाठी हे अनुभव बळ देतील आणि मग तुम्हीही म्हणाल…माझा ब्रँड… आज़ादी ! |
Papar back | book | Rohan Prakashan | Marathi | 193 | Treavelogue | अनुभवपर | 295 |
Reviews
There are no reviews yet.