Featured

300.00

शिखररत्न कांचनजुंगा


साहसी गिरिप्रेमी’च्या विक्रमी मोहिमेची गोष्ट


उमेश झिरपे म्हणजे भारतात गिर्यारोहण क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या गिर्यारोहकांमधलं आघाडीचं नाव. एव्हरेस्ट मोहीम, अष्टहजारी शिखरांवरच्या मोहिमा, माउंट ल्होत्से, माउंट मकालू, माउंट चो ओयू, माउंट धौलागिरी, माउंट मनास्लू, माउंट कांचनजुंगा अशा अत्यंत आव्हानात्मक गिर्यारोहण मोहिमा त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली `गिरिप्रेमी'संस्थेच्या अनेक सदस्यांनी पूर्ण केल्या आहेत.माउंट प्रियदर्शनी, माउंट भ्रीग, माउंट मंदा, माउंट शिवलिंग, माउंट नून अशा अवघड शिखरांवरच्या मोहिमा त्यांनी स्वत: यशस्वीपणे केल्या आहेत. तर १९ हजार ६०० फूटांवरील माउंट थेलूवर त्यांनी एकट्याने चढाई केली आहे. निष्णात गिर्यारोहक असणारे उमेश झिरपे सुप्रसिद्ध लेखक व उत्तम वक्तेही आहेत. त्यांची या विषयावरची पुस्तकंही प्रसिद्ध आहेत. ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग' या गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. महाराष्ट्र शासनाने गिर्यारोहणातल्या त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून श्री शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना गौरवलं आहे.


 शिखररत्न कांचनजंगा जगभरातल्या गिर्यारोहकांना खुणावणारं शिखर….
त्याचं दर्शन विलोभनीय खरं ,
पण ते सर करणं तितकंच खडतर ,
तितकंच आव्हानात्मक…
‘गिरिप्रेमी’च्या दहा गिर्यारोहकांनी हेच आव्हान स्वीकारलं आणि मोहीम फत्ते केली ती अनेक विक्रम नोंदवत!
त्यासाठी शारीरिक, मानसिक, आर्थिक तयारी करण्याबरोबरच विजीगीषु वृत्तीही ठेवायची होती.
ही गोष्ट साहसी वृत्तीची जशी,
तशीच ती अपार मानवतेचीही आहे आणि निसर्गसंवर्धनाच्या जागरुकतेबद्दलचीही आहे.
पुस्तकात या थरारक मोहिमेचं रोचक वर्णन केलं आहे ते,
निष्णात गिर्यारोहक भूषण हर्षे आणि मोहिमेचे नेते ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी.

साहसी आणि विक्रमी मोहिमेची गोष्ट …. ‘शिखररत्न कांचनजुंगा!”


Reading Time: 1 Minutes (106 words)

978-93-92374-29-6 Shikharatna Kanchanjunga शिखररत्न कांचनजुंगा umesh zirpe bhushan harshe उमेश झिरपे भूषण हर्षे शिखररत्न कांचनजंगा जगभरातल्या गिर्यारोहकांना खुणावणारं शिखर…. त्याचं दर्शन विलोभनीय खरं , पण ते सर करणं तितकंच खडतर, तितकंच आव्हानात्मक… ‘गिरिप्रेमी’च्या दहा गिर्यारोहकांनी हेच आव्हान स्वीकारलं आणि मोहीम फत्ते केली ती अनेक विक्रम नोंदवत! त्यासाठी शारीरिक, मानसिक, आर्थिक तयारी करण्याबरोबरच विजीगीषु वृत्तीही ठेवायची होती. ही गोष्ट साहसी वृत्तीची जशी, तशीच ती अपार मानवतेचीही आहे आणि निसर्गसंवर्धनाच्या जागरुकतेबद्दलचीही आहे. पुस्तकात या थरारक मोहिमेचं रोचक वर्णन केलं आहे ते. निष्णात गिर्यारोहक भूषण हर्षे आणि मोहिमेचे नेते ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी. साहसी आणि विक्रमी मोहिमेची गोष्ट…. ‘शिखररत्न कांचनजुंगा!” Book Rohan Prakashan मराठी १८८ साहस

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.