978-93-92374-29-6 | Shikharatna Kanchanjunga | शिखररत्न कांचनजुंगा | umesh zirpe | bhushan harshe | उमेश झिरपे | भूषण हर्षे | शिखररत्न कांचनजंगा जगभरातल्या गिर्यारोहकांना खुणावणारं शिखर…. त्याचं दर्शन विलोभनीय खरं , पण ते सर करणं तितकंच खडतर, तितकंच आव्हानात्मक… ‘गिरिप्रेमी’च्या दहा गिर्यारोहकांनी हेच आव्हान स्वीकारलं आणि मोहीम फत्ते केली ती अनेक विक्रम नोंदवत! त्यासाठी शारीरिक, मानसिक, आर्थिक तयारी करण्याबरोबरच विजीगीषु वृत्तीही ठेवायची होती. ही गोष्ट साहसी वृत्तीची जशी, तशीच ती अपार मानवतेचीही आहे आणि निसर्गसंवर्धनाच्या जागरुकतेबद्दलचीही आहे. पुस्तकात या थरारक मोहिमेचं रोचक वर्णन केलं आहे ते. निष्णात गिर्यारोहक भूषण हर्षे आणि मोहिमेचे नेते ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी. साहसी आणि विक्रमी मोहिमेची गोष्ट…. ‘शिखररत्न कांचनजुंगा!” | Book | Rohan Prakashan | मराठी | १८८ | साहस |
ऑफबीट भटकंती ३
हटके’ पर्यटनस्थळांची रोमांचकारी हॅटट्रिक!
जयप्रकाश प्रधान
प्रवासवर्णनाच्या पुस्तकांमध्ये आपलं वेगळेपण जपत वर्षा-वर्षाच्या अंतराने `ऑफबीट भटकंती’ चे दोन भाग प्रसिद्ध केल्यानंतर आता प्रसिद्ध होत असलेला हा तिसरा भाग ! पहिल्या दोन भागांप्रमाणे या तिसर्या भागातही जगभरातील विविध `हटके’ व वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची विविधांगी माहिती जयप्रकाश प्रधान त्यांच्या रंजक शैलीत देतात. त्याचबरोबर या पर्यटनस्थळांना कधी जावं, कसं जावं, व्हिसा कसा घ्यावा अशी उपयुक्त माहिती आणि नकाशेही ते यात देतात.
छंद म्हणून भटकंती करता करता प्रधान दांपत्यानी तब्बल ७३ देश पालथे घातले आहेत. या भटकंतीवर आधारित अनुभवकथनाचे त्यांचे कार्यक्रमही लोकप्रिय होत आहेत. स्लोव्हाकिया, बोस्निया-हरझेगोव्हिना, कॅनेडियन रॉकीज…अशा काही परिचित/अपरिचित देशांमधील रोमांचकारी ठिकाणांमधील प्रवासअनुभवाची प्रचीती देणारं पुस्तक… ऑफबीट भटकंती-३ !
Reviews
There are no reviews yet.