उषा पुरोहित
उषा पुरोहित हे नावच घेताच आठवतात, त्या त्यांच्या चविष्ट, लज्जतदार पाककृती. स्वयंपाकाची आवड असणार्याह सार्यांाच्याच मनात उषाताईंचं स्थान अढळ आहे. त्यांनी दिल्ली इथल्या लेडी इर्विन कॉलेज ऑफ होम सायन्स इथून होम सायन्स या विषयात बी.एससी. ही पदवी प्राप्त केली. भारातील विविध प्रांतात व्यास्तव्यास असल्यामुळे त्यांना अनेकविध पाककृती आत्मसात करण्याची संधी मिळाली. त्या पाककृतींना उषाताईंनी स्वतः असा खास टच देऊन विविध नियतकालिकं तसंच वृत्तपत्रांमधून पाककला विषयक लेखन केलं. साप्ताहिक सकाळमधील रूचिपालट हे त्यांचं सदर खूप लोकप्रिय झालं. याशिवाय त्यांनी आकाशवाणी व दूरदर्शनवरील वाहिन्यांवर पाककलाविषयक विविध कार्यक्रमांत भाग घेतला आहे. त्यांनी अनेक पाककला स्पर्धांत परीक्षक म्हणूनही काम पाहिलं आहे.